बाळाचे दात केव्हा यायला लागतात आणि ते कसे ओळखावे ?

बाळाचे दात केव्हा येतात ? अजूनही बाळाचे दात आलेले नाहीत ? मला भीती वाटतेय अजूनही माझ्या बाळाचे दात आलेले नाहीत ? अशी प्रश्न बऱ्याचदा डॉक्टरांना विचारली जातात. आणि आईलाही उत्सुकता असते आपल्या बाळाचे दात आलेले बघताना. बाळाचे दात सामान्यतः ३ महिन्यापासून यायला सुरुवात होते. आणि बाळही ३ महिन्यानंतर कोणतीही वस्तू खायला बघतो. बाळाचे दात यायला लागल्यामुळे सर्दी, ताप अशा गोष्टी होतात तेव्हा त्याविषयी जाणून घेऊ.

१) बाळाला दात येण्याची प्रक्रिया

             बाळाला दात एकदम जोडीनेच येत असतात. अगोदर मध्यभागी खालच्या बाजूचे दोन दात येतात. नंतर महिन्यानंतर वरच्या भागाचे दात यायला लागतात. आणि काही वेळा बाळांमध्ये वरची किंवा खालचीही येऊ शकतात. तसे त्यांचे येण्याचे निश्चित नसते. तुम्ही खाली पाहू शकता की, बाळाच्या दातांची वाढ कोणत्या महिन्यानुसार कशी होते.

१. ६ महिन्याचे बाळ – मध्यभागी खालच्या बाजूचे पुढचे दात.

 
 
 
 
 

२. ८ महिन्याचे बाळ – वरच्या मध्यभागी पुढचे दात.

३. १० महिन्याचे बाळ – खालचे आणि वरचे आजूबाजूचे दात

४. १८ महिन्याचे बाळ – दाढ सशक्त व्हायला लागते.

५. २४ महिन्याचे बाळ – चावण्यासाठी दात यायला लागतात.

२) बाळाला दात येण्याची लक्षणे

बाळाला दात ३ महिन्यापासून यायला लागल्यानंतर काही बाळांचे सहा महिन्यापर्यंत येत नाही तेव्हा घाबरून जाऊ नका कारण १ वर्षेपर्यंत दात येत असतात. प्रत्येक बाळाचे दात येण्याची स्थिती वेगवेगळी असते.

१. ज्या ठिकाणी बाळाला दात येतात ती जागा लालसर, थोडी फुगलेली वाटते, आणि हिरड्याही सुजलेल्या वाटतात. किंवा फुगलेल्या सारखी दिसते.

२. बरेच जण सांगतात की, खूप लाळ बाळाच्या तोंडातून येत असेल तर दात येण्याची प्रक्रिया सुरु झाली असेल पण तसे नसते कारण ही बाळाची विकसित होण्याची प्रक्रिया असते.

३. बाळ दिवसापेक्षा रात्री जास्त चीड-चीड करते आणि काहीही तोंडात घालते आणि तुमचा बोट तोंडात घेतल्यावर सोडत नाही हे लक्षण असते. त्याचे हिरड्या सळसळ करायला लागतात.

४. जोरजोराने आपला कान ओढत असतो.

 
 
 
 
 

या लक्षणावरून समजून जायचे की, बाळाचे दात येत आहेत म्हणून बाळ चीड-चीड करत आहेत. काही वेळा दात येताना बाळ आजारी पडते.

३) दात येण्याच्या वेळी बाळाला ताप येत असतो. सर्दीही होत असते. काही वेळा बाळ दात व हिरड्या खूप सळसळ करता तेव्हा सरळ जी वस्तू नजरेला दिसते ती तोंडात घेते आणि त्यामुळे बाळाला इन्फेक्शन होऊन जाते. ह्यात डायरिया सुद्धा होऊन जातो. त्यामुळे तुम्ही जर बाळाला काही वस्तू देत असाल तर ती गरम पाण्यात बुडवून द्या. टीथर देत असाल तेही गरम पाण्यात थोडं बुडवून द्या. म्हणजे बाळाला त्यातून काही अपाय होणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घेऊन घ्या. म्हणजे बाळ आजारी पडणार नाही.

हॅलो मॉम्स… आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया… हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

Leave a Reply

%d bloggers like this: