लहान मुले माती/भिंतीचा रंग /खडू का खातात ?

आपण मुलांना गुपचुप माती भिंतीचा रंग ,खडू खाताना बघत असतो. ही समस्या लहान मुलांबरोबरच मोठ्यामध्ये देखील आढळून येते. मोठयांमध्ये विशेषत: गरोदरपणी अनेक स्त्रियांची ही तक्रार असते. यात माती, भिंतीचा रंग, राख,चुना, खडू, पेन्सिल,मातीचे प्रमाण असलेले पदार्थ खाण्याची समस्या असते. या मातीचे पचन न झाल्यामुळे विविध आजार आणि समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

लहान मुलांची माती खाण्याची सामान्य करणे

१) माती खाणाऱ्या मुलांच्या आहारात लोहक्षाराची कमतरता असल्याची शक्यता असते.

२)अनेक मुले शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे माती खातात

३) बाळाला स्तनपान देणे हे आवश्यक असते परंतु ६-७ महिन्यानंतर देखील स्तनपानबरोबर इतर वरचे अन्न योग्य वेळेत सुरु न दीर्घकाळ न केल्यामुळे देखील ही समस्या  निर्माण होण्याची शक्यता असते

४) काही मुले रागवून कुठे तरी जाऊन बसतात आई-वडील दुर्लक्ष करतायत अशी भावना मनात वाढू लागल्यावर देखील मुले असे करण्याची शक्यता असते.

५) आहारातील पोषक घटकांची कमतरता 

गर्भारपणात माती खाण्याची इच्छा का होते ?

गर्भारपणात अनेक स्त्रियांना माती किंवा राख किंवा मातीचा अंश असलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशी इच्छा होणाऱ्या स्त्रियांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्या शरीरातील लोह आणि कॅल्शियमच्या प्रमाण तपासून घ्यावे. आणि त्यानुसार आहारात या घटकांचे प्रमाण वाढवावे.

मुलांमधील माती खाण्याची सवय दूर करण्यासाठी हे उपाय करा 

साधारणतः मुले वयाच्या सहाव्या सातव्या महिन्यात म्हणजे ज्यावेळी ती जमिनीवर उतरून रांगू चालू लागतात त्यावेळी खाऊ लागतात. वयाच्या सातव्या आठव्या महिन्या पासून काही महिने ही सवय तशीच राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच या पेक्षा मोठ्या मुलांमध्ये मुलांच्या बाबतीत ही सवय काही महिन्यापेक्षा जास्त तशीच राहिल्यास मुलाच्या तपासण्या करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहारात बदल करावा.

१) अनेक मुले शरीरात कॅल्शियमची आणि लोहक्षाराची कमतरता असल्यामुळे माती खातात. यासाठी डॉक्टरकडे जाऊन तपासणी करून घ्या. व मुलाला लोहक्षार व कॅल्शियमयुक्त आहार द्या.

२) दोन लवंग वाटून पाण्यात उकळून घ्या. हे पाणी थंड करून मुलाला दिवसभरात २-३ वेळा पाजल्याने माती खाण्याची सवय सुटेल.

३) दररोज रात्री मुलांना पाण्यात मिसळून ओव्याचे चूर्ण खायला द्या. यामुळे मुलांची माती खाण्याची सवय सुटेल. पण हे देताना मुलांना उष्णता होणार नाही याची काळजी घ्या.

४) भिंत, भिंतीचा रंग चाटणे किंवा खाण्याची सवय असणाऱ्या मुलांची सवय लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयन्त करा,कारण या रंगमध्ये चुन्यामध्ये रासायनिक घटक असण्याची दाट शक्यता असते 

५)पिकलेल्या केळात मध मिसळून मुलाला खायला द्या. यामुळे त्याचे लक्ष मातीकडे जाणार नाही. 

६)माती खाणा-या मुलांना पोटात जंत होण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे मुलाला दर पंधरा दिवसाने घरगुती जंताचे औषध द्यावे. (वावडिंग पाणी)

Leave a Reply

%d bloggers like this: