डिलिव्हरीनंतर होणाऱ्या ब्लीडींगला (रक्त) कसे थांबवायचे !

प्रसूतीनंतर स्त्रीला खूप आरामाची गरज असते. ती डिलिव्हरीनंतर खूप थकून गेल्यामुळे तिला झोपेचीही गरज असते. डिलिव्हरीनंतर जर तुम्हाला पिंक किंवा भुऱ्या रंगाची ब्लीडींग झाली असेल आणि त्या नंतर काही वेळात लाल ब्लीडींग होत असेल तर तुम्ही सक्तीने आराम करायला हवा. आणि जर तुमचे पॅड एका तासातच भिजून जात असेल तर त्याला दुर्लक्ष करू नका.

      १) स्तनपान हे बाळासोबत आईलाही ब्लीडींग साठी फायदेशीर असते. पोस्टपार्टम ब्लीडिंग च्या वेळी जर तुम्ही बाळाला स्तनपान करत असाल तर तुमच्या आरोग्यासाठी चांगलेच आहे. लवकर रिकव्हर व्हायला मदत मिळते. कारण स्तनपानामध्ये काही हार्मोन स्त्रवत असतात त्याला ऑक्सीटोसिन असे म्हणतात ते गर्भाशय ठीक करण्यात आणि ब्लीडींग कमी करण्यात मदत करतात.

२) पोस्टपार्टम ब्लीडिंग च्या वेळी सेक्स करणे दोघांना धोकादायक असते. कारण ह्या वेळेला इन्फेक्शन होऊ शकते. आणि जास्त जोर पडलास तर गर्भाशय ला नुकसान होऊ शकते. त्यामुळे सहा महिन्यानंतर तेही पूर्णपणे ब्लीडींग थांबल्यावरच समागम करावे. ह्याबाबत खूप जोडीदार घाई करतात. पण ते धोकादायक सुद्धा होऊन जाते.

३) ह्याबाबत ज्याही गोष्टी डॉक्टरांनी सांगितलेल्या असतील त्या आणि औषधी व्यवस्थित घ्याव्यात. त्यात हलगर्जीपणा करू नये. नाहीतर ब्लीडींग थांबणार नाही.

४) ह्यावेळी टैंपोन्स च्या जागेवर पॅड्स चा वापर करावा. पहिल्या आठवड्यात होणारी हेवी ब्लीडींग थांबवत असतो. टैंपोन्समधून इन्फेक्शन होऊ शकते. आणि त्याचबरोबर रात्री आरामाने झोपण्यासाठी ओवर नाइट पैड्स चा वापर करावा.

५) डिलिव्हरीच्या काही दिवसानानंतर तुम्ही डिलीवरी अंडरवियर घालू शकतात. ह्यामुळे खूप आराम आणि बरे वाटत असते. आणि हे डिस्पोजेबल असतात.

६) खाण्यात आयरन असलेली पदार्थ जास्त खात चला. आयरन शरीरसाठी खूप लाभदायक आणि डिलिव्हरीनंतर ब्लड काउंट वाढवण्यात मदतगार असतो. त्यामुळे खाण्यात हिरवा भाजीपाला, चिकन, बीन्स, दूध नक्कीच घेत चला. आणि तुम्ही आयरन युक्त गोळी घेण्याचा विचार करत असाल तर डॉक्टरांना विचारून घ्या.

आणि जर तुम्हाला खूप वेळपर्यँत ब्लीडींगचा त्रास होत असेल तर डॉक्टरांना त्वरित भेटा. 

Leave a Reply

%d bloggers like this: