गरोदर असताना ह्या गोष्टी नॉर्मल असतात !

गर्भारपणात असताना अशा काही गोष्टी घडत असतात की, त्या गोष्टींनी तुम्ही खूप घाबरून जातात. आणि तुम्हाला भीती वाटते की, ह्या गोष्टीचा माझ्या बाळावर परिणाम होईल. काळजीही वाटते की, ह्यामुळे माझी सिझेरियन प्रसूती होईल का ? तेव्हा ह्या सर्व गोष्टी ज्या गर्भारपणाच्या वेळी होत असतात त्या कोणत्या आणि त्याचा खरंच सिझेरियन किंवा बाळावर होत असतो का ? ह्या सर्व शंका ह्या ब्लॉगमधून सोडवणार आहोत.

१) चित्र – विचित्र स्वप्न पडणे

        काही स्त्रियांना झोपेत खूप भीतीदायक स्वप्न पडत असतात. आणि त्यांना खूपच भीती वाटायला लागते. स्वप्नात ते बाळ दगावले असेही पाहतात किंवा बाळ रडतच नाही. तेव्हा अशी स्वप्ने पडत असतील तर घाबरून जाऊ नका. असे काहीच होत नाही. ह्यासाठी तुम्ही चिंतामुक्त असा आणि माझी प्रसूती व्यवस्थित होईल ना ? असा विचार करत बसू नका.

२) खूप घाम येणे

गरोदरपणात खूप उकळतेय असे वाटणे, खूप मोठ्या प्रमाणात घाम येणे, आणि त्यामुळे बैचेन वाटणे. ह्या सर्व गोष्टी हार्मोन्स बदलामुळे होत असतात. ह्यासाठी गरोदरपणात ढिले कपडे परिधान करायची.परंतु अति अस्वस्था वाटली तर त्वरित डॉक्टरांकडे जा. 

३) खूप थकल्यासारखे वाटणे

तुमच्या शरीरात होत असलेल्या बदलामुळे तुम्ही खूप थकून गेला असे वाटत असते. आणि ही सामान्य समस्या आहे. पण काही स्त्रियांमध्ये वजन जास्त वाढल्यामुळे असे होत असते.

४) खूप खाज सुटणे

जस जसे तुमच्या गरोदरपणाचे जास्त दिवस होत जातात तस तसे पोटावरची त्वचा खेचली जाते. आणि त्यामुळे खाज सुटत असते. आणि जर काही वेळेला खूपच खाज सुटतेय तर एकदा डॉक्टरांना विचारून घ्या.

५) डोकं दुखणे

हार्मोन्स बदल होत असल्यामुळे डोकंदुखी कधी – कधी मायग्रेन आणि तीव्र डोकेदुखी होत असते. ह्या वेळी तुम्हाला त्रास असह्य होत असेल तर डॉक्टरांना विचारून पेनकिलर घ्या परस्पर घेऊ नका. कारण गोळ्यांचा बाळावर परिणाम होत असतो.

६) हिरड्यातून रक्त येणे

गरोदरपणात हिरड्यांमध्ये सूज, दुखणे, रक्त येणे, ह्या समस्या येतात. हिरड्यातून रक्त सकाळी ब्रश करण्यावेळी येत असते. काही स्त्रियांना दाढ दुखण्याचा खूप त्रास होतो. ह्या गोष्टी होतात पण त्रास खूपच होत असेल तर घरगुती उपचार करा. बाळावर ह्याचा परिणाम होण्याची शक्यता कमीच असते.

७) ऍसिडिटी

ह्या दिवसात ऍसिडिटी किंवा इंडाइजेशन सुद्धा होऊ शकते. कारण हार्मोनल बदल आणि गर्भात वाढणारे बाळ ह्यांचा दोन्हीचा परिणाम पोटावर होत असतो. त्यामुळे ह्या दिवसांमध्ये एकदम खूप खाऊ नका थोडे – थोडे दिवसातून खात चला.

८) बद्धकोष्ठता (constipation)

ह्या दिवसांमध्ये मलावरोधाची समस्या येत असते. आणि त्यामुळे तुम्ही खूप बैचेन होतात तेव्हा त्यासाठी तरल व पातळ पदार्थ खात चला. आणि डॉक्टरांकडून आयरन ची गोळी घेऊन घ्या.

९) निप्पलमधून दूध येणे

तुम्हाला आश्चर्य वाटते की, बाळाच्या जन्मा अगोदरच कसे स्तनातून दूध यायला लागले. आणि हे कधी कधी होत असते. तर त्याचे कारण असे आहे की, दूध तयार होण्याची प्रक्रिया गरोदरपणापासून सुरु होऊन जाते. वास्तविक दूध बाळाच्या जन्मानंतरच येत असते.

१०) यूरिनरी इंकॉन्टीनेंस

गरोदरपणात जेव्हा तुम्ही शिंकतात किंवा खोकलतात त्यावेळी तुमचे मूत्र निघून जाते. ह्याला मूत्र असंयता (Urinary Incontinence)असे म्हटले जाते. गर्भारपणात पेल्विक मसल रिलैक्स व्हायला लागते. आणि ते डिलिव्हरी साठी तयार होत असल्याने तुमचे पेल्विक मसल वरती नियंत्रण कमी होत जाते.

ह्या गोष्टी गरोदरपणात तुमच्यासोबत होत असतील तर खूप घाबरून जाऊ नका. हाय नॉर्मल असतात. 

Leave a Reply

%d bloggers like this: