मुलांना वाचनाची आवड कशी लावाल

पालकांनी मुलांना वाचनाची आवड लावणे हे मुलांसाठी खूप चांगली भेट ठरू शकते. जर मुलांना तुम्ही वाचनाची आवड लावली तर ती त्यानं पुढील आयुष्यात उपयोगी ठरू शकते. ते त्यांच्या आयुष्यात कधीच कंटाळणार नाही कारण त्यांच्या सोबतीला पुस्तक हे कायम असेल. वाचनामुळे त्यांची भाषा सुधारेल त्यांचा शब्दसंग्रह वाढेल. तसेच त्यांच्या ज्ञानात भर पडेल. पुढील काही उपायाद्वारे तुमच्या मुलांना वाचनाची आवड लावू शकता

१. पहिल्या दिवसापासून सुरवात करा

ज्यावेळी मुल लहान असते त्यावेळी त्याला कोणतीही सवय लावणे सोप्पे असते. सुरवातीच्या काही वर्षातच त्यांना वाचायची सवय लावा. मुल स्वतः वाचण्या इतपत मोठे नसेल तर त्याला तुम्ही पुस्तक वाचून दाखवा.

२. त्यांचा समोर तुम्ही देखील वाचा

लहान मुलं ही नेहमी आपल्या पालकांची नक्कल करत असतात. त्यांना त्यांचा पालकांसारख्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे तुम्ही त्यांचा समोर वाचन करा.त्यामुळे त्यांना देखील कुतुहूल वाटेल आणि वाचावंसं वाटेल

३. काही काळानंतर त्यांना त्यांचे पुस्तक निवडू द्या

तुम्हांला आवडत असलेले पुस्तक मुलांना वाचायला देण्यास तुम्ही फार उत्सुक झाला असाल, पण त्यांना त्यांचे पुस्तक निवडू द्या. तुम्ही त्यांचा दुरून नजर ठेवणे आवश्यक असते. परंतु उगाच उत्सहाच्या भरात जास्त सल्ले देऊ नका.

४. त्यांना सर्वप्रकारचे वाचन करण्यास प्रोहत्साहन द्या

वाचन म्हणजे नुसते पुस्तक वाचणे असं नाही. वर्तमान पेपर वाचणे, लेख मासिके अशा विविध प्रकारचे वाचन करण्यास त्यांना प्रोत्साहन द्या .

५.त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांची ओळख

तुमचे मुल जसं जसे मोठे होत जाईल तसं तसे त्यांना वेगवेगळ्या प्रकाच्या पुस्तकांची ओळख करून द्या. जस जसे मुल मोठे होत जाईल तसे त्याला मनोरंजक कल्पनाविलासत्मक पुस्तकांबरोबरच वास्तववादी पुस्तकांची ओळख करून द्या. राजकारण, विज्ञान , साहसी कथा या प्रकारच्या पुस्तकांची ओळख करून द्या

६. भेट म्हणून पुस्तक द्या

वाढदिवस, सण, बक्षीस अश्या वेगवेगळ्या प्रसंगी भेट म्हणून त्यांना पुस्तक द्या आणि त्यांची वाचनाची आवड वाढावा.

Leave a Reply

%d bloggers like this: