नैसर्गिक प्रसूतीनंतर अश्याप्रकारे टाक्यांची काळजी घ्या

        नैसर्गिक प्रसूतीमध्ये जर टाके घालावे लागले असतील तर याबाबत तुम्हांला काळजी घेणे आवश्यक असते. ही काळजी कशी घ्यावी यासाठी काही टिप्स पाहूया. सुरवातीच्या काळत डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी जसे जड उचलू नका शौच्याला जोर करू नका या गोष्टी कटाक्षाने पाळा

१. शौचाला आणि लघवीला गेल्यानंतर पाण्याने जागा धुतली पाहिजे. हे लक्षात ठेवले पाहिजे की धुताना पुढून मागे धुवायला पाहिजे, आजारांचे संक्रमण टाळण्यासाठी कधीही मागून पुढे धुवू नये. डॉक्टरांच्या सल्याने या पाण्यात काही जंतुसंसर्ग टाळण्यासाठी औषध टाका.

२. ती जागा धुवून झाल्यावर मऊसर कोरड्या कापडाने हलक्या हाताने ओलसरपणा टिपून घ्या.

३. आजारांचे संक्रमण टाळण्यासाठी आणि आग होत असल्यासडॉक्टरांना विचारून काही मलमे लावू शकता . हे मलम दिवसात दोनवेळा, आंघोळीनंतर आणि रात्री झोपायच्या अगोदर लावावे.

४. दुखणे कमी करण्यासाठी सोसेल इतक्या गरम पाण्याने साफ करणे, गरम पाण्याची पिशवी वापरणे लाभदायक असू शकते.

५. तॉडातून घ्यावयाची औषधे जी आजारांचे संक्रमण टाळतात किंवा दुखणे कमी करणा-या वेदनाशामक गोळ्या या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घ्याव्यात.

६. बहुतेक डॉक्टर टाके घालण्यासाठी असे धागे वापरतात जे आपोआप विरघळतात किंवा पडून जातात. टाके दाखवण्यास परत येण्याची आवशक्यता आहे का हे आपल्या डॉक्टरांना विचारून घ्या.

७. सॅनिटरी नॅपकिन सतत बदलत राहा. हे बदलण्याच्या आधी आणि नंतर हात स्वच्छ धुवा. ( निर्जंतुक करून घ्या.)

८. टाक्यांना हवा लागू द्या. याकरता सैल सुती आणि आरामदायक अंतर्वस्त्र घाला. रात्री झोपताना देखील सैल कपडे घाला. टाक्यांना घासतील असे कपडे घालू नका त्यामुळे टाक्यांना त्रास होण्याची शक्यता असते.

९. या काळात बद्धकोष्ठता होणार नाही असाच आहार घ्या. कारण शौच्यास जोर लावावा लागला तर टाक्यांना धक्का लागण्याची शक्यता असते.

१०. या काळात उठताना बसताना काळजी घ्या.

११. जर या काळात त्या भागातून अनियमित स्त्राव किंवा विचित्र वास यायला लागल्यास त्वरित डॉक्टरांना संपर्क करा. कारण ही संक्रमणाची लक्षणे असू शकतात

या नाजूक काळात स्वतःची काळजी घ्या. 

Leave a Reply

%d bloggers like this: