काळ्या मिरीचे आरोग्य विषयक हे फायदे तुम्हांला माहिती आहेत का ?

स्वयंपाकात घरात वापरण्यात येणारे मसाले आणि त्यातले घटक हे फक्त जेवणाची लज्जत वाढवण्यासाठीच असतात असे नाही तर या मसाल्यातील घटकांचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक उपयोग असतात. या मसाल्यामधील काळी मिरीचे अनेक औषधी उपयोग आहेत. काळ्या मिरीत लोह, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, मँगनीज, झिंक, क्रोमियम, ‘ए’ जीवनसत्त्व आणि ‘सी’ जीवनसत्त्व याबरोबरच इतरही अनेक पोषक द्रव्ये असतात. मूलतः गरम असणाऱ्या या काळ्याकाळी मिरीचे योग्य प्रमाणातील सेवन आरोग्यासाठी उपयुक्त असते

१.स्तनाचा कर्करोग

एका संशोधनानुसार स्तनाचा कर्करोग रोखण्यासाठी काळ्या मिरीचा खूप फायदा होतो.. काळ्या मिरीचे नियमित सेवन केल्यास स्तनाच्या कर्करोगाच्या गाठी तयार होऊ शकत नाहीत. काळ्या मिरीमध्ये सी विटामिन्स, ए विटामिन्स, फ्लॅवोनाईडस्, कॅरोटिन्स आणि अँटिऑक्सिडंट असतात. त्यामुळे कर्करोग रोखण्यास मदत मिळते.

२. अपचन आणि जुलाब अश्या पचन विषयक समस्या

अपचन, जुलाब, तसेच बद्धकोष्ठता यावरचा उपाय म्हणूनही काळी मिरी सेवन करता येते. त्यामुळे पचनशक्ती वाढते. काळ्या मिरीमुळे तोंडाला चव येते. काळ्या मिरीच्या सेवनाने पोट फुगणे, अपचन, जुलाब, बद्धकोष्ठता दूर होते. यासाठी ताकमध्ये थोडी काळी मिरी पावडर आणि काळे मीठ घालून दुपारी जेवणानंतर सेवन करावी

३. पोटातलं गॅसेस

पोटात वायू झाला असेल, तर काळी मिरी त्यावर इलाज आहे. काळ्या मिरीत वातहर गुण असतात, त्यामुळे काळ्या मिरीचे सेवन केल्याने पोटात वायू साठून राहू शकत नाही, तो सहजपणे सुटा होतो. काळ्या मिरीमुळे पोटात वायू होण्याची समस्या प्रभावीपणे दूर होते. त्याशिवाय पोट फुगले असल्यास किंवा पोट दुखत असल्यास काळ्या मिरीचे सेवन केल्याने आराम मिळतो.

४. वजन कमी करण्यासाठी 

काळी मिरी नियमितपणे सेवन केल्यास वजनावर नियंत्रण ठेवता येते. त्यातील फायटोन्यूट्रियंटस्मुळे चरबीचा बाह्य थर मोडण्यास मदत होते, त्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही. या प्रक्रियेत शरीराला अधिक घाम येतो,सारखे लघवी ला जावे लागते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जाऊन वजन कमी होते.

५. त्वचेसाठी उपयुक्त

काळ्या मिरीचा चेहर्‍याला स्क्रब म्हणून वापर केल्यास, त्वचा चमकते आणि या स्क्रबमुळे त्वचेवरील मृत त्वचा निघून जाण्यास मदत मिळते, तसेच त्वचेचे पोषणही होते. त्याचबरोबर रक्ताभिसरणही नियमित होते, ज्यामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत होते. मात्र, चेहर्‍यावर मिरीचा वापर करताना कमी प्रमाणात आणि काळजीपूर्वक वापरावा. खुपच नाजूक प्रकारची त्वचा असणाऱ्यानी याचा वापर टाळावा. या स्क्रबचा काली मिरी बारीक करून घ्यावी पण एकदम मऊसर बारीक न करता थोडी जाडसर

६. सर्दी आणि खोकला

सर्दी, कफ आणि नाक चोंदणे या त्रासात काळ्या मिरीने आराम मिळतो. खोकला कमी होण्यास मदत होते. सर्दीमुळे नाक वाहत असल्यास काळ्या मिरीचे सेवन केल्याने आराम पडतो. कफ, छातीतील कफ यावरही मिरीचा फायदा होतो. अतिसर्दी झाल्यास काळी मिरी आणि लसूण एकत्र करून खावा. तसेच गरम दुधाबरोबर काळी मिरी घेतल्यास फायदा होतो .

७. भूक वाढवण्यास मदत

भूक लागत नसल्याची तक्रार असेल,काळी मिरी घातलेले अन्न ग्रहण करावे. त्यामुळे भूक लागते. काळ्या मिरीमुळे पदार्थांतील सर्वच पोषक तत्त्व शोषून घेतात आणि शरीराला पोषक तत्त्वही मिळतात. तर काळी मिरी असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश असले तर अन्नाचे पचन योग्य पद्धतीने होते.

८. नैराश्य कमी होते.

.आपण तणाव किंवा नैराश्यग्रस्त असाल, तर काळ्या मिरीचे नियमित सेवन करावे. त्यामुळे तणाव दूर राहण्यास मदत होते. नियमित आहारात काळी मिरी समाविष्ट केल्यास शरीर तंदुरुस्त राहते. त्यामुळे व्यक्तीच्या डोक्यात नकारात्मक विचार येत नाहीत.

काळ्या मिरीचे आरोग्यविषयक इतके उपयोग असले तरी मूलतः काळी मिरी उष्ण असते. तिचे सेवन करताना एकतर तिचा आहारातील पदार्थात समावेश. जसे सॅलड/कोशींबिरमध्ये थोडी मिरपूड भुरभुरावी, ताकात थोडीशी मिरपूड आणि काळे मीठ टाकलेले ताक प्यावे, किंवा कधी कधी वरतून तिखाडी टाकताना लाल तिखटाच्या ऐवजी मिरपूड टाकावी. मध्ये आणि नुसता उपयोग करताना काळजीपूर्वक आणि योग्य प्रमाणात करावा. 

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Reply

%d bloggers like this: