तुमच्या मुलायम ओठांची थंडीत अशी काळजी घ्या !

 

   

स्त्रीसाठी तिच्या ओठांचे महत्व खूपच असते. म्हणून तिच्या पर्समध्ये लिपस्टिक, लायनर नेहमीच असते. तेव्हा इतकी काळजी ती ओठांची घेत असते. पण हिवाळ्यात त्या ओठांची काळजी घ्यायला खूप कठीण जाते. कारण शरीरातील आर्द्रता कमी होऊन ओठही कोरडे पडतात. ह्यावर खूप क्रीम लावल्यामुळे ओठ आणखी रुक्ष होतात. तेव्हा खूप साध्या व नैसर्गिक उपायांनी तुम्ही तुमच्या ओठांची सुंदरता हिवाळ्यातही राखू शकता.

१) तुमच्या ओठांना ह्या थंडीच्या दिवसात लोणी आणि तूप हे खूप उत्तम मॉईश्चरायझर आहे. त्यासाठी रात्री झोपताना ओठांना लोणी किंवा तूप लावत चला. आणि ओठ जर फाटत असतील तर हलक्या हातांनी मसाज करत चला.

२) हातावर व्हॅसलिन घेऊन त्यात एरंडेल तेल घाला. आणि हे मिश्रण तयार करून दिवसातून दोनवेळा आणि रात्री ओठांना लावा. ह्यामुळे तुमचे ओठ हे मुलायम होत असतात.

३) गुलाब पाण्याचा उपयोग तुम्हा सर्वाना माहिती असेलच. एक चमचा गुलाब पाण्यामध्ये ३ -४ थेंब ग्लिसरीन टाकून ठेवा. आणि हे द्रावण जसा वेळ मिळाला तसे  ३ते ४ वेळा लावावे. ह्यामुळे ओठ कोरडे होत नाहीत. आणि उलट जास्तच ओठांचे सौन्दर्य खुलते.

४) मोहरीचे तेल घ्यावे, आणि दर दिवशी नाभिमध्ये तेलाचे दोन ते तीन थेंब टाकावे.

५) बाहेर जाताना स्कार्फ घालून घ्यायचा. हिवाळा आहे तरी खूप पाणी प्या. व्हिटामीन युक्त पदार्थ जास्त घ्या. आणि मीठ कमी खाण्याचा प्रयत्न करा. आणि जेवणात मिठाचा वापर कमीच करा.

Leave a Reply

%d bloggers like this: