उत्तम पचनशक्ती हवी आहे ? या गोष्टी करा.

आपले आरोग्य हे आपण काय खातो कसे खातो कधी खातो यावर अवलंबून असते.शरीरातील प्रत्येक अवयवावर आपल्या आहार विहाराचा परिणाम होत असतो. माणसाची पचन व्यवस्था उत्तम असली की निम्म्यांपेक्षा अधिक आजार हे नाहीसे होतात आणि उरलेले हे आपल्या जीवनपद्धतीवर अवलंबून असतात. तर पूर्ण शरीराचे आरोग्य अवलंबून असणाऱ्या या पचन व्यवस्थेची काळजी घेऊन पचनशक्ती उत्तम कशी करावी यासाठी दैनंदिन जीवनात सहजतेने करता येणारे सोपे उपाय अवश्य करून पहा

१. कोमट पाणी

खाल्लेले अन्न पचण्यास त्रास होत असेल तर जेव्हा तहान लागेल त्यावेळी कोमट पाणी प्यावे. तसेच सकाळी कोमट पाणी प्यावे

२. घाई-घाईत जेवु नये

तुमच्या जेवणाच्या पद्धतीचा तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होत असतो. त्यामुळे जेवताना घाई-घाई- न जेवता शांतपणे बसून जेवावे. जेवण उरकु नये शांतपणे जेवावे. जेवण करताना इतर काम, उदा टीव्ही पाहणे. ऑफिस काम अश्या गोष्टी करु नये योग्य स्थितीमध्ये बसून जेवण करावे ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचते

३. वजनावरील नियंत्रण

वजन जास्त असल्यास जास्त हालचाल करण्याची इच्छा होत नाही. शरीराची हालचाल कमी होते. आणि त्यामुळे योग्य पद्धतीने अन्नाचे पचन होत नाही. आणि जास्त वजन असल्यास छातीत जळजळ होणे गॅसेस अश्या समस्या निर्माण. आणि या समस्या पचनव्यवस्थेतील बिघाड दर्शवतात

४. पाण्याचे योग्य प्रमाण 

दिवसभरातून योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे असते त्यामुळे अन्नाचे पचन योग्य रीतीने होते दूर राहण्याचा उत्तम उपाय आहे. दररोज कमीत कमी 8-10 ग्लास पाणी प्यावे, यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येतून मुक्ती मिळेल आणि पचनव्यवस्था व्यवस्थित कार्य करते

५. अन्न योग्य पद्धतीने चावून-चावून खावे

जेवण करण्याची सर्वात चांगली पद्धत म्हणजे अन्न चावून-चावून खाणे. यामुळे तुमची पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होईल.

६. लिंबू पाणी

तुम्हाला सकाळी गरम पाणी पिणे शक्य नसेल तर एक ग्लास पाण्यामध्ये लिंबू पिळून ते पाणी प्यावे. या उपायाने तुमचे पोटही साफ राहील.

७. वेळेवर जेवण करा 

उत्तम पचन क्रियेसाठी दररोज एकाच ठरवलेल्या वेळी जेवण करावे. दररोज नियमित वेळेवर जेवण केल्याने पाचन तंत्रवर यांचा चांगला प्रभाव पडतो आणि अॅसिडही तयार होत नाही.पाचन तंत्र संध्याकाळनंतर मंद होते. या काळात पोटामध्ये पाचन रसायन तयार होऊ लागते, यामुळे रात्री उशिरा जेवण केल्याने पाचनतंत्र बिघडू शकते

८. आहारात वाढवा फायबरचे प्रमाण 

चेरी, द्राक्ष, कडधान्य, बदाम यासारखे फायबरयुक्त खाद्य पदार्थांचा आहारात समावेश करावा. हे खाद्यपदार्थ आहारात समाविष्ट केल्यास तुमचे पाचन तंत्र चांगले राहील.

९. फास्ट फूडपासून दूर राहा

फास्ट फूड उदा पिझ्झा, पास्ता, बर्गर इ पदार्थांचे सेवन शक्यतो टाळावे. कारण फास्ट फूड बनवायला सोपे असले तरी बद्धकोष्ठता आणि इतर पाचन समस्या निर्माण होतात, कारण फास्ट फूड पचण्यासाठी खूप वेळ लागतो.

१०. नियमितपणे व्यायाम करा

दररोज व्यायाम केल्याने खालेले अन्न व्यवस्थित पचते. आणि शरीरासोबतच पाचनतंत्रही मजबूत होण्यास मदत होते. आणि रक्तप्रवाह योग्य पद्धतीने होतो.  

Leave a Reply

%d bloggers like this: