बाळाच्या बाबांनी या गोष्टी पत्नीला बोलू नयेत

आई होणे होणं हे तितकंसं सोप्प नसतं पण स्त्रिया ते आव्हान सहज पेलतात पण पुरुषांना म्हणजेच बाळाच्या बाबांना या सगळ्या गोष्टी अंगवळणी पडायला वेळ लागतो. कधी-कधी नुकतेच बाळ झालेल्या जोडप्यामधील पती काही-काही गोष्टी सहज अनवधानाने बोलून जातात पण त्यांच्या मनात काही नसतं. पण त्या गोष्टी पत्नीच्या जिव्हारी लागतात. आणि आई झाल्यावर स्त्रियां हळव्या झालेल्या असतात. तसेच काही काळा करता त्यांनी सगळ्या गोष्टी मधून ब्रेक घेतलेला असतो. म्हणून काही अश्या गोष्टी ज्या पतीने पत्नीला बोलणे सांगणे टाळाव्या. या गोष्टी कोणत्या ते आम्ही सांगणार आहोत.

१. हे आईचं काम आहे

     आई म्हणून तुमची पत्नी तुम्हांला जाणीव होऊ न देता बऱ्याच गोष्टी करत असतात. त्यामुळे स्तनपान शिवाय कोणतेही काम हे आईचे किंवा बायकांचे काम आहे असे म्हणू नका. तुम्हांला जमेल त्या पद्धतीने तुमच्या बाळाला सांभाळायला पत्नीची मदत करा

२. तू खूप नशीबवान आहेस तुला काहीच काम नाहीये

बाळ झाल्यानंतर किंवा घरातल्या गृहिणीला तू नशीबवान आहेस तूला काहीच काम नाहीये. असे चुकून सुद्धा म्हणून नये. नुकतेच बाळ झालेले असले तर त्या स्त्रीला बाळाला संभाळणे. घरातल्या इतर गोष्टी बघणे स्वतःची कामे करणे अशी अनेक कामे असतात. तसेच गृहिणीला देखील घर सांभाळणे सगळ्यांना हवे नको ते बघणे. घरातल्या प्रत्येक गोष्टीत लक्ष घालणेअशी अनेक काम असतात जी कामे कधी-कधी तुमच्या ऑफिसच्या कामापेक्षा जास्त आणि तुमच्या ऑफिसच्या वेळेपेक्षा कितीतरी जास्त वेळ लागणारी असतात

३. माझं हे कुठे…. ते कुठे

 

बाळ झाल्यावर माझी बॅग कुठे? माझं पाकीट कुठे ? माझ्या गाडीची चावी कुठे ? असे प्रश्न पत्नीला विचारणे टाळावे . कारण बाळ झाल्यावर स्त्रीला आरामाची गरज असते तसेच बाळाच्या सगळ्या वेळा पाळणे बाळाला स्तनपान देणे हवे नको बघणे. त्याचा कडे लक्ष देणे व इतर कामे अशी अनेक कामे असतात, त्यांनी या छोट्या-छोट्या गोष्टीसाठी तुम्ही सतत तिला हाक मारत राहिलात. त्या वैतागून जातील आणि त्याचा परिणाम त्यांचा तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असते.

४. आजच्याच  दिवस मी बाळाला सांभाळेल

आजच्या दिवस का? बाळ हे तुम्हा दोघांचे असल्यामुळे दोघांनी मिळून त्याचा सांभाळ करावा बाळाला सांभाळणे हे फक्त तुमच्या पत्नीचे कर्तव्य नसून तुमचे देखील आहे. तुम्हाला बाळाला सांभाळायला जमत नसेल तर प्रयत्न  करा किंवा इतर कामात पत्नीला मदत करा ज्यामुळे तिच्यावरचा कामाचा भर हलका होईल

५. परत बाहेर जेवायला जायचे ?
 

बाळाच्या जन्मानंतर किंवा इतर वेळी देखील तुमच्या पत्नीला कधी-कधी स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल आणि हेच जर आठवड्यातून दोनदा झाले तर लगेच आज प्रत बाहेर जेवायला जायचं का ? असा प्रसन्न विचारून तिला दुखावू नका. तिला बाहेर जेवायला घेऊन जा किंवा तुम्ही तिला काहीतरी बनवून खाऊ घाला.

६. घर थोडं आवरायला झालं आहे नाही ?

 जर घरात खूप पसारा झाला असेल, जागोजागी बाळाचे कपडे वाळत असतील. बाळाची खेळणी इकडे तिकडे पडली असतील. तुमचे धुतलेले कपडे न धुतलेले कपडे एकाच ठिकाणी पडले असतील किंवा भांड्यांचा खच पडला असले. हे सगळे पाहिल्यावर तुमच्या मनात असा विचार येईल घर किती पसरले आहे. हिने आवरले का नाही. तर हा विचार मनात ठेवा पण पत्नीजवळ बोलू नका किंवा स्वतःहून घर आवरायला सुरवात करा. कारण प्रसूती नंतर स्त्रीचा कामाचा वेग कमी होण्याची शक्यता असते. किंवा बाळाला सांभाळून सर्व इतर कामे करणे तुमच्या पत्नीला झेपत नसतील. त्यामुळे तिला समजून घेण्याचा प्रयत्न करा 

Leave a Reply

%d bloggers like this: