बाळाच्या जन्मानंतर स्वतः ला वेळ देणे याकरता आवश्यक आहे…

    बाळाला जन्म दिल्यानंतर, आईला पूर्णपणे बाळाला सांभाळणे हेच काम होऊन जाते. ह्यात तिला खूप आनंद वाटत असतो पण तिला इतरही जबाबदाऱ्या असतात. जसे की, नवऱ्याचा डबा, घरातली इतर कामे आणि ह्यातच तिचा सर्व वेळ जातो. खूप धावपळ चाललेली असते तिची तरीही घरातली कामे आपटत नाही. वरून बाळाला काही झाले तर त्याला धरून बसावे लागते. आणि ह्या सर्व गोष्टीत ‘ती’ स्वतःला विसरून जाते. आणि तिला स्वतःला कधीच वेळ मिळत नाही. आणि कधी-कधी ह्याबाबत तिची खूपच चीड – चीड होते. तेव्हा ह्या ब्लॉगमधून काही गोष्टी तुम्हाला स्वतःला वेळ काढता येईल.

१) नवऱ्याला सांगून देणे

नवऱ्याला सांगून ठेवायचे की, अमुक -अमुक ठिकाणी तुमच्या वस्तू ठेवल्या आहेत आणि त्या त्यांना तेथून घ्यायला सांगायचे कारण सर्वच नवर्यांना वस्तू हातातच लागतात आणि त्यातच बराच वेळ जातो. बूट, कपडे, कंगवा, इत्यादी वस्तू. तेव्हा त्यांना अगोदरच सांगून ठेवावे की, बाळ व सर्व घराला वेळ द्यायचा असतो तेव्हा ते समजून घेतील. म्हणजे तुमचा वेळ ह्यातून वाचेल.

२) बाळासाठी

बाळाला लागणारे सर्व सामान एकाच जागी ठेवायचे म्हणजे औषधी, कपडे, त्याची खेळणी, नॅपीज, इत्यादी. ह्यामुळे तुम्हाला पूर्ण घरभर शोधावे लागणार नाही. त्याच्या नॅपी व गोधडी लगेच धुवून टाकायची कारण राहिली तर ती राहूनच जाते.   ह्यात सासू ह्यांची मदत घ्यावी. जेणेकरून तुम्ही त्यात वेळ वाचवून स्मार्ट मॉम होणार. 

३) घराची साफसफाई

दररोज घराची साफसफाई करण्याची आवश्यकता नाही. एखाद्या दिवशी नवरा घरी असेल तेव्हा स्वच्छता करायची. आणि कामाचे नियोजन करून घ्यायचे.

४) सासूची मदत

सासू बाळाला सांभाळण्याचे काम करतात म्हणून बऱ्याच आईंना ह्या गोष्टीचा खूप आधार मिळतो. म्हणून तुम्हीही सासूला त्याबाबत सांगून ठेवावे. आणि राहिलेली सर्व कामे करून १ तास तरी निवांतपणे झोपून घ्यावे. कारण बाळ रात्री – बेरात्री रडत असल्याने तुम्हाला उठावे लागते आणि त्याचा परिणाम तब्येतीवर होतो. आणि झोप पूर्ण न झाल्याने तुमचा वेळ आळसात चालला जातो. तेव्हा सासूची मदत घ्या.

५) स्मार्टफोन मध्ये जास्त वेळ दवडू नका

आपला सर्वात जास्त वेळ मोबाईल वर जातो म्हणून गरजेच्या गोष्टींसाठीच मोबाईलचा वापर करा. जेणेकरून तुम्हाला जास्त वेळ मिळेल.

६) वेळ का काढावा ?

इतक्या सर्व गोष्टीतून वेळ स्वतःसाठी काढायचा आहे जसे की, सकाळी योग, ध्यान करणे. तुमचे जे छंद असतील जसे की, लोकर विणणे, वाचन करणे, गप्पा मारणे, चांगला चित्रपट पाहणे ह्या गोष्टी कराव्यात कारण तुम्हाला त्याच्याने फ्रेश वाटेल. व बळावरही ते गुण पडतील. आणि बाळही त्या गोष्टी करेल. कारण त्यातून बाळावर अप्रत्यक्ष संस्कार होतील. आणि प्रत्येक स्त्रीने स्वतःची छंद जोपासायला पाहिजेत. कारण त्यातून तुमचे स्वतःचे व्यक्तिमत्व घडत असते. म्हणून एक स्वतःचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी ह्या गोष्टी करा. 

Leave a Reply

%d bloggers like this: