गर्भारपणातील केसांची अवस्था . . .

गर्भावस्थेत असताना हार्मोन्स बदलामुळे काही समस्या व दुखणी येतात. आणि शरीरात अनेक परिवर्तन येत असतात. बऱ्याच समस्यांबद्धल ह्या अगोदर लिहले गेले त्यात केस गळण्याच्या समस्येवर लिहले गेले. पण केस नेमके कोणत्या कारणामुळे गळतात. एकदम अचानक गरोदरपणातच कसे काय केस गळायला लागतात ? असे प्रश्न गरोदर स्त्रीला पडतात. आणि ह्यात केस गळून कमी होतात असे नाही तर काही स्त्रियांचे केस जास्तच वाढायला लागतात. तर असे का होते ह्याविषयी माहिती ह्या ब्लॉग/ लेखात आहे. तुमचे केसांची सौंदर्य तसेच राहील फक्त थोडा कालावधीपर्यंत तुम्हाला समस्या राहील. 

१) केस गळण्यामागचे विज्ञान


आपल्या केसांचे ती टप्पे असतात. ते म्हणजे एनजेन, कैटाजन, आणि टेलोजेन असे आहेत.

१. एनजेनच्या टप्प्यात केस विकसित व्हायला लागतात. ह्या टप्प्यात हेयर फॉलिकल्स च्या मध्ये सतत विभाजन होत असते. आणि हे लगभग २ ते ६ वर्षापर्यँत असेच राहते.

२. टेलोजेन आणि एनेजेन च्या टप्प्यात कैटाजन चे संक्रमण सुरु होऊन जाते.

३. टेलोजेन ला आरामाचा टप्पा म्हटला जातो आणि एनजेन ला वृद्धीचा टप्पा मानतात.

४. लगभग ३ टक्के आपले केस राशी ह्या कैटाजनमध्ये वाढत असतात. त्यामुळे केस वाढणे बंद होऊन जाते. आणि नंतर टेलोजेन ज्याला आरामाचा टप्पा म्हणतात त्यामध्ये ५ ते १० टक्के केश राशी उरते. आणि ह्याच टप्प्यात खूप केस गळायला लागतात.

५. प्रतिदिवस २५ ते ५० केस ह्याचप्रकारे गळत असतात. आणि हा क्रम काही दिवस चालतो.

२) गर्भावस्थेत केस


आता गरोदरपणात नेमके काय घडते. अचानक केस खूप गळतात किंवा वाढायला लागतात कारण ह्या वेळेत तुमच्या शरीरातील हार्मोन्स खूप वेगाने उत्पन्न होतात. प्रोजेस्टेरॉन आणि इस्टोरोजेन हार्मोन्सचा पुरच आलाय असे वाटते. तुमचे जेही केस हार्मोनच्या दरम्यान गळत असतात त्याला इस्ट्रोजेन हार्मोन्स केस तुटण्यापासून वाचवतो म्हणजे ते केस कैटाजनमध्येच राहतात म्हणून केस कमी गळतात. आणि जर ती केस टेलोजेन टप्प्यात गेली तर ती तुटायला लागतात.

३) केसांच्या देखभालीसाठी संतुलन


बाळाला जन्म दिल्यावर ५ महिन्यात आईच्या केस राशी त्यावेळी कैटाजन मध्ये असतील तर त्या टेलोजेन मध्ये येतात म्हणून केस खूप गळण्याचा अनुभव मिळतो. आणि केस गर्भावस्थेच्या अगोदर सारखे व्हायला वेळ लागतो. पण ते नेहमीसारखे दाट होतात. पण थोडा कालावधी लागतो.

४) ह्यावर काय उपाय करता येईल


आणि जर तुम्हाला ह्या केस तुटण्यावर उपाय करायचा असेल तर गरोदरपणात व नंतरही तुम्हाला आहार व्हिटॅमिनयुक्त आणि खूप खनिज पदार्थ असलेला घ्यावा लागेल. आणि खूप केसांना हेयर ड्रायर सारखे साधने वापरू नका. 

Leave a Reply

%d bloggers like this: