तुमच्या बाळाच्या नाजूक शारीरिक भागांची स्वच्छता . . . भाग २

          आई होण्याचा आनंद वेगळाच असतो पण त्याचसोबत आपल्यावर नवीन जबाबदाऱ्या आणि काही नाजूक कामे करण्याची वेळ देखील येते. नवजात बाळाला सांभाळणे हे सोप्पे काम नव्हे! तुम्हाला बाळाची योग्य अशी काळजी घ्यावी लागते. त्याच्या वेळा पाळाव्या लागतात. बाळ गोंडस हसते आणि सोबतच त्याच्या या हसण्यासाठी आपल्याला त्याच्याकडे भरपूर लक्ष द्यावे लागते त्याची काळजी घ्यावी लागते, बाळाला एकटे सोडून चालत नाही. भूक लागली की बाळ रडते, जेवतांना अर्धे अन्न तोंडातून खाली सांडते, त्याच्या खेळण्याचा पसारा घरभर पसरलेला असतो. बाळाची काळजी घेणे अवघड काम असले तरीही त्याच्या शरीराची योग्य स्वच्छता ही सगळ्यात महत्त्वाची आणि टाळता न येणारी बाब आहे, कारण ह्याचा परिणाम थेट बाळाच्या आरोग्यावर होतो.

हात आणि पाय

बाळाचे हात आणि पाय बाहेरच्या अशुद्ध वातावरणास जास्त उघडे असतात. त्यावर धूळ बसणे साहजिक आहे. यामुळे बाळाची त्वचा रुक्ष होऊ शकते. आईने हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की चेहेर्याच्या त्वचेप्रमाणे बाळाचे हात आणि पाय यांनादेखील मोइश्चर करणे गरजेचे असते. मदर स्पर्श चे वॉटर बेस्ड वाइप्स हे ९८% पाण्याने बनवलेले आहेत. बाळाचे शरीर पाणी आणि कापूस याने स्वच्छ करण्यासारखेच ह्याचे परिणाम आहेत. तुम्ही या वाइप्सद्वारे बाळाच्या अंगाला मसाज देखील करू शकता. यातील ओलावा टिकवून ठेवणारे घटक बाळाची त्वचा स्वच्छ करण्यासोबतच मुलायमही करतात.

रुक्ष झालेले गुडघे किंवा हाताचे कोपरे बाळाला त्रासदायक ठरतात. या वाइप्सद्वारे ते रुक्ष न पडण्यास मदत होईल.

टीप – रुक्ष त्वचा साहजिकच खाजवते. बाळाने खाजवून स्वतःला इजा करू नये म्हणून त्याचे हातांचे कोपरे या वाइप्स ने साफ करायला विसरू नका.

जननेंद्रिये

बाळाच्या शरीराचे जननेंद्रिये स्वच्छ ठेवणे हे सर्वात महत्वाचे आहे कारण इथे इन्फेक्शनचा धोका जास्त असतो. तुम्ही वाइप्स चा वापर करून बाळाने शी किंवा सु केल्यानंतर लगेच ही जागा स्वच्छ करून घेणे गरजेचे आहे.

जर तुमचे लहान बाळ मुलगा असेल तर बाळाच्या लिंगाभोवतीची जागा हळुवारपणे या वाइप्सने साफ करून घ्या. बाळ अजून लहान आहे, त्याच्या लिंगाभोवतीची त्वचा अजून विकसित झालेली नसते. वरची त्वचा एका टीश्युद्वारे लिंगाला जोडलेली असते. त्यामुळे हा भाग घासून स्वच्छ करू नका. आणि लिंगाला सांभाळून स्वच्छ करा कारण यातून बाळाला इजा होण्याची शक्यता आहे.

जर तुमचे बाळ लहानशी मुलगी असेल तर तिच्या बाबतीत जास्तीची स्वच्छता घ्यावी लागेल. तिच्या योनीचे दोन्ही ओठ पुढून मागेपर्यंत वेगवेगळे स्वच्छ करा. यासाठी तुम्ही वॉटर बेस्ड वाइप्स वापरू शकता. तिच्या जननेन्द्रीयांची स्वच्छता नाजूकपणे झाली पाहिजे.

या वाइप्स मध्ये पाणी साल्यामुळे तुम्हाला चिकट भाग सहज स्वच्छ करता येतो. आता बाळाच्या स्वच्छतेसाठी दरवेळी ओले कापड करण्याची गरज नाही. जन्तु-विरहित आणि पाण्याचा जास्त वापर असलेले वाइप्स तुमच्या मदतीला आहेतच.

मदर स्पर्शच्या या वाइप्स मध्ये ९८% पाणी आहे आणि प्रयोगशाळेतील परीक्षेद्वारे यामुळे कोणतीही अॅलेर्जी होत नाही हे देखील सिद्ध आहे. या वाइप्सचा वापर लालपणा, चिकटपणा आणि बाळाची रुक्ष त्वचा साफ करून त्याला मुलायम करण्यासाठी होतो.

तर आता बाळाच्या अंगावर नको असलेल्या त्या लालसरपणाला सहज निरोप दया !

हॅलो मॉम्स… आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया… हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

Leave a Reply

%d bloggers like this: