बाळंतिणीने ह्या हिवाळयात हे लाडू आवर्जून खावेत

         गरोदरपणाच्या आहाराविषयी बरेच ब्लॉग लिहिल्यावर काही मातांनी गरोदरपणानंतर कसा आहार ठेवायचा जेणेकरून स्तनपानासाठी दूधही येईल, आणि त्याचबरोबर वजनही नियंत्रणात राहून बाळाला स्तनपानातून सर्व आवश्यक घटक मिळतील. आणि आता हिवाळा चालू झाला आहे त्यामुळे बाळंतीण स्त्रीलाही त्याप्रमाणे आहार बदल करून घ्यावा लागतो तेव्हा ह्या दिवसात नेमका आहार कसा ठेवावा त्याविषयी ह्या ब्लॉगमधून

१) ह्या दिवसात लाडू खूप खायचे असतात आणि ते हिवाळयात पचायलाही चांगले असतात. त्यासाठी डिंकाचे लाडू, अळिवाचे लाडू, मेथीचे लाडू, खाऊ शकता. ह्यातून तुम्हाला कॅलरीज मिळतातच आणि स्तनपानात दूध वाढण्यास मदत मिळते. आणि डिंकाच्या लाडवांमुळे गर्भाशय परत पूर्वीच्या आकारात व्हायला मदत मिळते.

२) गरोदरपणात गर्भाशयाचा आकार खूप वाढलेला असतो त्याला पूर्व स्थितीत येण्यासाठी डिंक औषध म्हणून खूप उपयोगी ठरत असते, तेव्हा डिंकाचे लाडू ह्या दिवसात नक्कीच खा.

३) अळिवाचे लाडू हे बाळाच्या आईला मलावरोधाचा त्रास होऊ नये आणि खाल्लेले खूप व्यवस्थित पचावे म्हणून खूप लाभदायक असतात. मेथीच्या लाडवांनी अंग दुखत नाही, कंबर व सांधेही दुखत नाही. व वातसुद्धा होत नसतो.

४) मेथीचे लाडू हे हिवाळ्यात सर्वजण खायला तयार असतात कारण त्याचे फायदे हिवाळ्यातच मिळतात तेव्हा बाळंत आईने मेथीचे लाडू खाल्यावर सकस आणि घट्ट दूध स्तनातून तयार होते कारण मेथी ही दूध येण्यास खूपच लाभदायक ठरते. म्हणून ज्या मातांना स्तनातून कमी दूध येत असेल किंवा येतच नसेल त्या मातांनी मेथीचे लाडू खावावेत.

५) ह्या लाडवांमध्ये असलेले बदाम, खारका, तूप, काजू, खसखस, खोबर हे घटक एरवी आई खात नाही किंवा कंटाळा करते लाडवांमधून खाऊन दूध येण्यास व गर्भाशय व टाके पूर्ववत होण्यास ह्यांची खूप मदत होते.

६) हे लाडू सकाळी नाश्त्यात आणि जेवणात व जेवणानंतर, आणि संध्याकाळी खाऊ शकता. म्हणजे तुम्हाला इतर आवश्यक आहार खायला अडचण येणार नाही. हे लाडू इतर लाडूंसारखे खूप गोड आणि चरबीयुक्त नसतात म्हणून डॉक्टरही हे लाडू बाळंतीण आईला सांगत असतात. 

Leave a Reply

%d bloggers like this: