मुलींच्या व्हर्जिनिटी बाबत असे प्रश्न चुकूनही विचारू नका…..

आपण ज्या समाजात राहतो त्यात काही लोक अशी आहेत जी तुमच्यावर टीका करण्यासाठीच आहेत असे वाटते. एकीकडे . ते म्हणतात की आम्ही आधुनिकतेकडे जात आहोत आणि प्रगती करत आहोत. परंतु तरीही काही चुकीच्या मूळ कल्पना मध्ये अडकलेले आहोत. आणि हे खूप विचित्र आहे की लोक अजूनही काही गोष्टींबद्दल फारच अनावश्यक गोष्टींवर विश्वास ठेवतात जे सध्याच्या काळातील सामान्य गोष्टी आहेत आहेत.

अजूनही काही लोकं बाळचा जन्म, मासिक पाळी, सेक्स या विषयांवर बोल्ट नाही आणि दुसरे जर या विषयी बोलत असेल तर अश्या पद्धतीने त्या व्यक्तीकडे बघतात जसं त्या व्यक्तीने कुणाला जीवे मारले आहे. . याबद्दल लोक इतक्या संकुचित मानसिकतेत अजूनही आहेत हे खुप धक्कादायक आहे. अशीच एक गोष्ट म्हणजे मुलीचे कोमार्य म्हणजेच व्हर्जिनिटी ही बऱ्याच लोकांसाठी फार संवेदनशील गोष्ट आहे आणि हे चुकीचे आहे. याबाबत असे अनेक गैरसमज आहेत ज्यावर विश्वास ठेऊ नाय

१. फाटलेले हेमेन हे अपवित्रतेचे लक्षण

हेमेन म्हणजे स्त्रीच्या योनीच्या मुखा जवळील पातळ पडदा. हा पडदा फाटलेला असेल तर ती स्त्री अपवित्र मानण्यात येते. आणि हा पडदा एका स्त्रीच्या शुद्धतेबद्दल सांगतो असा समाज आहे परंतु स्त्रीची शुद्धता हे हेमनच्या अस्तित्वावर अवलंबून नसते काही स्त्रियांमध्ये हा पडदा जन्मतःच नसतो म्हणजे ती स्त्री अपवित्र झाली का ? या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे.

२. पहिल्यांदा संभोग करताना रक्तस्त्राव न होणे वाईट चारित्र्यचे लक्षण

पहिल्यांदा संभोग करताना जर हेमेन फाटून स्त्रीच्या योनीतुन रक्तस्त्राव झाला नाही तर स्त्रीने आधीच कौमार्य गमावले आहे आणि ती अपवित्र आहे. ही खुप चुकीची कल्पना आहे. सायकल चालवणे घोडेस्वारी करणे विविध खेळ खेळणे,विविध शाररिक हालचाली. या प्रकारांमुळे हेमेन आधीच तुटले असण्याची शक्यता असते. पाणी त्यामुळे जोडीदारांबरोबर बरोबर पहिल्यांदा संभोग करताना रक्तस्त्राव न होण्याची शक्यता असते

३. लग्नाआधी समागम करून कुटुंबाचे नाव तू बुडविले!

हेमेन हा शाररिक संबंध ठेवल्यामुळेच तुटतो असे नाही. तारुण्यात हस्तमैथुन केल्यामुळे देखील हेमेन तुटलेले असू शकतो. आणि आणि तज्ज्ञांच्या मते योग्य प्रमाणात करण्यात येणार हस्तमैथुन हा आरोग्यसाठी योग्य असतो. त्यामुळे यात देखील काही वावगे नाही.

४. हेमेन तुटताना असहनीय त्रास होतो

जर तुम्ही शाररिक आणि मानसिकदृष्ट्या समागमासाठी तयार असला तर ही क्रिया असहनीय नसते

आणि शेवटी….पण महत्वाचे
५. कौमार्य आणि स्त्रीचे पावित्र्य

कौमार्यचा आणि चारित्र्यचा संबंध लावणे हे चुकीचे आहे. हेमेन न तुटलेली स्त्री म्हणजेच समाजाच्या भाषेत कौमार्य न गमावलेली स्त्री हि अत्यंत पवित्र असते. आणि अश्याच स्त्रियांना पूर्वीपासून समाजाने आणि पुरुषांनी पवित्र मानले आहे आणि प्राधान्य दिले आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. 

 

Leave a Reply

%d bloggers like this: