बाळाच्या वाढी संदर्भांत या गोष्टी लक्षात ठेवा

 

आपल्या बाळाची वाढ योग्य पद्धतीने होत आहे कि नाही या बाबत पालक काळजीत असतात.बहुसंख्य पालकांप्रमाणेच तुम्हीही तुमच्या छोटुल्याच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर नजर ठेऊन असाल तर मग तुमच्याकडे या सर्व टप्प्याची माहिती देणारे ऍप किंवा इतर साधने नक्कीच असतील. जेव्हा तुमचे बाळ अपेक्षित वेळेत वाढीचा ठराविक टप्पा गाठत नाही तेव्हा तुम्ही हि इतर पालकासारखेच काळजीत पडता,अस्वस्थ होतात

“माझा मुलगा दिड वर्षांचा आहे आणि त्याने अजूनही चालायला सुरुवात केलेली नाही,मी काळजी करणे योग्य आहे का?अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याच पालकांकडून विचारले जातात. तुमच्या बाळाने वाढीचा टप्पा पूर्ण न केल्यास त्याबद्दल अतिकाळजी करणे गरजेचे नसते.

याचे कारण पाहूया

१. चुकीचा धारणा 

बहुतांश माता मुलांच्या वाढीच्या टप्प्याबद्दल अतिशय काळजीत आणि चिंतेत असतात आणि याचे कारण म्हणजे एका चुकीच्या धारणेला आपण सर्व बळी पडतो ती म्हणजे-तुलना. वाढीच्या टप्प्याबद्दलची ही सारी अस्वस्थता तेव्हा चालू होते जेव्हा तुमचे शेजारी किंवा एखादी मैत्रीण सांगते की तिच्या मुलाने १२ व्या महिन्यातच चालायला सुरवात केली होती आणि तुमचे मूल १४ महिन्यांचे झाले आहे तरी अजून त्याने चालायला सुरुवात केलेली नाही.तरीही तुमची काळजी पूर्णपणे योग्य आणि समजण्यासारखी आहे. तरीही,पालक एक महत्वाची गोष्ट विसरतात की प्रत्येक मुलाची वाढ आणि विकासाची गती वेगवेगळी असते कारण प्रत्येक मूल वेगळे असते आणि त्यामुळे विकासातील प्रत्येकाची गती वेगळी असते. मजेदार गोष्ट: अगदी जुळ्या मुलांमध्ये ही वाढीचे टप्पे वेगवेगळे असतात.तुमच्या मुलाची तुलना दुसऱ्या सोबत करणे थांबवा आणि त्यांना स्वतःच्या गतीने वाढू द्या.

२. किती लवकर वाढीचा टप्पा पूर्ण केला आहे यावर कोणतेही मूल कनिष्ठ किंवा उच्च दर्जाचे ठरत नसते

आधी सांगितल्या प्रमाणे प्रत्येक मुलाची विकासाची गती वेगळी असते. याचाच अर्थ असा की जे मूल दुसऱ्या मुलांपेक्षा लवकर चालणे किंवा बोलणे सुरु करते ते इतर मुलांच्या तुलनेत चांगले किंवा हुशार होईल असे नव्हे, पालकांमध्ये असा चुकीचा समज सामान्यपणे आढळून येतो.ऑटिझम सारख्या आजाराचा अपवाद वगळता,मूल कोणत्या वयात वाढीचे कोणते टप्पे पूर्ण करते यावरून त्याच्या सामाजिक आणि बौद्धिक क्षमतांबद्दल अंदाज बांधता येत नाही.

३.  अनोळखी आणि अपात्र लोकांच्या मतांवर विसंबून राहू नका

तुमचे बाळ वाढीचे टप्पे पुर्ण करण्यात मागे पडत असेल आणि यासाठी तुम्ही खूप काळजीत असाल तर तज्ञांची मदत अवश्य घ्या. आई म्हणून बराच अनुभव असणाऱ्या एखाद्या अनोळखी आणि अज्ञानी व्यक्तीच्या अजिबात विश्वास ठेऊ नका जे तुम्हाला असे ही सांगतील की वाढीचे टप्पे उशिरा पूर्ण करणारी मुलांची शिकण्याची गती कमी असते. तुमच्या बाळाच्या विकासाबद्दल योग्य सल्ला आणि मत घेण्यासाठी तुमच्या बालरोगतज्ञाशी बोलून स्वतःचे निष्कर्ष काढा कारण तज्ज्ञ व्यक्तींना या विषयाचा संपूर्ण अभ्यास असतो. तुमच्या बाळाच्या वयाच्या अनेक मुलांना डॉक्टर्स रोज तपासत असतात आणि त्यांच्याशी बोलून तुम्हाला लक्षात येईल कि अशी अनेक मुले ज्यांच्या वाढीची गती तुमच्या मुलासारखीच आहे म्हणूनच यात खूप काळजी करण्यासारखे काहीही नाही.

४. बाळाची इतर कौशल्ये विकसित करण्यावर भर द्या

बाळाच्या मुख्य वाढीच्या टप्प्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याऐवजी इतर कौशल्ये विकसित करणाऱ्या गोष्टीमध्ये त्याला गुंतवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मुलास खेळात गुंतवा किंवा एखाद्या डे केयर मध्ये न्या जिथे त्याला एक वेगळे वातावरण अनुभवता येईल आणि इतर मुलांशी बोलायची संधीही मिळेल. तुमच्या बालरोगतज्ञाशी बोलून तुम्हाला कळेल कि बाळाच्या केवळ वाढीच्या टप्प्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्याच्या संपूर्ण विकासात हातभार लावणाऱ्या इतर सर्व मार्गांचा अवलंब करणे आणि तुमच्या बाळाला या गोष्टी शिकवणे गरजेचे आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: