पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी (व्हिडीओ)

थंडीत या मेथीच्या लाडूंचे सेवन केल्यामुळे  लहान थोर सगळ्यांसाठी आरोग्यदायची  ऊर्जा देणारे असतात साखर, तूप, सुकामेवा या नेहमीच्याच्या पौष्टिक घटकांना पदार्थांना मेथीची जोड देऊन हे लाडू करतात.पौष्टिक मेथीचे लाडू कसे करतात हे व्हिडीओद्वारे पाहणार आहोत.

 

व्हिडीओ स्रोत-खात्री मेजवानी 

मेथी कडू रसाची असल्याने त्यामुळे सूजनाशक आणि जंतूनाशक असे दोन्ही गुणधर्म त्यातून मिळतात. थंडीच्या दिवसात उध्दभवणारे सांध्यांचे विकार, सांध्यांची सूज, स्नायूंच्या वेदना, घशात जंतुसंसर्गामुळे येणारी सूज यावर मेथी उपयुक्त ठरते. थंडीने छातीत कफ जमा होणे, सर्दी होणे, अशा तक्रारींवर मेथी उपयुक्त ठरते. तसेच या दिवसात लहान मुलांना अश्या लाडूंचा सेवनामुळे त्यांची हाडे बळकट होतात. थंडीत होणाऱ्या केसाच्या कोंडा देखील या मेथीयुक्त पदार्थच्या सेवनाने कमी होतो , तसेच रक्त वाढवणे, रक्तशुद्धी करणे, हाडांना बळकटी देणे, त्वचा व डोळ्यांची काळजी घेणे हे फायदे मेथीच्या सेवनाने मिळतात. तेव्हा हिवाळ्यात मेथीच्या लाडूंचा खाण्यात जरूर समावेश करावा.  

मग हे मेथीचे पौष्टिक लाडू बनवा, खा आणि या थंडीत मस्त राहा आणि थंडीचा आनंद घ्या.

Leave a Reply

%d bloggers like this: