आपल्याकडे गर्भारपणाविषयी खूप रहस्ये किंवा आपण त्याला मिथकं म्हणू शकतो. जसे की, लग्न झाल्यावर जर स्त्रीला उलटी झालीच तर ठरवून टाकले जाते की, हीला दिवस गेले आहेत. ही मिथक काही अंशी खरी ठरतात तर काही वेळेला पूर्णपणे खोटीही ठरत असतात. तशीच काही मिथक आजच्या ब्लॉगमधून बघणार आहोत.
१) दुधात केसर का दिले जाते

तुम्हाला बऱ्याच जणींना माहिती नसेल की, दिवस गेल्यावर त्या सुनेला सासू दुधात केसर का घालून द्यायची कारण येणारे बाळ सुंदर व गुटगुटीत असायला हवे. आणि तो गोरा असायला हवा. पण खरं म्हणजे दुधात केसर टाकल्यामुळे बाळाची रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि बाळ सदृढ राहते. पण बाळाचा रंग गोरा होत नाही. पण अशी समजूत केसर दूध पिण्याबाबत होती.
२) लेबर पेन येण्यासाठी ह्या काल्पनिक गोष्टी
हो तुम्ही वाचले ते खरंच आहे. प्रसूतीच्या कळा नॉर्मल करण्यासाठी समागम करणे, फिरणे, मसालेदार खाणे, आणि गरम जेवण करणे त्याचबरोबर संमोहन आणि अक्युपंचर, निप्पल ला उत्तेजित करणे, कॉस्टरचे तेल पिण्याबाबत सल्ला दिला जायचा व त्या वेळी बऱ्याच स्त्रिया ह्याप्रमाणे गोष्टी करायच्या आणि खूप त्रासही सहन करायच्या. आणि कॉस्टर तेल पिणे ही सोपी गोष्ट नाही त्यामुळे खूप हाल होऊन जातात. त्यामुळे अशा गोष्टी त्यावेळी केल्या जायच्या.
३) त्यावेळी खूप खायला द्यायचे नाहीत. किंवा एकदम एकाच वेळी खूप खायला सांगायचे आणि ते आईसाठी खूप कठीण होऊन जायचे. आणि काम सुद्धा खूप करवून घ्यायचे म्हणून त्यांना डिलिव्हरीच्या वेळी रक्तची खूप अडचण भासायची. तेव्हा असे न करता दिवसातून थोडे – थोडे खात राहायचे.
४) चित्रपटात दाखवले जाते तशीच डिलिव्हरी स्त्रियांची होत असे ? आणि तशीच स्थिती चित्रपटात घेतली गेली. पण खरं म्हणजे आज तशी डिलिव्हरी खूपच दुर्मिळ झाली आहे. आणि असेही म्हटले जाते की, डिलिव्हरी साठी पाठ टेकवलीच पाहिजे. पण तसेही नाही आज प्रसूती करण्यात खूप प्रगती झाली आहे.
५) असे मानले गेले की, जर आईची त्वचा खूप चकाकत असेल तर तिला मुलगाच होईल पण असे काही नाही. चमकदार त्वचा आणि प्रसूतीच्या काहीच संबंध नाही. सामान्यतः त्वचा गरोदरपणात चमकत असते. आणि तुम्ही खाणे पिणे सर्व व्यवस्थित केली असा त्याच अर्थ होतो.
६) जर नितंब सुडोल असतील तर तुमची प्रजजन शक्ती खूप चांगली आहे असे म्हटले जायचे पण असे काही नाही. ही खूप चुकीची समजूत आहे. आणि ह्याचा लेबर पेन विषयी काहीच संबंध नाही.