५ नैसर्गिक उपायांनी केस तुटणे थांबवा !

         काही स्त्रियांना गरोदरपणाच्या आधी केस गळण्याची समस्या असते. आणि काही स्त्रियांचे केस गरोदरपणानंतर गळायला लागतात. आता दोन्ही स्थितीबाबत बघू. गरोदरपणानंतर आणि प्रसूतीनंतर ज्या स्त्रियांचे केस गळत असतात ते मुखत्वे हार्मोनल बदलामुळे होत असतात त्यामुळे काही दिवसानंतर ते नॉर्मल होऊन जाते. पण काही स्त्रियांचे केस गळतच असतात तेव्हा त्यावर काही उपाय करता येईल का ? असा प्रश्न एका मॉमने विचारला तेव्हा ह्यावर काय उपाय करता येईल त्याविषयी.

 

१) केस धुताना गरम पाणी वापरू नका

कितीही थंडी असू द्या, गरम पाणी केस धुण्यासाठी वापरू नका. कारण गरम पाणी तुमच्या केसांमधील ओलावा कमी करून आणि टाळूमधलाही ओलावा नष्ट होऊन त्यात शुष्कता येऊन जाते आणि त्यामुळे केस ठिसूळ व्हायला लागतात त्यांची मुळे घट्ट रुजत नाहीत. आणि जर तुम्हाला गरम पाण्याशिवाय पर्याय नसेल तर कोमट पाणी वापरा पण आठवड्यात २ ते ३ वेळच केस धुवा. पण केस वाचवायचे असतील तर थंड पाण्याने केस धुवत चला.

२) खूप प्रॉडक्ट केसांवर लावू नका

बाजारात खूप प्रकारची रसायने असतात आणि त्यांचा वापर करून तुमच्या केसांना जास्त अडचणीत आणू नका. जेल, क्रीम्स, निरनिराळी तेल, इत्यादी हे वापरल्याने तुमच्या टाळू आणि त्यातील पेशी डॅमेज होऊन जातात किंवा नष्ट व्हायला लागतात. ते कमजोर होऊन जातात आणि म्हणून केसही कमकुवत होऊन तुटायला लागतात. वाटल्यास तुम्हाला ह्याचा अनुभव आला असेलच. की, अगोदर पेक्षा केस जास्त कमकुवत होऊन गेली असतात. त्यामुळे खूप कमी प्रॉडक्ट केसांना आणि डोक्याला लावा. ह्यापेक्षा कोरफड सारखे नैसर्गिक वनस्पतींचा वापर करा.

३) बाहेरचे खाणे

खूप व्यक्तींची केस गळायला कारण, खाणे आहे. तुम्ही आठवून पहा की, तुमचे खाणे काय आहे ? ६० टक्के भाग हा बाहेरचा खाण्याचा असतो म्हणून त्यातून प्रोटीन आणि आयरन मिळत नाही. ते केसाच्या पोषणासाठी खूप आवश्यक असते. त्यातून केस मजबूत आणि दाट होतात. म्हणून आहारात बदल करा तुम्हाला फरक जाणवेल.

४) खूप उपचार पद्दती वापरू नका

काही वेळा नैसर्गिकपणे केस गळतात आणि त्याचे कारण आमच्या मागच्या लेखात सांगितले आहे तेव्हा थोडे थांबावे आणि उपचार करणार तर एकदम खूप उपचार पद्धती वापरू नका. शाम्पू चांगला वापरा आणि तेल वापरताना ते प्रॉडक्ट बघून घ्या. तुमच्या केसांची किंमत जास्त आहे.

५) स्कार्फ घालत चला

खूप उन्हामुळे सूर्याची किरणे केसांच्या मुळांना हानी पोहोचवतात आणि केसातला ओलावा नष्ट करून टाळू ला शुष्क करतात तेव्हा तीव्र ऊन असेल तेव्हा स्कार्फ बांधूनच बाहेर निघा.

६) खूप परिणामकारक नैसर्गिक उपाय

खोबऱ्याचे तेल आणि नारळ केसांसाठी खूप उपयुक्त आहे. नारळामधून प्रोटिन्स, मेद, मिनरल्स हे केस तुटण्यापासून रोखते. त्यासाठी घरातच तुम्ही खोबऱ्याचे तेल चांगले गरम करून घ्या. तासाभराने केस धुवून टाका. आणि त्यानंतर खोबरे किसून त्याचे दूध काढून टाळूवर आणि केस गळतीच्या जागेवर लावा. रात्रभर ते राहू द्या. सकाळी अंघोळ कारण्यावेळी धुवून काढा. दररोज तेल रात्री केसाच्या मुळापासून टोकापर्यंत लावा. ह्या उपायांनी तुमचे केस तुटण्याचे बंद होऊन मजबूत होतील. ह्यासंबंधी इतरही लेख/ ब्लॉग तुम्ही वेबसाईट्वर वाचून घ्या. 

Leave a Reply

%d bloggers like this: