सहजीवनास सुरवात करण्यापूर्वी भावी जोडीदाराबरोबर या गोष्टींबाबत चर्चा करा

एखाद्या व्यक्तीची आपण जोडीदार म्हणून निवड करतो आणि ज्यावेळी त्याच्या बरोबर संपूर्ण आयुष्य व्यतीत करायचे असते. अश्यावेळी सहजीवनाला सुरवात करण्यापूर्वी भावी जोडीदाराबरोबर काही गोष्टीवर चर्चा करणे गरजेचे असते. तसेच काही गोष्टीबाबत एकमेकांचे दृष्टिकोन माहिती असणे गरजेचे असते. ज्यामुळे तुमचे पुढील आयुष्य सुखकर होते.

स्वभाव

असे म्हणतात भिन्न स्वभावाच्या जोडीदारांशी चांगले जमते असे म्हणणे सोपे असते पण लग्नानंतर अशा दोघांनी सुखाचा संसार करणे कदाचित फार कठीण असू शकते .कारण एक जरा खूप बोलका असेक आणि ,लोकामध्ये पटकन लोकांमध्ये पटकन मिसळणारा असेल आणि एक शांत व एकलकोंडा स्वभावाचा असेल तर तुम्हाला पुढे खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे एकमेकांशी गप्पा मारा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करा आणि एकमेकांचा स्वभाव जाणून घ्या

करियर

तुमच्या दोघांचे करियर हे दोघांसाठी महत्वाचे असते. दोघांच्या करियर विषयी आणि कामाचे स्वरूप आणि वेळा याबाबत एकमेकांशी बोलणे गरजेचे असते. ज्यामुळे पुढील आयुष्यत अवघड जाणार नाही. याबाबत काही समस्या असतील तर त्यावर काही तडजोड करण्याची गरज असेल तर ती कशी करवी लागेल याबाबत बोलणे गरजेचे असते. तुमच्या पैकी कोण एकमेकांसाठी दुस-या शहरात जॉब करण्यासाठी तडजोड करु शकतो? मुले व घरातील इतर जबाबदा-या सांभाळून तुम्ही दोघे कशाप्रकारे एकमेकांच्या करियरला प्रोत्साहन देऊ शकता? या अशा अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नाबाबत तुम्ही लग्नाआधीच चर्चा केली तर पुढील आयुष्यात याबाबत गुंतागुंत निर्माण होणार नाही.

पर्सनल स्पेस-

प्रत्येकाला नात्यामध्ये स्वत:ची स्पेस व स्वालंबन हवे असते.जर तुम्ही तुमच्या सहजीवनाला सुरुवात करणार असाल तर आधीच याबाबत बोलून घ्या. आई-वडील बहीण-भावंडं,मित्रमैत्रिणी यांना किंवा स्वतःला काही वेळ द्यायला आवडत असले तर या तुमच्या पर्सनल स्पेस भावी जोडीदाबरोबर विषयी नक्की चर्चा करा. कारण सध्या एकमेकांना द्यायला वेळ नसतो म्हणून अनेक नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याची उदाहरणे आहेत.

आरोग्य

आपल्या होणाऱ्या जोडीदाराशी कुटुंबातील आरोग्यविषयक गोष्टी किंवा स्वतःच्या काही आरोग्य विषयक समस्याबाबत मोकळेपणाने चर्चा करा. या गोष्टी एकमेकांपासून लपवून ठेऊ नका. भविष्यातील समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी याबाबत चर्चा करणे आवश्यक आहे.जर तुम्हाला भुतकाळात एखादी शारीरिक अथवा मानसिक आरोग्य समस्या झाली असेल तर ती प्रामाणिकपणे सांगितल्यामुळे योग्य जोडीदार तुमचा मनापासून स्विकार करु शकतो.त्याचप्रमाणे आताही तुम्हाला काही आरोग्य समस्या असतील तर त्या त्यांना सांगितल्यामुळे कदाचित त्याच्या प्रेमामुळे त्या समस्येवर मात करणे तुम्हाला अधिक सोपे जाईल.

दोघांचे आई-वडील

लग्नानंतर सासरच्या मंडळीशी नेमके कसे वागावे याबाबत तुमचा गोंधळ उडू शकतो.त्यामुळे घरातल्याचे स्वभाव जाणून घ्या. तसेच लग्ननंतर मुलाच्या आई-वडिलांसोबत राहणार की वेगळा संसार थाटायचा याबाबत आधीच जोडीदाराबाबत याविषयी चर्चा करा. जर होणाऱ्या पत्नी जर एकुलती एक असेल आणि पत्नीच्या आईवडीलांना तुमच्यासोबत रहाण्याची व त्यांची काळजी घेण्याची स्थिती निर्माण झाल्यास तुम्ही काय कराल याबाबत आधीच चर्चा करणे आवश्यक आहे ज्यामुळे पुढे नातेसंबंधात समस्या निर्माण होणार नाहीत

        आर्थिक बाबी

लग्नाआधी एकमेकांच्या आर्थिक गोष्टीबाबत चर्चा करणे स्वार्थीपणाचं वाटत असले तरी ही आवश्यक गोष्ट आहे. कारण यावर तुमचे भविष्य निर्धारित असते. ही गोष्ट फारच व्यहवारीक वाटली तरी महत्वाची आहे. याबाबत लग्नाआधीच मोकळेपणाने बोललात तर तुम्हांला एकमेकांच्या वैयक्तिकखर्च,कर्ज,देणी याविषयी माहिती होईल आणि यावरून तुमच्या भविष्यातील आर्थिक गोष्टीबाबत नियोजन करु शकता. 

देवबाबत संकल्पना आणि श्रद्धास्थाने

दोघांच्या देवबाबतच्या संकल्पना काय आहेत दोघांची श्रद्धास्थाने जाणून घेणे आवश्यक आहे. या गोष्टी तुम्ही एकमेकांना लग्नाआधी भेटता तेव्हा जाणून घेण्याचा प्रयत्न करा.असे असल्यास तुम्ही दोघे एकमेकांच्या श्रद्धांचा आदर करू शकाल.

मुले

तुम्हाला दोघांचे मुलांबाबत काय मत आहे. दोघांना मुले हवी आहेत की नको आहेत?किती मुले हवी तुमच्या दोघांपैकी कोणी एकाला मुल दत्तक घेण्यात रस आहे का? याबाबत जोडीदाराचे मत काय आहे हे जाणून घ्या. लग्नाच्या किती दिवसांनी वर्षांनी मुलाचा विचार करायचा हे चर्चेने ठरावा आणि त्या दिशेने पावले उचला. यामुळे करियरमध्ये येणाऱ्या ब्रेकचा आर्थिक बदलांचा विचार करा.

लग्नाआधी वरील गोष्टबाबत जोडीदाराशी चर्चा केल्याने दोघांचे दृष्टिकोन एकमेकांना कळतील आणि या सर्व गोष्टींचा तुम्हांला भावी सहजीवनात सुखी होईल 

Leave a Reply

%d bloggers like this: