गरोदर असताना या गोष्टी टाळा

गर्भारपण हे अशी वेळ असते, या काळात तुमच्या कोणत्या कृतीचा परिणाम हा दोन जिवांवर होणार असतो. ते ९ महिने बाळ तुमच्या पोटात असते तो काळ तुमच्या आयुष्यातील नाजूक आणि महत्वाचा असतो. जो तुम्हांला आयुष्यभर लक्षात राहणारा असतो. या काळात तुमच्या खाण्याचा-पिण्याचा वागण्याचा सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्या बरोबरच तुमच्या बाळावर होणार असतो. त्यामुळे तुमच्या दोघांच्या आरोग्यासाठी काही चुका करणे टाळावे

१. दोन जेवणांमध्ये जास्त अंतर ठेवणे.

गरोदर स्त्रीने दोन जेवणाच्या मध्ये जास्त अंतर ठेवू नये. आणि एखाद्या वेळी न जेवणे हे त्या स्त्रीच्या आणि पोटातील बाळ या दोघांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. गरोदर स्त्रीने दिवसातून ३-५वेळा थोडे थोडे खाणे गरजेचे असते. या आहारात पोषकतत्वे असलेले आहार घेणे आवश्यक आहे.

२. या काळात होणाऱ्या खाण्याच्या इच्छा

मान्य आहेत या काळात विविध गोष्टी, कोणत्याही वेळी खाण्याची इच्छा होऊ शकते. पण हे कधी-कधी ठीक आहे. परंतु डोहाळ्यांच्या नावाखाली सतत पिझ्झा-बर्गर सारखे जंक फूड खाणे तुमच्या आणि होणाऱ्या बाळाच्या आरोग्यास समस्या निर्माण करू शकतात

    ३. कॉफीचे अति सेवन

कॉफीचे व्यसन हे खुप लवकर लागू शकते. परंतु या काळात तुमच्या आरोग्यासाठी आणि बाळाच्या आरोग्यासाठी कॉफीचे अति सेवन टाळा. त्या ऐवजी काही इतर आरोग्यदायी पर्यायच निवड करा जसे,दूध, उकळा, लेमन टी

४. योग्य प्रमाणात पाणी न पिणे

योग्य प्रमाणात पाणी न प्यायल्यामुळे तुमच्या आरोग्यावरच परिणाम होईल असं नाही तर कमी प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे तुमच्या गरोदरपणात आणि प्रसूतीमध्ये समस्या येण्याची शक्यता असते म्हणून डॉक्टर या काळात योग्य प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला देतात

५. योग्य प्रमाणात झोप न घेणे

या काळात वेळेत झोपून पुरेशी झोप घेणे आवश्यक असते. त्यामुळे तुम्हांला प्रसन्न तर वाटतेच. पण पिट आणि अपचन या सारख्या गोष्टी होत नाहीत.

६, बिलकुल हालचाल न करणे

तुम्हांला या काळात कोणी धावण्याची शर्यत लावायला नाही सांगत पण. तुम्हांला थोडे तरी चालणे किंवा घरातील छोटी-मोठी कामे करावे . हे आरोग्यसाठी चांगले असते, यामुळे तुम्हांला प्रसूती दरम्यान होणारा त्रास कमी होईल

७. धुम्रपान आणि मद्यपान  

 

 

गरोदरपणात धुम्रपान आणि मद्यपान हे कटाक्षाने टाळावे यामुळे तुमच्या आरोग्यवर तर परिणाम होतोच आणि जन्माला येणाऱ्या बाळांमध्ये जन्मजात विविध समस्या निर्माण होतात.

Leave a Reply

%d bloggers like this: