बाळाला प्लॅस्टिकच्या बाटलीमधून (फॉर्मुला) दूध पाजताय ? हे वाचा

        ज्या आई बाळाला फॉर्मुला दूध देत असतात, त्या आईंनी एका गोष्टीची दक्षता घेतली नसते आणि ती म्हणजे फॉर्मुला दूध साठी प्लास्टिकची बाटली वापरली जाते. तसे अगोदर बाळाला बाहेरचे दूध चमच्यातून दिले जायचे पण चमच्याने दूध दिल्यामुळे बाळ दुधाबरोबर हवाही आत घेत असल्यामुळे त्याचे लवकर पोट भरून जायचे. आणि गॅसची सुद्धा समस्या निर्माण होते म्हणून बाटलीतून दूध देणे योग्यच ठरते. पण ह्याबाबत काय काळजी घ्यावी ह्याविषयी तुम्हाला ह्या ब्लॉगमधून सांगणार आहोत.

१) प्लॅस्टिकची बाटली हलकी असते पण आणि ती बाळासाठी हलकी राहते. पण तुम्हाला माहित आहे का ? ह्याकरिता रासायनिक द्रव्याचे कोटिंग केले जाते. आणि ज्यावेळी आपण त्यात गरम दूध टाकतो त्यावेळी गरम दुधामुळे त्या द्रव्यातील काही कण दुधात मिसळण्याचा धोका असतो.

२) काही वेळा घाईत किंवा चुकीने आपण खूप हलक्या प्रकारची प्लास्टिक बाटली घेऊन घेतो. आणि ह्या हलक्या प्लॅस्टिकची समस्या अशी असते की, ते खूप हानिकारक रासायनिक द्रव्यापासून बनवले असते व ते प्लास्टिक गरम दुधात वितळण्याचा धोका असतो. तेव्हा अशी बाटली असेल तर फेकून द्या. आणि चुकूनही अशी प्लास्टिक ची बाटली घेऊ नका. आणि मिनरल पाण्याच्या बाटलीत तर दूध देऊच नका.

३) ह्या बाटलीतून दूध पाजल्यामुळे बाळाच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असतो. आणि बाळाचे एकदम वजन वाढणे किंवा एकदम कमी होणे अशा समस्या येत असतात. आणि बाटलीची सवय लागल्यावर बाळ बाटली व्यतिरिक्त खायला खूप नखरे करत असतो.

४) ह्या बाटलीतून इन्फेक्शनचा धोका खूप असतो. कारण आई ती बाटली स्वच्छ करत नाहीत, तिला दररोज गरम पाण्यात भिजवून धुवावी लागते ह्या गोष्टी दररोज काही माता करत नाहीत म्हणून बऱ्याचदा बाळाला ह्यातून इन्फेक्शन होऊन जाते.

५) तुम्हाला दूध येत नसेल तरच फॉर्मुला दूध द्या नाहीतर तुम्ही कामावर जात आहात म्हणून पर्याय आहे म्हणून द्या बाहेरचे दूध असे करू नका. स्तनपान होत असेल तर बाळाला अंगावरचे दूध द्याच.

फॉर्मुला दुधाचाच पर्याय असेल तर

६) जर फॉर्मुला दूध द्यावे लागत असेल तर बाजारातून स्टीलची हलकी बाटली घ्या किंवा खूप चांगल्या प्रकारचे प्लास्टिक ची बाटली घ्या की, तीला गरम केल्यावर काहीच परिणाम होत नसेल. आता अशा बाटल्या मिळतात.

७) बाटलीचे निप्पल महिन्या दोन महिन्यातून बदलून घेत चला. आणि दररोज त्या बाटलीला गरम पाण्यात धुवून घेत चला.

आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी व चांगल्या वाढीसाठी हलगर्जीपणा व माहिती नाही अशा गोष्टी होऊ देऊ नका. आणि शक्य झाल्यास बाळाला स्तनपानच करा.

              तुमचे बाळ सदृढ होणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: