बाळांची स्तनपानाची सवय कशी सोडविता येईल. जेणेकरून बाकीचा आहार खायला लागेल. हा प्रश्न खूप सामान्य आहे. आणि सर्वच आईंना पडणारा आहे. कारण बाळाला दुधाची सवय झाल्यावर इतर पदार्थ खातच नाही. त्यामुळे त्याचे वजन वाढत नाही. बाळ काहीअंशी कुपोषित राहून जातो. आणि काही महिन्यानंतर आईच्या स्तनात दूध यायचे बंद होऊन जाते. तेव्हा काही महिन्यानंतर बाळाची स्तनपानाची व फक्त दूधच पिण्याची सवय कशी सोडवायची त्याविषयी माहिती देणारा हा ब्लॉग.
१) एकाच वेळी लगेच स्तनपान सोडण्याची घाई करू नका

हळूहळू स्तनपान सोडवण्याचा प्रयत्न करा. एकाच वेळी एकदम स्तनपान सुटेल असेल करू नका. कारण तसे केल्यास बाळ आजारी पडू शकतो. आणि ते आई व बाळांना दोन्ही माय – लेकरांना हानिकारक आहे. ह्यामुळे तुमच्या स्तनात सूज, गाठ, किंवा वेदना सुद्धा होऊ शकते.
२) खूप मातांना स्तनपान सोडणे गिल्टी वाटते

खरं म्हणजे खूप स्तनदा मातांना स्तनपान सोडणे जीवावर येते. कारण स्तनपान हे आई व बाळाचे ऋणानुबंध घट्ट करत असते. आणि आई त्यात गुंतलेली असते. आणि स्तनपान बंद करणे म्हणजे जसे बाळाला आईपासून दूर करतोय असेच आईला वाटते. त्यामुळे स्तनपान आपण बाळाचे चांगले पोषण करण्यासाठीच करत आहोत ही गोष्ट लक्षात घेऊन सोडावे.
३) बाळाला नवनवीन पदार्थांची ओळख करून द्यावी

बाळासाठी नवीन काही पाककृती ट्राय करून पाहावीत ह्या अगोदर बरेच ब्लॉग पाककृती संदर्भात आहेत तुम्ही ते बघू शकता. आणि बाळाला घरचेच सुपौष्टिक अन्न द्यावे. आणि जर तुम्ही बाळाला फास्ट फूड सारखा पदार्थ दिलाच तर आणि बाळाला चव लागलीच तर बाळ पुन्हा -पुन्हा तेच मागेल. तेव्हा ह्याबाबत दक्षता असू द्या.
४) विविध चवींची सवय
विविध भाज्यांचे सूप

१. टमाटे, कांदा, गाजर एकत्र उकडावेत. मिक्सर मधून काढून मीठ, मिरी, घालून उकळी आणावी.
२. पालक, दुधी, कांदा, बटाटा, मूग डाळ / तूर डाळ एकत्र करून शिजवून मिक्सर मधून काढावी. वरून लोणी घालावे. मीठ, मिरी, चवीपुरता
३. कोबी, फरसबी, गाजर, कांदा, वाटाणा, एकत्र उकडावेत. सूप करून वरून व्हाईट स्वास घालावा. व्हाईट स्वास – दूध, आटा, लोणी, गॅसवर एका भांड्यात परतावे. ( मंद आचेवर) वरून थोडे- थोडे दूध घालून ढवळत राहावे. घट्टसर खमंग शिजल्यावर थंड करावे. त्याच्यात हळूहळू सूप ओतावे. गॅसवर गरम मिठी- मिरी घालावी.

४. तांदूळ भाजून पाण्यात एक तास भिजत ठेवावेत. मग जास्त पाणी घालून कुकरमध्ये शिजवावे. मऊ शिजलेल्या भातात मीठ, मिरपूड, जिरे, तूप घालून बाळाला भरवावे.
हॅलो मॉम्स… आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.
Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया… हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता