गरोदर स्त्रीच्या पोटाच्या आकारमान (बेबी बम्प) आणि प्रसूती दरम्यानच्या समस्या.

स्त्री गरोदर असताना काही व्यक्ती स्त्रीच्या पोटाच्या आकारावरून मुलगा की मुलगी सांगतात. काही अंशी हे ठोकताळे खरे ठरतात. परंतु हे जाणून घेणं तेवढे महत्वाचे नाही. जेव्हढे तुमची प्रसूती साधारण होईल कि त्यामध्ये समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे. कारण मुलगा-मुलगी हे आईसाठी दोघे हि सारखेच असतात. फक्त होणारे मुल सुदृढ काही व्यंग नसलेलं व्हावे एवढीच इच्छा पालकांची असते. तसेच प्रसूती दरम्यान काही समस्या निर्माण होऊ नये असे प्रत्येक जोडप्याला वाटत असते. त्यामुळे गरोदर असताना पोटाच्या आकारावरून प्रसूती साधारण होईल कि त्यात समस्या निर्माण होतील हे वर्तवणे काही प्रमाणात शक्य असते. ते कसे आपण पाहणार आहोत.

तुमच्या पोटाचा आकार काय सांगतो.

१.ज्यावेळी साधारणतः ३-४ महिन्यानंतर ज्यावेळी गरोदर स्त्रीचे पोट दिसायला लागते, किंवा वाढायला लागते,त्यावेळी डॉक्टर हे तुमचे पॉट म्हणजेच बेबी बम्पचा आकार मोजतात. त्याला फंडल हाईट (‘Fundal height’) असे म्हणतात. यावेळी गर्भाशय आणि प्यूबिक बोन यामधील अंतर मोजण्यात येते.

२. साधारणतः तुमचे हे अंतर ३० सेंटीमीटर असणे आवश्यक असते. आणि यावेळी तुमचे ३० आठवडे पूर्ण झालेले असणे गरजेचं असते. यावरून डॉक्टर तुमच्या प्रसूतीची तारीख सांगू शकतात.

३. तसेच यावेळी डॉक्टर जर गरोदरपणात आणि प्रसूती दरम्यान काही समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवतात. जर तुम्ही २७ आठवड्याच्या गरोदर आहात आणि जर तुमची फंडल हाईट (‘Fundal height’) साधारणतः २५-२९ सेमी असणे आवश्यक असते. आणि जर असे नसेल तर तुमच्या प्रसूतीमध्ये काही समस्या येण्याची शक्यता असते.

जर फंडल हाईट (‘Fundal height’) कमी -जास्त असल्यास ?

जर तुमची फंडल हाईट (‘Fundal height’) जास्त असल्यास, तर आपले ओटीपोटातील स्नायू कमकुवत होतात आणि आपण लठ्ठपणा येऊ शकतो. आणि त्यामुळे प्रसूतीच्या दरम्यान बाळाला बाहेर ढकलताना गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

जर फंडल हाईट (‘Fundal height’) कमी असेल तर आपले ओटीपोटात स्नायू मजबूत असतात आणि ते आपल्या बाळाला सुरक्षित ठेवत असतात आणि आणि तरीही

(इथे कमी फंडल हाईट (‘Fundal height’) म्हणजे योग्य प्रमाणातील)

फंडल हाईट (‘Fundal height’)पद्धती अल्ट्रासाऊंड पेक्षा योग्य आहे का ?

फंडल हाईट (‘Fundal height’)पद्धती ही बाळाचा आकारमान जाणून घेण्याची प्राचीन पद्धत आहे. तांत्रिकदृष्ट्या प्रगत देशामध्ये अल्ट्रासाउंड पद्धती ही केव्हाही चांगला पर्याय आहे. अल्ट्रासाउंड पद्धतीच्या आधारे तुम्हाला बाळाच्या डोक्याचे आकारमान बाळाच्या हाडाचे आकारमान. बाळाचे पोट याबाबत सगळी माहिती अधिक योग्य प्रकारे मिळू शकते.

प्रसूती दरम्यान काही समस्या अचानक निर्माण होऊ शकतात. आणि काही वेळा समस्या निर्मण होतील असे वाटत असताना देखील प्रसूती सुखरूप होते. हे त्यावेळच्या त्या स्त्रीच्या अवस्थेवर आणि परिस्थितीवर अवलंबुन असते. वरील काही पद्धती या फक्त प्रसूती दरम्यान निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत अंदाज देतात. 

Leave a Reply

%d bloggers like this: