३ महिन्याचा बाळाचा विकास

१. तुमचे बाळ हसायला लागते.
२. ते तुम्हाला हळूहळू ओळखायला लागतात.
३. आता त्यांना खेळायला आवडायला लागते आणि तोंडातून बोलता येत नाही पण प्रयत्न करायला लागतात.
४. हळूहळू ते स्वतःची मान पकडायला लागतात आणि पोटावरून रांगायला लागतात.
५. ते हाताचा आणि डोळ्यांचा एकत्रित उपयोग करायला लागून जी वस्तू पाहिली तिच्याकडे आकर्षित होऊन हात लावतात.
६. आणि महत्वाचे म्हणजे तुम्हाला ते दुरून ओळखून घेतात.
७. ह्यावेळी त्याची हात वस्तू धरायला तितके परिपक्व राहत नाही. पण हात आहेत ह्याची जाणीव व्हायला लागते.
४ ते ७ महिन्याचा बाळाचा विकास

१. तुमचे बाळ आता खेळकर, हसणारे, आणि खट्याळ होऊन जाते.
२. आता आरामाने पोटावर रांगून इकडे – तिकडे फिरायला लागतो.
३. आता तो तुमच्या मदतीविना बसायचा प्रयत्न करतो. आणि खेळण्यासोबत खेळण्याचा प्रयत्न करतो.
४. बाळ तुमचा आवाज समजून तसा प्रतिसाद द्यायला लागतो आणि तुम्ही नाही किंवा हो बोललेले समजते.
५. त्याला जेही नाव ठेवले असेल ते बोलल्यावर मागे वळून बघतो.
६. आरशासमोर स्वतःलाच बघून घाबरतो. त्यावेळी त्याचा चेहरा पाहायचा.
८ ते १२ महिन्याचा बाळाचा विकास

१. आता बाळ खूपच खट्याळ होऊन नक्कल करायला लागते.
२. तो उठण्याचा आणि चालण्याचा प्रयत्न करू लागतो आणि बरेच बाळ ह्या दिवसात चालायलाही लागतात.
३. आता त्याचे बोल स्पष्ट व्हायला लागून तुम्ही त्यावर हसतात.
४. ते वस्तू उचलू शकतात.
५. आता बाळाचे जेवणही वाढून जाते. आणि तो खायलाही नाटके करू लागतो.
६. आताची बाळ मोबाईल ऑपरेट करण्याचा प्रयत्न करू लागतात.
७. आई, वडील, आजी, आजोबा, काका, काकू, भाऊ, बहीण सर्वाना ओळखायला लागतात.

बाळ आता जास्त मोठा होण्याचा प्रयत्न करू लागतो. पण ह्यात एक गोष्ट लक्षात घ्या की, सर्वच बाळ एकाचवेळी सर्वच शिकत नाही. काही बाळाचे दात वर्षभरातही येत नाही, आणि काही बाळांचे सहा महिन्यात, काही बाळ वर्ष होऊनही चालत नाही तर काही धावायला लागतात तेव्हा बाळ वेळेनुसार सर्वच शिकून जातात फक्त ते वेळ घेतात म्हणून ‘ माझा बाळ अजूनही चालत नाही, दात आले नाहीत.’ तेव्हा थोडं संयम ठेवा ही बाळ १ वर्षानंतर स्वतःला खूप जास्त विकसित करून घेतात म्हणून स्वतःच्या बाळाविषयी न्यूनत्व बाळगू नका.