झोपेत बाळ का हसते ?

         बाळाच्या आईला आणि वडिलांना, ज्यावेळी बाळ झोपेत हसत असते. तेव्हा प्रश्न पडतो की, नेमके कोणत्या कारणामुळे बाळ हसत आहे. असे काय घडले असेल, बाळाच्या मनात काय चालले आहे. असे कितीतरी तर्क आपण लावत असतो. काही जण असे सांगतात की, बाळाला देव हसवत असतो. तेव्हा ह्याविषयी आपण जाणून घेऊ.

तुम्हाला आश्चर्य वाटेल की !

१) बाळ गॅस पास करत असतो म्हणून हसत असतो. आता हे कारण वाचून तुम्हाला हसू येईल किंवा रागही येऊ शकतो. ह्याबद्दल काही डॉक्टरांचे मत आहे. बाळ गॅस पास करताना हलकं वाटल्यामुळे हसत असेल.

२) काही डॉक्टरांचे मत आहे की, जितक्याही वेळा बाळ हसतो ते सर्व नैसर्गिक असते त्यात काही विशिष्ट असे उत्तर दडले नाही आहे. त्यात बाळाची काही भावना नसते.

३) बाळाचे हास्य स्पॉन्टेनियस असते. आणि बाळ अधिक वेळा (REM) झोपेच्या वेळा होत असते. त्यावेळीच बाळ जास्त हसत असते कारण गॅस झोपेच्या वेळी जास्त पास होतो. ह्या कारणावर थोडाफार विश्वास ठेवावा लागतो. वाटल्यास तुम्ही ह्याप्रकारे ओळखू शकता. जसे की, जर तुमचे बाळ ६ ते ८ महिन्याचा झाला असेल झोपेत काही आवाज ऐकून हसत असेल तर त्याने गॅस पास केला असेल त्याची तुम्ही प्रत्यक्ष अनुभूती घेऊ शकता.

४) बाळ हसतो तेव्हा तो तुम्हाला नाहीतर काहीतरी बघून हसतो. आणि जर झोपेत हसत असेल तर त्याने नक्कीच गॅस पास केला आहे. असे समजून घ्यावे.

५) तुम्ही एक काम करू शकता, बाळ ज्याही वेळी हसणार त्याचे निरीक्षण करा. आणि आनंद घेणे विसरू नका आणि तुमच्या बाळाचे विलक्षण हास्य स्मृतीच्या कप्प्प्यात आयुष्यभरासाठी जतन करून ठेवा. ते पुन्हा येणार नाही. 

टाईनी स्टेप नैसर्गिक घटक असणारे  फ्लोर क्लीनर लॉन्च करत आहे जे आपल्यासाठी, आपल्या बाळाला आणि आपल्या घरासाठी सुरक्षित आहे. तर मग आता  जंतू आणि रसायनयुक्त फ्लोर क्लीनर नाही म्हणा! प्रीलाँच ऑफरचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

%d bloggers like this: