डिलिव्हरीनंतर पहिल्यांदा शौचाला जाण्याच्या वेळी ….

      डिलिव्हरीनंतर आईला सर्वात जास्त त्रासदायक गोष्ट वाटते ती म्हणजे टॉयलेटला जाणे. हो बऱ्याचदा ही गोष्ट प्रसूतीपेक्षाही कठीण वाटते. आणि काही वेळा तर प्रसूतीच्या वेळीच शौच होऊन जाते. पण ह्यात शरमेची कोणतीच गोष्ट नाही प्रसूतीवेळी अशी गोष्ट बऱ्याचदा खूप स्त्रियांबाबत घडत असते. आणि खूप स्त्रियांचे म्हणणे आहे की, प्रसूतीनंतर शौचाला जाणे म्हणजे दिव्यच असते. कारण शरीर पूर्ण थकून गेलेले असते आणि टाके दिलेले असतात त्यामुळे कधी – कधी ती जागा खूप दुखत असते आणि जोरही लावता येत नाही. आणि ह्या गोष्टीत लाज बाळगण्यासारखे काहीच नाही. तेव्हा प्रसूतीनंतर तुम्हाला टॉयलेटला जाणे ह्याविषयी

१) शरम बाळगू नका

जर तुम्हाला प्रसूतीनंतर शौच लागली असेल तर शरम वाटू देऊ नका किंवा टाळूही नका आणि कोणी सोबत पाहुणे वैगरे असतील तरीही संकोच न ठेवता शौचाला जावे. कारण उशीर केलाच तर मल घट्ट होऊन नंतर खूप त्रास होतो आणि तेव्हा टाकेही खूप दुखत असतात. आणि काही हॉस्पिटलमध्ये तर नियमच असतो की, शौच केल्याशिवाय ते सुटीच देत नाही. तेव्हा संकोच करू नका.

२) स्टूल साफ्टनर चा वापर करा

प्रसूतीनंतर स्टूल साफ्टनर घ्यायचे सुरु करून द्या म्हणजे तुम्हाला कब्ज सुद्धा होणार नाही. आणि खूप आरामाने तुम्हाला शौच होऊन बरे वाटेल.

३) पातळ पदार्थ घ्या

काही स्त्रियांना सवय असते की, काही चटर – बटर खाण्याची पण ते पचायला खूपच जड असते. आणि मैल ही कोरडे होते आणि गॅसची समस्या येते. त्यामुळे पातळ पदार्थ खा. कोरडे पदार्थ काही दिवसांसाठी खाऊ नका. आणि नारळ पाणी व ज्यूस जास्त घेत चला. आणि खाल्यानंतर ओवा खायला विसरू नका.

४) टॉयलेट होत नसेल तर

जर तुम्हाला प्रसूतीनंतर मल त्याग करायला खूपच अडचण येत असेल किंवा खूप त्रास होत असेल आणि नाहीच होत असेल तर डॉक्टरांना भेटून ह्याबाबत जे असेल ते सांगा. कृपया ह्याबाबत संकोच बाळगू नका. ह्या गोष्टी खूप सामान्य असतात आणि त्या सर्वच स्त्रियांबाबत घडत असतात म्हणून लगेच जे असेल ते सांगा.

५) फ्री वाटणारी व्यक्ती सोबत घ्या

तुमच्यासोबत अशा वेळी तुम्ही तिच्यासोबत – त्याच्यासोबत तुम्ही खूप फ्री फील करतात. अशा व्यक्तीला किंवा स्त्रीला सोबत असू द्या. आणि अशा वेळी मनातच गोष्टी ठेवू नका. त्या बोलून टाकायच्या. आणि हॉस्पिटलमध्ये अशी रूम घ्या की त्याच्या आतच टॉयलेट असेल. 

Leave a Reply

%d bloggers like this: