गर्भारपणात सौंदर्य प्रसाधन वापरताय तर सांभाळून …. .

 

      गर्भारपणातही काही स्त्रियांना खूप मेक अप करण्याची सवय असते. आणि त्यात चुकीचे नाहीच पण तुमच्या मेक अप च्या काही क्रीममधून किंवा प्रॉडक्टमुळे तुमच्यावर काही हानिकारक परिणाम होत असतात. जसे की, स्त्रियांच्या संप्रेरकांवर अर्थात हार्मोन्सवर आणि विशेषतः त्यांच्या पुनरुत्पादन संस्थेवर परिणाम करतात. काही अभ्यासानुसार असे म्हटले जाते की,  महिलांमध्ये वाढते वंध्यत्व, गर्भपाताचे प्रमाण यामागे सौंदर्यप्रसाधने हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे. तेव्हा ह्या ब्लॉगमधून सौंदर्यप्रसाधनांमधील रसायनाचा काय परिणाम होतो ते समजून घेऊ.

१)  महिलांमधील वाढते वंध्यत्व, अकाली गर्भपात, तसेच अंडाशयाचे कार्य अयोग्य पद्धतीने होण्यामागे एंडोक्राईन रसायने कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. ही रसायने स्त्रियांच्या गर्भधारणेच्या क्षमता प्रभावित करतात. सौंदर्यप्रसाधनांमधील रसायनांचा दुष्परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. या सौंदर्यप्रसाधनांमध्ये नेलपॉलिश, अँटीबॅक्टेरिअल साबण तसेच अँटी एजिंग क्रीम, हेअर स्प्रे तसेच परफ्युम इत्यादींचा समावेश आहे.

नेमका दुष्परिणाम कसा होतो ?

२) साबण हा अंघोळीतील महत्त्वाच घटक आहे. साबणामध्ये विविध रसायने असतात. हल्ली अँटीबॅक्टेरिअल साबणाचे विविध प्रकार बाजारात मिळतात; पण या साबणामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते आहे. या साबणात ट्रायक्लोसन नावाच्या रसायनाचा वापर केला जातो. त्यामुळे एंडोक्राइनवर प्रभाव पडून त्याचा परिणाम थेट हार्मोन्सवर होतो. त्यामुळे पुनरुत्पादन संस्थेवर विपरीत परिणाम होतो.

३) साबण, शाम्पू आणि कंडिशनर यांच्यामध्ये वापरले जाणारे पॅराबिन्स एकप्रकारचे प्रिझर्व्हेटिव्ह आहे ज्यामुळे जीवाणूंची निर्मिती रोखली जाते; पण त्याचे जास्त प्रमाण गर्भधारणेच्या क्षमतेवर परिणाम करू शकतात. कारण हार्मोन्सचे संतुलन बिघडू लागते त्यामुळे आरोग्यपूर्ण स्त्रीबीज आणि शुक्राणू तयार होण्याची शक्यता कमी होत जाते.

४) काही स्त्रिया दररोज नेलपॉलिश लावतात यात रसायनांचे मिश्रण वापरले जाते. ह्यात अनेक प्रकारचे ऑरगॅनिक सयुंगे तयार होत असतात.  स्त्रिया आणि पुरुष दोघांच्याही प्रजनन क्षमतेवर परिणाम करतात.  

५) नेलपॉलिश रिमुव्हरमध्ये काही विषारी रसायने असतात. जसे अ‍ॅसिटोन, मिथाईल मेथाक्राइलेट, टोल्यूनी, इथाईल एसिटेट इत्यादी. टोल्यूनी हे सॉल्व्हंट आहे त्यामुळे नखांना एक चमक प्राप्‍त होते; पण यामुळे सीएनएस आणि पुनरुत्पादन संस्थेला नुकसान होते. फ्लाईटसदेखील अशाच प्रकारचे रसायन. जे सर्वसाधारणपणे सर्वच सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरले जाते. त्यामुळे हार्मोन्सची पातळी कमी जास्त होते.

६) नेलपॉलिशमध्ये आढळणारे ट्रायफिनाईल फॉस्फेटसुद्धा डायफिनाईल फॉस्फेटमुळे मेटाबोलाईज्ड असते. पण पोटीतील गर्भावर शारीरिक आणि मानसिक दोन्ही रूपात परिणाम करू शकते.

तेव्हा गरोदर असताना सौंदर्य प्रसाधन ह्यांचा वापर आणि डिलिव्हरीनंतर खूप दक्षता घ्या. कारण त्यावेळी तुम्ही स्तनपान करत असतात आणि जे तुमच्या शरीरावर परिणाम करते तेच बाळाच्या शरीरावर परिणाम करत असते. म्हणून सौंदर्य प्रसाधनांचा वापर करताना अशी क्रीम किंवा प्रसाधने  वापरा की, त्यांचा साईड इफेक्ट तुमच्या शरीरावर होणार नाही.  आणि करायचाच असे तर नैसर्गिक आणि घरगुती सौंदर्य प्रसाधन वापरा.

हॅलो मॉम्स… आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया… हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

Leave a Reply

%d bloggers like this: