गरोदरपणात प्रावास करताय ? या गोष्टींचा लक्षात ठेवा

१. सहलीचे ठिकाण

गरोदरपणात छोट्याश्या सुट्टीवर जाताना असे ठिकाण निवडा जिकडे जायला जास्त प्रवास करावा लागणार नाही,तसेच ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी जर काही तब्येतीची समस्या निर्माण झाली तर अगोदर हॉस्पिटल ,औषध दुकान याची काही सोय आहे का याचा नेटवरती शोध घेऊन घ्या. ज्या ठिकाणी डास,माश्या असतील अशा ठिकाणी जाण्याचे टाळावे, कारण त्या ठिकाणी मलेरिया, झिका, डेंग्यू यांचा धोका असतो. अगदीच डोंगराळ भागात जाऊ नये.

२) प्रवासाचे नीट नियोजन करा

जर तुम्ही नियोजन करून प्रवास करातर तुमचा त्रास व वेळही वाचेल. प्रवासाला जाताना कोणत्या वस्तू बरोबर घ्यायच्या त्याची यादी करून घ्या, यामुळे तुमचा प्रवास आनंदी होईल. गरोदरपणात मळमळणे, थकवा, किंवा घाबरल्यासारखे वाटते. आणि प्रवास करताना सोबत उशी घ्यावी, पाठ दुखण्याच्या समस्येसाठी उपयोगी होईल.

३) डॉक्टरांचा सल्ला आणि फाईल सोबत घ्यावी

गरोदरपणात प्रवासाला जायच्या आधी प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा त्यांचा सल्ल्याने प्रवास करावा. त्यानंतर तुम्ही प्रवासाला कुठेही जाणार असला तरीही, डॉक्टरांनी दिलेली फाईल, मेडिकल नोट सोबत घ्या. जेणेकरून काही समस्या निर्माण झालीच तर तिथल्या डॉक्टरांना ती दाखवता येईल. जवळ कुठे क्लिनिक आहे त्या बाबत नेट वरती शोध घेऊन ठेवा. जर तुम्ही आरोग्यविमा काढला असेल तर त्याची कागद सोबत घ्या.

४) आहाराबाबत समझोता नको

गरोदर मातेने प्रवासात सहलीच्या ठिकाणी पोहचल्यावर देखील आपल्या आहाराबाबत कोणत्याही प्रकारचा समझोता करू नये व दररोज ८ ते १२ ग्लास पाणी प्यायला हवे, त्यामुळे डिहायड्रेशन होणार नाही . जेव्हा तुम्ही खाण्याच्या वस्तू घ्याल त्यात फळे, सुकामेवा हे देखील बरोबर घ्या. प्रवासात तेलकट, आणि उघड्यावरचे खाणे शक्यतो टाळा.

५) आवश्यक वस्तू सोबत घ्या

गरोदरपणात स्वतःला आरामात ठेवणे आवश्यक असते. सैलसर कपडे, बूट, घ्यावी. वाटल्यास ब्लिस्टर पॅड घेऊन ठेवा कारण बऱ्याचदा बूट घातल्यामुळे पायाला सूज येते. थंड ठिकाणी जाणार असाल तर गरम कपडे बरोबर ठेवावेत.

६) आराम घेत राहा

सहलीच्या ठिकाणी गेल्यावर खूप स्थळे पाहाविशी वाटतात. पण लक्षात ठेवा तुम्ही गरोदर आहात. तेव्हा दिवसातून काही वेळ आराम करा. जेणेकरून तुम्ही त्या सहलीला खूप एन्जॉय कराल. सहलीच्या ठिकाणी गेल्यावर खूप स्थळे पाहायची वाटतात. पण लक्षात ठेवा तुम्ही गरोदर आहात. तेव्हा दिवसातून काही वेळ आराम करा. जेणेकरून तुम्ही त्या सहलीला खूप एन्जॉय कराल. 

Leave a Reply

%d bloggers like this: