सिझेरियन डिलिव्हरीनंतर केव्हा अंघोळ करायची

सिझेरियन डिलिव्हरी करणे ही एक सोपी गोष्ट होऊन बसलीय. डॉक्टरांनाही सिझेरियन करणे आवडत असते त्याची कारणे बरीच आहेत. आणि स्त्रियाही डिलिव्हरीत होणारा त्रास कमी करण्यासाठी सिझेरियन प्रसूती पसंत करत असतात. पण सिझेरियन डिलिव्हरी केल्यानंतर खूप काळजी व स्वतःची देखभाल करावी लागत असते. आणि त्यातच डिलिव्हरीनंतर घरी गेल्यावर सर्वच सिझेरियन झालेल्या आईंना वाटते की, कधी एकदाची अंघोळ करायला मिळते. तर ह्या

अंघोळी अगोदर येणारे काही प्रश्न

१) शरीरावर व पोटावर ऑपरेशन झाल्यामुळे खूप चिप चिप सारखे वाटत असते. नॉर्मल डिलिव्हरी पेक्षा सिझेरियन मध्ये खूप शरीराची झीज झाल्यामुळे शरीर खूप थकून गेले असते. म्हणून मातांना असे वाटते की, केव्हा छान अंघोळ करू.

अंघोळ करण्यावर डॉक्टरांचे मत

२) डॉक्टर सिझेरियन नंतर १ -२ दिवसांनी अंघोळीचे सांगत असतात. कारण ह्यामुळे इन्फेक्शन चा धोका खूप कमी होऊन जातो. पण सिझेरियनमध्ये जी टाके दिलेली असतात त्यांना धक्का लागायला नको. आणि त्या सोबत त्या टाक्यांना साबण लावून रगडायचे नसते.

पण

३) सिझेरियन नंतर लगेच अंघोळ करण्याची घाई करू नका. कारण काही वेळा तुमच्याकडून चुकून पाणी हे ओल्या टाक्यात किंवा जखमेवर जातेच. आणि त्यानंतर ती जखम भरायला अजून वेळ लागतो. म्हणून १०- १५ दिवसात अंघोळ करण्याचा प्रयत्न करायचा.

अंघोळ करताना घ्यायची दक्षता

४) तुम्ही त्यासाठी ज्या जागेवर टाके किंवा जखम असेल त्या ठिकाणी डॉक्टरांकडून पट्टी लावून घ्या. आणि त्यांनी केव्हा अंघोळ करायची आणि कशी करायची यांच्याविषयी सांगत असतात किंवा विचारून घ्या.

५) अंघोळ करताना टाक्यांची जागा कोरडी ठेवून बाकी जागेवर पाणी अंगावर घ्यावे. वाटल्यास उशीची मदत घ्या.

६) अंघोळीच्या जागी तुम्ही ओल्या गरम पाण्यात फडके घेऊन अंग पुसून घ्या. म्हणजे फ्रेश वाटेल. पण लगेच अंघोळ करण्याची घाई करू नका.

Leave a Reply

%d bloggers like this: