समागमादरम्यान या चूका करणे टाळा.

       तुम्ही म्हणाल या गोष्टींमध्ये चुका ? काय म्हणता ? प्रेम करण्याचा आणि प्रणय करण्याच्या पद्धतीत देखील चुका असतात का ? खरंतर प्रेम करण्याच्या कोणत्याही पद्धतीत काही चूक आणि बरोबर नसते. पण काही गोष्टी अश्या असतात. त्या चुकून होऊन जातात या चुका कोणत्या त्या जाणून घ्या. ज्या तुमच्या नात्यात दुरावा निर्माण करू शकतात.}

१. स्वार्थी होणे.

सुखाचा उपभोग घेताना थोडेसे स्वार्थी होणे हे काही चुकीचे नाही. पण हेच सुख आपल्या जोडीदाराला देखील देणे गरजेचे असते. या गोष्टीची खात्री करा की तुमचा जोडीदार देखील सुखाचा अनुभव घेत आहे ना ? या गोष्टी करताना लाजू नका. तुमच्या जोडीदाराला देखील काही अविस्मरणीय क्षणांचा अनुभव द्या.

२. जोडीदाराच्या अपेक्षा जाणून न घेणे.

सुरवातीला या गोष्टीबाबत बोलणे तुम्हांला अवघड जाईल. पण हळू-हळू तुम्ही एकमेकांच्या समागमाच्याबाबतीत इच्छा अपेक्षा जाणून घेणे आवश्यक असते. तसेच तुमच्या याबाततील अपेक्षा आपल्या जोडीदाराला सांगणे आवश्यक असते. परंतु याबाबत जोडपी बोले टाळतात आणि स्वतःच्या इच्छा आणि अपेक्षा एकमेकांवर थोपवतात आणि त्यामुळे समस्या निर्माण होतात.

३. त्यावेळी एकमेकांकडे न बघणे किंवा न हसणे.

लोकांमध्ये एक गैरसमज आहे की संभोग ही फार गंभीर कृती आहे. जी करत असताना जोडीदारांकडे बघून हसू नये किंवा करत असताना गंभीर असावे. खरं तर प्रणय आणि संभोग करताना आपल्या जोडीदाराला त्याबाबत खुलवण्याकरता,मोकळं करण्याकरता थोड्या गंमतीची हसण्याची आवश्यकता असते

४. नवीन गोष्टी न करणे.

तुम्हांला समागमाच्या बाबतीतील नवीन गोष्टी अजमावणे थोडं अवघड वाटणे साहजिक आहे. पण नंतर काहीच नवीन गोष्टी न अजमावण्याबाबत पश्च्यताप करण्यापेक्षा नवीन गोष्टी अजमवणे चांगले. त्यामुळे ज्यावेळी तुमच्या जोडीदाराच्या मनात किंवा तुमच्या मनात नवीन काही गोष्टी करण्याची इच्छा असल्यास ती प्रत्यक्षात आणा.

५. एकमेकांच्या डोळ्यात न बघणे.

बरेचजण या क्षणी वेगळ्याच विचारात असतात किंवा लक्ष विचलित झालेले असते. असे न करता एकमेकांच्या डोळ्यात बघावे. हे तुमच्या प्रणयाच्या आणि समागमाच्या अनुभवाला वेगळ्या पातळीवर नेतात. त्यामुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारात एक वेगळाच बंध निर्माण करते. अश्यावेळी इतर गोष्टीकडे लक्ष देता जोडीदाराच्या नजरेला नजर मिळावा. यामुळे तुमच्यातिला प्रेम अजून वाढेल

६. त्या क्षणांचा एकत्र आनंद न घेणे

कधी-कधी तुम्ही तुमच्या पुरत्या गोष्टी झाल्यावर तुमचे लक्ष समागमाचा प्रवास संपवण्यावर केंद्रित झालेले असते त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा अनुभव आपल्या जोडीदाराबरोबर घेऊ शकत नाही. आणि ही गोष्ट तुमच्या नात्यासाठी योग्य नाही. 

तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या काही अविस्मरणीय क्षणांमध्ये या चुका करून तुमच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण करू नका.

Leave a Reply

%d bloggers like this: