स्तनाच्या कर्करोगा संबंधित सेल्फ एक्झामिनेशन कसे करावे (व्हिडीओ)

 

आजची बदलती जीवनशैली वेळी-अवेळी आहार घेण्याची सवय असंतुलित आहार,व्यायामाचा अभाव, मुले उशिरा होणं, अनुवंशिकता ही स्तनांचा कर्करोग होण्याची काही मुख्य कारणे आहेत. त्यामुळे साधारणतः वयाच्या तिशीनंतर साधारणतः स्तनाच्या कर्करोगाच्या बाबतीत जागरूक असणे गरजेचे असते. यासाठी सेल्फ एक्झामिनेशन म्हणजेच स्वतःची स्वतः काही तपासण्या करवी आणि काही लक्षणे आणि बदल आढळ्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तर हे सेल्फ एक्सामिनेशन कसे करावे हे व्हिडिओच्या आधारे पाहणार आहोत.

हे सेल्फ एक्झमिनेशन करताना मासिकपाळीच्या ६ ते ७ दिवसानंतर करावे

१) झोपून किंवा उभ्याने व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्तनांची तपासणी करावी. व्हिडीओ मध्ये दाखवल्याप्रमाणे तीन बोटांनी स्तनाची तपासणी करावी. कुठे काही गाठ किंवा उभार तर जाणवत नाही ना याची खात्री करून घ्यावी. तसेच काखेत देखील असामान्य गाठ जाणवत नाही ना याची खात्री करून घ्यावी

२) त्यानंतर आरश्यासमोर उभे राहून स्तनाचे योग्य तपासणी करा .प्रथम स्तनांमध्ये काही असामान्य बदल तर जाणवत नाही ना हे पाहावे. स्तनाच्या आकारात रंगामध्ये काही अनियमित बदल झालेला नाही ना हे तपासावे.

३) स्तनाग्रांच्या म्हणजेच निप्पल्स च्या आकारात काही बदल तर झाला नाही ना हे पाहावे. त्वचेचा रंग खूप लाल किंवा पिवळा झाला नाही ना हे पाहावे. तसेच कुठेही सुजल्या सारखे वाटत नाही ना ? हे तपासावे त्या भागात ओढल्यासारखे किंवा खड्डा पडल्यासारखे दिसत नाही ना हे तपासावे. 

४) त्वचेचा रंग लाला पिवळं किंवा निळा झाला नाही ना हे तपासावे.

५) कोणत्याही कारणाशिवाय स्तनाच्या कोणत्या भागात खुप वेदना तर होत नाही ना हे तपासून घ्यावे. 

६) स्तनाग्र आतल्या बाजूला वाळलेले तर नाही ना ? हे तपासावे. किंवा स्तनाग्रामधून कोणता द्रव तर येत नाही ना? किंवा रक्त येत नाही ना याची खात्री करून घ्यावी

वरील कोणतेही लक्षणे आढळून आल्यास ना घाबरता त्वरित डॉक्टरांना संपर्क साधावा कारण लवकर झालेले निदान हे उत्तम

गरोदर असणाऱ्या किंवा स्तनपान देणाऱ्या महिलांना डॉक्टरांनी स्तनांच्या बाबतीत सांगितलेल्या बदल व्यतिरिक्त कोणते बदल जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Leave a Reply

%d bloggers like this: