डिलिव्हरीच्या वेळी किती, कसा, आणि केव्हा जोर (Push) लावायचा !

डिलिव्हरीच्या वेळी किती जोर लावावा लागतो आणि त्या वेळेची स्थिती विषयी गरोदर स्त्रीला भीती असते. विशेषतः पहिल्या वेळी डिलिव्हरी असणाऱ्या स्त्रीला जास्त वाटते. आणि ह्यांनी ९ महिने खूप चढ – उतार अनुभवले असतात आणि आता लेबर पेन मुळे त्यांना त्रास असह्य होत असतो. आणि डिलिव्हरी जितकी त्रासदायक व वेदनादायी असते पण बाळाला पाहिल्यावर सर्व त्रास व वेदना लगेच पळून जाते. हा जगातला एकच क्षण असतो की, त्यात वेदना व त्रास फक्त बाळाला पाहिल्यावर चालला जातो. इतके निर्मळ प्रेम व स्वार्थरहित प्रेम आईचे असते. तेव्हा ह्या ब्लॉगमधून आपण डिलिव्हरीच्या वेळी कसे, किती जोर लावावा लागतो त्याविषयी जाणून घेणार आहोत.

लेबर पेन चे तीन स्टेज (अवस्था) असतात ?

१. जेव्हा लेबर पेन सुरु होतो, आणि सर्विक्स पसरत जाते.

२. दुसऱ्या स्टेज मध्ये डिलिव्हरी होत असते.

३. आणि तिसऱ्या अवस्थेत डार्क ब्लड सोबत प्लेसेंटा बाहर येतो.

आणि ह्याचवेळी गरोदर स्त्रीला भीती वाटते की, ह्यावेळी लघवी किंवा मल बाहेर निघून जाईल. आणि ह्याचवेळी डॉक्टर जोर लावायला सांगतात. आणि म्हणून एक लक्षात घ्या जोर लावताना मल-मूत्र निघून जाईल ह्याचा विचार करू नका. तुम्ही जसे होईल तसा जोर लावा. आणि काहीवेळा ह्यासाठी डॉक्टर एनिमा देत असतात किंवा नर्स सर्व गोष्टी सांभाळून घेतात. आणि लेबर रूम सुद्धा असतात. म्हणून ह्याबाबत कधीच घाबरू किंवा शरमून जाऊ नका.

किती आणि केव्हा जोर लावावा लागतो ?

१. प्रसूतीच्या वेळी तुम्हाला स्वतःलाच अंदाज यायला लागतो किती आणि केव्हा जोर लावावा लागेल कारण तुमच्या बाळाचा डोक्याचा दबाव तुम्हाला स्पष्ट जाणवत असतो. आणि तेव्हा तुम्हाला आपोआप जोर लावण्याची इच्छा वाटते. आणि ह्याबाबत खूप स्त्रियांना भीती वाटते की, मी जोर लावू शकते की नाही. आणि जर तुम्हाला एपिड्युरल दिलेले असेल तर जोर लावण्याची तितकी गरज राहत नाही.

२. आणि तुम्हाला ह्यावेळी काहीच सुधरत नसेल तर घाबरू नका डॉक्टर तुम्हाला सांगतात की, किती जोर लावायचा आणि कसा. आणि पहिली डिलिव्हरी असेल तर थोडा वेळ लागेल आणि निसर्ग असा आहे की, त्याने त्या त्या वेळी खूप शक्ती स्त्रीला दिली आहे. तशीच ह्यावेळी तुम्हाला मिळत असते. म्हणून घाबरून जाऊ नका.

३. दुसरी डिलिव्हरी असेल तर जास्त वेळ लागत नाही. आणि तुम्हाला अनुभव असल्याने तितका त्रास होत नाही.

कसा जोर लावता येईल ?

१. बाळाला बाहेर येऊ देण्यासाठी जोर लावताना श्वास रोखून ठेवायचा नाही. प्रसूती ला सोपे होऊ देण्यासाठी श्वास घेत राहावे, थोडा – थोडा श्वास घाई आणि जोर लावायचा.

२. गुरुत्व बल बाळाला बाहेर काढण्यात मदत करत असते म्हणून डॉक्टर सरळ आणि खाली निजायला सांगत असतात. आणि ह्यात जर तुम्हाला कोणाची मदत हवी असेल तर नर्सला सांगू शकतात.

३. जोर लावण्यावेळी तुम्ही खूप थकून गेल्या असतील आणि तुम्हाला कुशीवर झुकायचे असेल तर डाव्या बाजूला जाऊ शकता. पण एकदा डॉक्टरांना विचारून घ्यावे.

४. आणि बाळाला जन्म देण्याच्यावेळी खालच्या बाजूला बघावे. हे पहिल्या वेळी आई होणाऱ्या आईला कठीण जाईल पण ह्यामुळे तुम्ही जोर चांगला लावू शकता.

५. जर आणखी तुम्हाला प्रसूतीच्या वेळी आत्मविश्वास पाहिजे असेल तर गरोदरपणात तुम्हाला जोर लावण्याचा सराव डॉक्टर करायला लावतात तो तुम्ही करू शकतात.

आणि ठामपणे विश्वास ठेवा तुमची प्रसूती सुखकर होईल.  

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Reply

%d bloggers like this: