मासिक पाळी कशामुळे चुकते ?

 

           काही स्त्रियांना व मुलींनाही बऱ्याचदा मासिक पाळी चुकल्यावर प्रश्न पडतो की, सर्व ठीक असताना माझी पाळी का चुकली ? मासिक पाळी २८ ते ३० दिवसांनी योग्य वेळेला येत असते. तेव्हा नेमक्या कोणत्या कारणामुळे मासिक पाळी चुकते हे जाणून घेउया.

      १) घरातले कलुषित वातावरण त्यामुळे त्याचाच ताण स्त्रीच्या मानसिक आरोग्यावर पडून ती चिंतेत असते. आणि तणाव जास्त झाल्यास त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो आणि मासिक पाळीची वेळ चुकू शकते. सध्या मानसिक तणावाचे प्रमाण सर्वच स्तरावर वाढत असताना पाळी चुकण्याचे हे एक महत्त्वाचे कारण असण्याची शक्यता असते. तुमचा तणाव वाढलेला असताना तुमच्या शरीरातील काही हार्मोन्स असंतुलित होतात आणि त्यामुळे पाळी चुकते.

२) थायरॉईडमध्ये ‘हायपरथायरॉईडिझम’ आणि ‘हायपोथायरॉईडिझम’ असे दोन प्रकार असतात. थायरॉईडमुळे शरीरातील हॉर्मोन्स असंतुलित होतात आणि त्याचा परिणाम मासिक पाळी चुकण्यात होतो. थायरॉईडमुळे शरीरातील ऑस्ट्रोजेन आणि कॉर्टीसॉल या घटकांची पातळी कमी होते. त्यामुळे मासिक पाळीमध्ये अनियमितता येते.

३) पॉलिसिस्टीक ओव्हरियन सिंड्रोम (पीसीओएस) आणि पॉलिसिस्टीक ओव्हरीयन डिसिज (पीसीओडी) या दोन्ही समस्या उदभवल्यास महिलांच्या शरीरात ‘सिस्ट’ची निर्मिती होते. आणि बऱ्याचदा ह्यामुळे मासिक पाळी चुकत असते.

४) प्रमाणापेक्षा जास्त शारीरिक कष्ट झाल्यास किंवा अति प्रमाणात काम करणे व खूप कमी खाणे ह्यामुळे मासिक पाळीच्या नियमिततेवर परिणाम होतो. जास्तीच्या व्यायामामुळे आणि श्रमामुळे थायरॉईड आणि ‘पिट्युटरी’ ग्रंथींवर परिणाम होऊन पाळी चुकू शकते. त्यामुळे तुम्ही व्यायाम करत असाल तरीही तो योग्य त्या प्रमाणात करणे आवश्यक आहे.

५) आहाराचा आरोग्याशी जवळचा संबंध असतो. शरीराशी निगडीत अनेक गोष्टी या आहाराशी निगडीत असतात. तुमच्या आहारात फायबरचे प्रमाण जास्त असेल, तर त्याचा मासिक पाळीशी संबंध येतो. याशिवाय खाण्याच्या चुकीच्या सवयी, लठ्ठपणा आणि खूप बारीक असणे, अशी पाळी चुकण्याची अनेक कारणे असू शकतात.

ह्या कारणांमुळे तुमची मासिक पाळी चुकत असते तेव्हा ह्यावर तुम्ही उपाय करू शकतात. आणि ताण – तणाव आणि चिंता मासिक पाळी चुकण्यात खूप मोठे कारण आहे. म्हणून आनंदी रहा, स्वस्थ रहा व काही काळजी, चिंता असेल तर जवळच्या व्यक्तीशी बोलून घ्या. बोलल्यावर खूप हलके वाटत असते.

Leave a Reply

%d bloggers like this: