तुमच्या बाळाच्या नाजूक शारीरिक भागांची स्वच्छता

तुमच्या बाळाच्या नाजूक शारीरिक भागांची स्वच्छता

बाळाच्या या स्वच्छतेचा विषय आला की आजकालच्या माता बेबी वाईप्स चा वापर करणे पसंत करतात. या वाईप्स वापरायला सोप्प्या आणि सोयीस्कर असतात. कोणताही चिकट पदार्थ लगेच पुसण्यासाठी ह्याची मदत होते. खास करून तोंडातले अन्न बाळ बाहेर टाकते तेंव्हा आणि लाळ पुसण्यासाठी ह्याचा वापर सोयीस्कर आहे. यातून द्रव लगेच शोषले जाते.

बाळाची त्वचा आपल्या त्वचेपेक्षा खूप नाजूक आणि मुलायम असते त्यामुळे त्याच्यासाठी वापरले जाणारे कोणतेही प्रोडक्ट हे सांभाळून निवडा. अल्कोहोल, केमिकल, किंवा पराबीनस असलेले प्रोडक्ट वापरणे टाळा. ज्या वाईप्स ‘वॉटर बेस्ड ‘आहेत त्याचाच वापर करा.

काय आहेत वॉटर बेस्ड वाईप्स ?

या वाइप्स बाळांसाठी उत्तम असतात. यात कोणत्याही केमिकल चा वापर होत नाही. पाणी हे जगातले सगळ्यात मुलायम द्रव आहे आणि याचे कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत. त्यामुळेच हे वॉटर बेस्ड वाइप्स वापरणे योग्य ठरते.

यात मुख्यत्वे जोजोबा आणि ओलिव्ह ओईल यांचा वापर तसेच कोरफडीच्या गारच वापर होतो. त्यामुळे त्वचेचा ओलावा टिकून राहतो.

मदर स्पर्श यांच्या ज्या वाइप्स आहेत त्यामध्ये ९८% शुद्ध पाणी असते. पाण्याच्या वापरामुळे हे माऊ आणि सुरक्षित ठरते. यातील नैसर्गिक घटकांमुळे बाळाच्या नाजूक त्वचेवर कोणत्याही प्रकारची अॅलर्जी किंवा रॅश येणार नाही याची काळजीही घेतली जाते.

खाली दिलेल्या पद्धतींचा वापर करून या वाइप्सद्वारे तुम्ही बाळाच्या नाजूक शारीरिक अंगांची स्वच्छता करू शकता.

बाळाचे पोट (गर्भनाळ जोडणी)

बाळाच्या पोटावर बेंबीच्या जागी असणारी गर्भनाळ जोडणी ही सुकून आपोआप पडून जात असते. ह्या नाळेची जागा स्वच्छ राहिली पाहिजे. तिथे ओलावा आल्यास इन्फेक्शन होऊ शकते. या भागाला साफ करतांना खास काळजी घ्या. या वाइप्सने आजूबाजूची जागा हळुवार पुसून घ्या. स्वस्त किंवा कमी दर्जाचे वाइप्स घेणे हा प्रश्न नाही, परंतु प्रत्येक आईला माहित असावे की बाळाच्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी काय योग्य आहे व काय अयोग्य आहे.

चेहरा

बाळाच्या चेहेर्यावरच्या त्वचेतील ओलावा टिकून राहिला पाहिजे म्हणजे चेहेरा पांढरट आणि लाल नाही पडणार. बाळाची त्वचा ओलावा धरून असली की माऊ राहते. वॉटर बेस्ड वाइप्स वापरून तुम्ही सहज आणि हळुवारपणे बाळाचा चेहेरा आणि तोंड साफ करू शकता.

डोळ्याच्या जवळचा भाग धुळीपासून दूर राहावा म्हणून खास काळजी घ्या. डोळ्याच्या कडेला घाण जमा होते ती नीट पुसा. यासाठी हाताच्या बोटांचा वापर करू नका, वाइप्स जास्त सुरक्षित आणि प्रभावी आहेत.

बाळाचे कान देखील स्वच्छ ठेवणे गरजेचे असते. खास करून बाळाला स्वच्छ करतांना किंवा पावडर लावतांना त्याच्या कानामागील भाग दुर्लक्षित राहतो. वाइप्स द्वारे कान, डोळे, ओठांवरील त्वचा यांवरील अस्वच्छता सांभाळून हळुवार स्वच्छ करा.

ह्यानंतर हात-पायांची स्वच्छता आणि जननेंद्रिये ह्यांची स्वच्छता कशी करावी ते तुम्ही पुढच्या भागात बघू शकता. ह्या ब्लॉगचा पुढचा भाग आजच ४: ४५ ला येणार आहे तुम्ही तो वाचू शकता.  

Leave a Reply

%d bloggers like this: