जाणून घ्या योनिस्रावाचा रंग तुमच्या आरोग्याविषयी काय सांगतो!

योनीमधून निघणारा स्त्राव हा किशोर वयापासून ते ४० वर्षाच्या स्त्रियांमध्ये महत्वाची भूमिका बजावत असतो. कारण ४० वर्षानंतर स्त्रीची प्रजजन शक्ती आणि क्षमता कमी होऊन जाते. मोनोपॉज च्या स्थितीत जात असते. आणि तुम्हाला माहिती आहे का ? की, योनीचे ज्या काही समस्या असतील त्यासाठी महिला डॉक्टर तुम्हाला मासिक पाळी आणि योनी स्त्राव विषयी प्रश्न विचारत असते. त्यामुळे एक स्वस्थ व निरोगी स्त्री साठी योनी स्त्राव किती महत्वाचा आणि त्याविषयी काही गोष्टी जाणून घेणे प्रत्येक स्त्रीला आवश्यक आहे.

योनी स्त्राव नेमके काय असते ?

योनी मधून निघणारा स्त्राव हा : cervix आणि योनी मधून स्त्रवणाऱ्या मिश्रणाला म्हटले जाते. हा योनी स्त्राव प्रत्येक स्त्रीला येत असतो. आणि हा गंध नसलेला आणि पांढरा रंगाचा असतो.

योनी स्रावांमधून आजार किंवा काही संसर्ग झाला असे कसे समजते ?

योनी स्त्राव सामान्यतः गंध नसलेला आणि पांढरा असतो. पण जर ह्याचा रंग आणि गंध बदलेला दिसलाच तर त्यावरून असा संकेत मिळतो की, त्या स्त्रीला काहीतरी संक्रमण किंवा संसर्ग झालेला आहे.

खूप गर्द पांढरा स्त्राव असेल तर

सामान्यतः योनी स्त्राव पांढरा आणि लगेच वाहून जाणारा असतो. पण जेव्हा ह्याचा पोत(टेक्सचर) खूप गाढ आणि गर्द होत असेल आणि तो पनीर सारखा दिसत असतो. ह्याचा अर्थ असा आहे की, स्त्रीला यीस्ट (yeast) सारखे इन्फेक्शन झाले असेल.

भुरा किंवा लालसर रक्तासारखा स्त्राव
 

हा मासिक पाळीच्या अगोदर किंवा त्यानंतर एक दोन दिवसात होणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. पण जर तुम्ही मासिक पाळीची तारीख पार करून गेल्या असतील तर काहीतरी समस्या असू शकते.

आणि जर तुम्ही गर्भवती आहात आणि विना प्रोटेक्शन समागम केले असेल तर हे प्रेगनेंसी चे संकेत असू शकते. किंवा याच्या व्यतिरिक्त हे मिसकैरेजच्या वेळेलाही होऊ शकते की, ज्यावेळी काही कारणास्तव गर्भाशयात गर्भ थांबत नाही आणि रक्त योनी मार्गावरून वाहून जाते.

पिवळा योनिस्राव ?

हे सामान्यपणे बैक्टेरियल इंफेक्शन चे लक्षण असू शकते. ह्याच्या बरोबर पिवळ्या स्त्रावामधून घाण वास, आणि खूप वास येत असतो. संसर्गाचे दुसरे कारण काही यौन व्यक्ती बनवणे आणि त्यांच्यासोबत स्त्री असुरक्षित समागम करते म्हणून. जौंडिस मधेही secretions (स्त्राव) चा रंग बदलून जातो. ज्यात पिवळा योनी स्त्राव सामील आहे.

हिरवा योनी स्त्राव ?

हिरवा योनिस्राव निश्चितपणे आजारी असण्याचे लक्षण आहे. कारण शरीरात कोणताच स्त्राव हिरवा रंगाचा नसतो.

जर तुम्हाला लघवी करताना तुम्हाला आगीसारखे वाटत असेल, खाज येत असेल, तर तुम्ही डॉक्टरांना भेटायला हवे.

जर ह्या व्यतिरिक्त काही समस्या असतील तर तुम्ही स्त्री रोग तज्ज्ञ् ला भेटून विचारून घ्या. 

Leave a Reply

%d bloggers like this: