वजन कमी होण्याचा आणि रजोनिवृत्तीचा काही संबंध असतो का ? असा प्रश्न काहींना पडतो पण ह्या संदर्भात असे संशोधन आले आहे की, ज्या स्त्रियांचे वजन खूप कमी असते त्यांना ह्या समस्येचा सामना करावा लागतो. आणि हे संशोधन ‘ह्य़ुमन रिप्रॉडक्शन’ ह्या प्रतिष्ठित नियतकालिकात ह्याबाबत माहिती देण्यात आली आहे. तेव्हा ह्या संशोधनाविषयी नेमके जाणून घेऊ.
१) तरुणवयापासून ते वयाच्या तिशीपर्यंत ज्या स्त्रियांचे वजन सामान्य वजनापेक्षा खूपच कमी असते अशा स्त्रियांना वेळेच्या अगोदरच रजोनिवृत्तीची समस्या येऊ शकते. आणि ह्याचे कारण असे सांगितले आहे की, जर तुमचे वजन १८ ते ३० ह्या वयात तीन पेक्षा अधिक वेळा २० पौंड पेक्षा कमी होत असेल तर ही समस्या येऊ शकते.
२) अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स विद्यापीठाच्या माजी पोस्ट डॉक्टरल रिसर्च सहकारी कॅथलीन सझेगा यांनी सांगितले, की ‘हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधीचे आजार आणि विविध आजारांमुळे दहा टक्के महिलांना वेळेआधी रजोनिवृत्तीचा सामना महिलांना करावा लागतो.
३) ह्याबाबत १९८९ मध्ये आरोग्य अभ्यासमध्ये सहभागी झालेल्या २५ ते ४२ या वयोगटांतील रजोनिवृत्ती न आलेल्या ७८,७५९ महिलांचा संशोधकांनी शरीर वस्तुमान निर्देशांक (बॉडी मास इंडेक्स), आणि वजन वितरणानुसार अभ्यास केला. त्यानंतर या महिलांचा २०११ पर्यंत अभ्यास करण्यात आला त्यापैकी २८०४ महिलांनी वेळेआधीच रजोनिवृत्ती आल्याचे सांगितले. आणि हा अभ्यास आता प्रसिद्ध करण्यात आला आहे.
४) ज्या स्त्रियांचे १८ व्या वर्षी सामान्यांपेक्षा वजन कमी होते आणि त्यांचे १७.५ किलो/प्रति चौरस मीटर इतके असते त्यांना वेळेच्या आधीच रजोनिवृत्तीचा ५० टक्के धोका आहे. आणि वयाच्या ३५ व्या वर्षी ज्यांचे वजन १८.५ किलो/प्रति चौरस मीटर होते त्यांना वेळेआधी रजोनिवृत्तीचा ५९ टक्के धोका असल्याचे दिसून आले आहे.
पण ह्यामध्ये त्या संशोधकांनी असे सांगितले की, ह्यात अजूनही संशोधन चालूच आहे तेव्हा अजून नवीन निष्कर्ष मिळू शकतात. पण वजनाचा परिणाम रजोनिवृत्तीवर होत असतो.
साभार : लोकसत्ता