मुलांना जेवायला भरवताना या चूका करू नका

             पोषक तत्वे आणि अन्न हे जगातील मूलभूत आवश्यकतांपैकी एक आहेत. मग वनस्पती असो किंवा मानव, प्रत्येकास कोणत्यातरी स्वरूपात अन्नाची आवश्यकता असते . आणि लहान मुलांनी अधिक पौष्टिक आहाराची गरज असते कारण हा पौष्टिक आहार त्यांची योग्य पद्धतीने वाढ होण्यास मदत करतो. मुलांना वाढवताना त्यांच्या चिंता मध्ये अनेक पालक नेहमी काही चुका करतात ज्याचा नकारात्मक परिणाम मुलाच्या खाण्याच्या सवयींवर पडतो. आम्ही अशा 5 चुकांची यादी तयार केली आहे की ज्या तुम्ही तुमच्या मुलांच्याबाबतीत टाळण्याचा प्रयत्न करावा

१. अन्न संपवण्यासाठी बक्षीस /अमिष  दाखवणे

तुमचे काम पूर्ण करण्यासाठी किंवा जेवत असताना ताटातले अन्न संपवण्यासाठी तुम्ही कधी आपल्या लहानग्याला चॉकलेट दिले आहे का? तर, आम्ही आपल्या याच सवयींबद्दल बोलत आहोत. कारण यामुळे मुलांना आपले जेवण संपवण्यासाठी काहीतरी अमिषाची सवय लागेल. आणि त्यातून जर जंक फूड किंवा चॉकलेटचे अमिश असेल तर ते लहानपणीच अशी सवय त्यांचा आरोग्यस देखील हानिकारक आहे

२. ताटातील सर्व अन्न संपवण्यासाठी जबरदस्ती करणे

समाज तुमचे ताट पूर्ण भरलेले आहे आणि ताटातले अर्धेचे पदार्थ संपवण्याची तुमची क्षमता असले आणि कुणीतरी तुमच्या मागे लागून तुम्हांला तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त खायला घालत असेल तर तुमची अवस्था काय असेल. त्यानुसार मुलांचा विचार करा. ही गोष्ट खरी आहे की मुलांना पोषक आहार मिळायला हवा त्याने योग्य प्रमाणात जेवायला हवे. परंतु त्यासाठी मुलांना जबरदस्ती करू नये. थोड्या-थोड्या वेळाने भरवावे त्यांचा कला-कला नुसार घ्यावे अन्यथा जेवणाबाबत मुलांच्या मनात भीती किंवा अढी बसेल आणि खात असलेले जेवण सुद्धा ते खाणार नाही. 

३. भरवताना लक्ष विचलित भरवणे

काही आया या आपल्या मुलांनी जेवावे या करता हे दाखव ते दाखव असे करून किंवा तो खेळत असताना भरवणे,त्यामुळे लहान मुले जेवणाचा आनंद घेऊ शकत नाही आणि मुलांचे पोट भरल्याचा आहे हे देखील समजत नाही. त्यामुळे लहान मुलांना भरवताना जेवण विषयीच गप्प माराव्या त्यांना अजून हवं का नको का आवडलं का अश्या गोष्टी विचारव्या /वर्षाच्या आतील मुलांबाबत देखील तुम्ही हा प्रयोग करू शकता

४. आपल्या मुलास इतरा बाळासारखाच आहार देऊ नये

प्रत्येक मुल वेगळे आहे आणि अशाप्रकारे त्यांच्या खाद्य प्राधान्ये देखील भिन्न असू शकतात. क आपल्या मित्राच्या बाळाला काही अन्न आवडते याचा अर्थ असा नाही की आपल्या बाळाला देखीलआवडेल. आपल्या मुलाला स्वतःची पसंती देऊ द्या आणि त्यांच्यात नविन चवींची आवड निर्माण करा . त्यांना वेगवेगळ्या पदार्थांची चव घेण्यास मदत करा आणि प्रत्येक वेळी आपल्या मुलाला नवीन चव देण्यासाठी नवीन पाककृतींचे प्रयोग करणे चालू ठेवा.

५. मधल्या वेळेत काही खाऊ घालणे किंवा / खाण्यास परवानगी देणे

आईवडील नेहमीच अशी चूक करतात की ते मुलाला मधल्या वेळेत त्यांना हवे ते खाण्याची परवानगी देतात. आणि मुले जंक फूडसारख्या पदार्थाना पसंती देता. आणि यावेळेत ते इतके खातात कि मग जेवणाच्या वेळी खाणे टाळतात. आपल्या मुलांना निरोगी ठेवण्यासाठी लहान वयात त्यांना जंक फूड ऐवजी लाला फळे किंवा भाज्या यासारख्या निरोगी पदार्थ बनवणे आणि खाऊ घालणे ही बनविण्याची आपली जबाबदारी आहे.

आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी या चुका करणे टाळा 

Leave a Reply

%d bloggers like this: