ही लक्षणे दर्शवतात तुमचे गर्भारपण निरोगी आणि स्वस्थ आहे.

ज्यावेळी तुम्ही गरोदर असल्याचे खात्री होते त्यावेळी असं वाटत असतं जर एक काचेची खिडकी असती ज्यातून आपण आपल्यामध्ये वाढणाऱ्या छोट्याश्या जीवाला पहिले असते.

 

७ आटवड्याच्या गर्भधारणनेनंतर तुम्हांला गरोदर असल्याचे जाणवू लागते. परंतु गरोदर असल्याचे पोट आलेले नसल्यामुळे तुम्ही गरोदर आहेत हे तुम्हांलाच जाणवत असते. बहुतांशी गरोदरपणाची लक्षणे ही संप्रेरकांच्या बदलामुळे जाणवत असतात. यातली काही लक्षणे तुम्हांला तुमचे गर्भारपण हे स्वस्थ आणि निरोगी गर्भारपण असल्याचे दर्शवत हि लक्षणे कोणती ते आपण पाहणार आहोत.

१.अति संवेदनशील स्तन

पहिल्या त्रैमासिकाच्या सुरवातीस स्तन हे अतिसंवेदनशील होतात आणि. प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजनच्या पातळीत होणाऱ्या बदलामुळे स्तन नाजूक होऊ लागतात. या काळात तुम्ही चिडचिड करता. या सगळ्यासाठी तुम्ही तुमच्या संप्रेक जबबाबदार असतात

२. स्पॉटिंग

गर्भधारणेनंतर १०-१४ दिवसांनी तुमच्या पँटी वर रक्ताचे लाल-किंवा काळपट लाल रंगांचे डाग पडल्यावर स्त्रिया घाबरतात यात घाबरण्यासारखे काही नसते. हा रक्तस्त्राव गर्भ तुमच्या गर्भाशयात रुजल्याचे चिन्ह असते.गर्भनलिकेतून प्रवास करून आलेले बीज हे तुमच्या गर्भशयात रुजते त्यामुळे हा रक्त स्त्राव होतो. हा रक्तस्त्राव फार कमी प्रमाणातील असतो. जास्त प्रमाणातील रक्तस्त्राव निरोगी गर्भधारणा दर्शवत नाही.

३. आकुंचन

ब्रेक्सटन हिक्स आकुंचन हे गर्भारपणाच्या सहाव्या आठवड्यानंतर सुरु होते. यावेळी तुम्हांला प्रसूती होत असताना होणारे आकुंचनासारखे वाटते. याला तुम्ही प्रसुतीपूर्व प्रसूतीचा अभ्यास असेही म्हणू शकता. हे आकुंचन अमुक यावेळचा होते असे नाही . यावेळी पोटात ओढल्यासारखे वाटणे, मासिकपाळीच्या वेळी होणाऱ्या त्रासांसारखा त्रास होत. कधीकाधीही आकुंचन वेदनारहित असते यात ओढल्यासारखे वाटते. हे आकुंचन दुसऱ्या त्रैमासिकात जास्त आढळून येते.

४.उलट्या आणि मळमळ

तुमची मासिकपाळी चुकल्यावर गरोदर असल्याच्या लक्षणांपैकी हे एक लक्षण असते, दिवस राहिल्यावर होणाऱ्या संप्रेरकीय बदलांमुळे हे घडत असते. परंतु काही महिलांना त्याच्या पूर्ण गर्भारपणात हा त्रास जाणवत नाही. अश्या महिलेचा गर्भधारणा देखील निरोगी असते.

५. योनीस्त्राव

या काळात तुम्हांला योनीच्या जवळ जास्त ओलसरपणा जाणवतो. योनीतुन पांढरट, पिवळसर स्त्राव होत असतो. जे अगदी सामान्य आहे आणि निरोगी गर्भारपणाचे लक्षण आहे. परंतु या स्त्रावास वाईट वास येत असेल तर मात्र हे इन्फेक्शन असण्याची शक्यता आहे त्यामुळे जर या स्रवस वाईट वास येऊ लागला तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

वरील लक्षणे बहुतांश स्त्रियांमध्ये जरी स्वस्थ आणि निरोगी गर्भारपणा दर्शवत असली तरी काही महिलांच्या बाबतीत ही लक्षणे आढळून येत नाही. त्या महिलांनी घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही या लक्षणांची तीव्रता प्रत्येक स्त्रीनुसार वेगळी असते. त्यामुळे काही स्त्रियांना हि लक्षणे कमी प्रमाणात अढळतात तर काही महिलांच्याबाबतीत आढळत नाही. 

Leave a Reply

%d bloggers like this: