तुम्ही यापैकी कोणती ब्रा घालतात ?

 ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला निरनिराळ्या ब्रा विषयी माहिती देण्यात आली आहे. 

१) कनवर्टिबल ब्रा

ह्या प्रकारच्या ब्रा मध्ये तुम्हाला एक वेगळाच फिल येईल. कनवर्टिबल ब्रा चे कप जशी तुमची स्तन असतील तशीच ती बनवलेली असतात. जे काही ब्रा तुमच्या स्तनाला व्यवस्थित होत नसतील तेव्हा तुम्ही हा ब्रा वापरू शकता. ह्या ब्राची स्ट्रॅप वेगळी प्रकारे डिझाईन केली आहे.

२) डेमी कप ब्रा

हा चांगलाच सेक्सी असतो. जर तुम्हाला काही ब्रा मध्ये खूप गरम होत असेल तर ह्या ब्रा चा तुम्हाला पर्याय आहे. कारण ह्यातून क्लीवेज मोकळे राहते. व वरून हवा यायला जागा राहते. पण हा ब्रा मोठ्या आकाराच्या स्तनांवर वापरता येणार नाही. पण मेडीयम स्तन असतील तर हा ब्रा तुम्हाला परफेक्ट होईल.

३) एडहेसिव ब्रा

ह्या ब्रा ची विशेषतः आहे की, तुम्ही कोणत्याही कपड्यांवर तुम्ही घालू शकता. एडहेसिव ब्रा बैकलेस, स्ट्रैपलेस आणि सिलिकॉन पासून बनलेला असतो. आणि मेडिकली सुद्धा ह्यात बनलेला तुम्हाला मिळेल कि ज्यामुळे तुमच्या स्तनांना कोणताच धोका राहणार नाही.

४) पुश अप ब्रा

हा पुश अप ब्रा तुमच्या दोन्ही स्तनांना वरती आणि मध्यभागात चपखल बसवतो. जेणेकरून क्लीवेज दिसून येईल. ज्या स्त्रियांचे स्तन छोटे असतील त्यांना हा ब्रा खूप मदत करत असतो. कारण ह्यामुळे वाटत नाही की तुमचे स्तन छोटे आहेत. हा ब्रा स्तनाला आकार देतो.

५) बालकोनेट ब्रा

हा ब्रा तुम्ही खूप स्त्रिया घालताना दिसतील. ह्याच्यात स्तनाचा वरचा भाग फार छन दिसतो. ह्या ब्रा मध्ये व्हेंटिलेशन सुद्धा चांगले होत असल्याने तुमचे स्तन खूप फिट आणि कठीण होत नाही. स्तन मुलायम राहतात.

६) नर्सिंग ब्रा

जर तुम्ही बाळाला स्तनपान करत असाल तर हा ब्रा त्यासाठी खूप योग्य आहे. कारण ह्याला त्या प्रकारे बनवले गेले आहे. तो मोकळा व ढिला असतो. ह्यात एक फ्लैप असते तिला उघडून तुम्ही आरामशीर बाळाला स्तनपान करू शकतात. आणि हा ब्रा लवचिक असायला पाहिजे. फिट घेऊ नका. कारण ह्या दिवसात तुमचा स्तनाचा आकार बदलत राहतो.

७)स्पोर्ट्स ब्रा

हा ब्रा कपडे म्हणून पाश्चिमात्य देशात अनेक स्त्रिया वापरतात. पण आपल्या कडे तसा वापरता येणार नाहीच. पण जर तुम्ही व्यायाम व योग करत असाल किंवा सकाळी रनिंग करत असाल तर तुम्हाला ह्या ब्रा चा खूप फायदा होईल. कारण ह्यात तुमचे स्तन व्यवस्थित राहतील आणि तुम्हाला पळणे, व्यायाम ह्या गोष्टी करताना अडथळा येणार नाही.

जर ह्याविषयी काही शंका असतील तर तुम्ही आमच्याशी बोलू शकता. आणि ज्या मैत्रिणींना ह्या विषयी अडचण असेल त्यांना ब्लॉग नक्कीच शेअर करा. 

Leave a Reply

%d bloggers like this: