डिलिव्हरीच्या वेळी हॉस्पिटलमध्ये घ्यायचे साहित्य . . .

      ९ वा महिना लागल्यावर खूप काळजी आणि उत्साह असतो. पण डिलिव्हरीची तारीख जवळ येते तशी टेन्शन येते की, दवाखान्यात काय – काय घेऊन जायचे. कोणत्या वस्तू लागतील आणि एखादी वस्तू विसरली गेली तर अशी सर्व काळजी असते. आणि बऱ्याचदा असे होते की, एखादी वस्तू विसरली जाते किंवा माहितीही नसते की, ही गोष्ट ऐनवेळी लागेल. आणि ही बॅग तुम्ही ३६ व्या आठवड्यात तयार करून घ्यायची. तेव्हा ह्या ब्लॉगमधून तुम्हाला डिलिव्हरीच्या वेळी कोणकोणत्या वस्तू लागतील त्याची माहिती सांगणारा हा ब्लॉग.

१) कोणकोणते साहित्य घेणार

१. दररोज लागणारे जसे साबण, टूथपेस्ट, टूथब्रश, शाम्पू, डियोड्रेंट, नैपकिन, उशी, टिशू पेपर रोल, हॅन्ड सेनेटाइजर (हात स्वच्छ करण्यासाठी) क्रीम जी तुम्ही वापरत असता

२. जोडी नाईट गाऊन, असे जे पुढून थोडे मोकळे राहतील, नर्सिंग ब्रा, आणि टॉप, आरामदायक कपडे लागली तर, आणि अंडरवियर जी खराब झाली तरी चालतील, फडके किंवा असे कापड ठेवा त्याच्याने पुसता येईल.

२) काही महत्वाचा सामान

१. निप्पलच्या वेदनेला शांत करण्यासाठी क्रीम आणि बटर.

२. जवळच्या नातेवाईकांचे नंबर, आणि मोबाइल

३. मालिश चे तेल जे गर्भारपणात वापरायला सुरक्षित राहील.

४. लीप बाम तुमच्या ओठांकरिता.

५. हेयर बँड तुमची केस बांधण्याकरिता

६. स्लीपर, मोबाइल चार्जर, पावर बँक ऐनवेळी खूप कामास येते.

३) डॉक्टरांनी दिलेल्या औषधी, आणि नवजात बाळ येणार आहे तेव्हा त्यासाठी नॅपीज, बेबी वाईप्स, तान्ह्यासाठी गोधडी, चादर, किंवा झावर, लहानशी टोपी, किंवा बाकीचा समान तुम्ही त्यावेळी घेऊ शकता. पण अगोदरच लागणाऱ्या वस्तू घेतल्याच तर खूप चांगले राहते. आणि ज्या गोष्टी डॉक्टरांनी सांगितलेल्या ते खाणे आणि फळे नक्कीच आठवणीने जवळ असू द्या.

खूप सामान आणि बॅग घेऊन जाऊ नका. जितका आवश्यक आहे तितकाच घ्या. आणि सोबत नवऱ्यालाही घ्या ते महत्वाचे आहेत. 

Leave a Reply

%d bloggers like this: