या गोष्टी दर्शवतात की तुमचे दुसरं गर्भारपण पहिल्यापेक्षा अवघड ठरू शकते

गर्भारपण ही काही सोप्पी गोष्ट नाही. तुम्हांला अनेक बदलांमधून जावे लागते. आणि तुमच्यात होणारे अनेक बदल आणि वेदना तुम्हांला नऊ महिने सहन करायच्या असतात. या वेदनानंतर तुम्हांला मिळणारी भेट कितीही सुंदर असली तरी कधी कधी या वेदना असाह्य असतात. पहिले गर्भारपण जर खूप वेदनामय गेलं असेल. तर दुसरं अजून अवघड होणार असतं तर ते का? ते पुढील कारणांच्या आधारे तुमच्या लक्षात येईल. आणि यामुळे तुम्हांला सर्व गोष्टीच्या आधारे पुढील नियोजन करण्यास सोपे जाईल.

१) यावेळी मिळणार आधार कमी होतो

पहिल्यावेळी तुमचे लाड करणारे तुम्हांला हवं नको बघणारे तुमच्या भोवती असणाऱ्यांची संख्या कमी झालेली असते . कारण त्यांच्या मते तुम्हांला पहिल्या अनुभवातून बऱ्याच गोष्टी कळल्या असतात. हि गोष्ट जरी खरी असली तरी तुम्हांला तुमच्या पहिल्या मुलाकडे लक्ष देऊन सगळ्या गोष्टी सांभाळायच्या असतात यात तुम्हांला तुमच्या पतीची मदत होत असली तरी दोन जबाबदाऱ्या असणार असतात.

२. गर्भधारणेबद्दल कमी उत्सुकता

तुम्हांला पहिला अनुभव असल्यामुळे तुमची उत्सुकता आणि बाळाबाबतचा कल्पनाविलास कमी झालेला असतो. आपे बाळ कसे असेल त्याच्या केसांचा वास. त्याची छोटी-छोटी बोटं याबाबत तुम्ही अनुभव घेतला असल्यामुळे तुम्हाला कधी-कधी खुप कंटाळवाणे होईल

३. तुम्हांला डुलक्या घेणं अशक्य होईल

तुम्हांला आठवत असले पहिल्या गरोदरपणात तुम्ही दुपारी आणि वेळ मिळेल त्यावेळी डुलक्या घेत होता परंतु आत तुमच्यावर पहिल्या मुलाची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे त्याची काळजी घेऊन स्वतःकडे लक्ष देताना तुमच्या डुलक्या कमी होणार आहेत

४. असहनीय लक्षणे आणि गोष्टी

पहिल्या गर्भारपणातील लक्षणे आणि होणार त्रास जसे कोरड्या उलट्या उमासे हे या गरोदरपणात देखील असणार आहेत पण हे सगळे होत असताना तुम्हांला तुमच्या पहिल्या मुलांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पहिल्यावेळी तुम्हांला फक्त स्वतःकडे लक्ष द्यायचे होते पण यावेळी तुम्हांला आपल्या पहिल्या पिल्लाला सांभाळायचं आहे. 

५. डॉक्टरांकडे जाताना मुलाला घेऊन जावे लागते 

गर्भारपण अशी वेळ असते ज्यावेळी तुम्हांला  सतत डॉक्टरांकडे जावे लागते. ते आपल्या होणाऱ्या बाळाच्या आणि तुमच्या स्वतःच्या आरोग्यसाठीच आणि आवश्यक असले तरी या  वेळा पाळणे,  योग्य त्या तपासण्या करणे हे दमवणारे असते त्यात अजून या डॉक्टररांच्या बहुतांश भेटींना तुम्हांला  तुमच्या पहिल्या मुलाला घेऊन जावे लागत असते त्यामुळे ते अजून दमवणारे असते.

या सगळ्या गोष्टी तुम्हांला घाबरवण्यासाठी किंवा तुम्हांला  दुसऱ्या मुलाच्या विचारा पासून परावृत्त करण्यासाठी सांगत नसून दुसऱ्या गर्भारपणात कोणत्या गोष्टींना समोर जावे लागू शकते आणि त्याला अनुसरून तुम्ही कोणत्या गोष्टींची मनाची तयारी करावी आणि नियोजन करावे याबाबत जागरूक करण्यासाठी देत आहोत

Leave a Reply

%d bloggers like this: