तुमच्या बाळाला कोणताही छोटा-मोठा त्रास झाला तर तुम्ही लगेच काळजीत पडता,हो ना? जसे कि झोपेत असताना असतांना माझ्या बाळाला घाम का येतो?ति/त्याच्या फक्त डोक्याला घाम का येतो? नव्या पालकांना अशा अनेक शंका आणि काळजी असते. बाळ आजारी तर नाही ना अशा शंकेने अनेक पालक डॉक्टरांकडे धाव घेतात. बाळाला जास्तच त्रास होत नसेल तेव्हा काळजी करण्याचे काहीही कारण नसते. झोपेत असतांना किंवा स्तनपान करत असतांना बहुतेक बाळांना जास्त घाम येतो कारण त्यांना गरम होत असते आणि घाम येण्याने शरीराचे तापमान नियंत्रित होते.
आज या लेखातून जाणून घेउया बाळांना घाम का येतो आणि त्यावर काय उपाय आहेत.
कारण १
नवजात बाळामध्ये, जन्मानंतरच्या सुरुवातीच्या दिवसांत घाम ग्रंथी फक्त डोक्याच्या भागात तयार झालेल्या असतात आणि यामुळे फक्त डोक्यावरच घाम येतो.त्यानंतर घाम तयार करणाऱ्या या ग्रंथी शरीराच्या इतर भागात काम करणे सुरु करतात. प्रौढांच्या शरीरात घाम ग्रंथी तयार होण्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. अनेक वर्षांत बनणाऱ्या या ग्रंथी नंतर संपूर्ण शरीरात कार्य करू लागतात.
तुमच्या बाळाला घाम येतो म्हणजे त्याचा मेंदू आणि शरीराचे कार्य सुरळीत चालू आहे. मेंदूमध्ये दोष असणाऱ्या बाळांना घाम येत नाही कारण मेंदूच्या हिप्पोथॅलॅमस नावाच्या भागात उष्णतेची जाणीव करून देणाऱ्या मज्जातंतू नसतात. याचमुळे, नवजात शिशुला घाम येतो ना,याची तपासणी डॉक्टर करतात.
कारण २
नवजात बालकांमध्ये,हृदयाची गती साधारणपणे, १३० ठोके प्रतिमिनिट असतो तर,हाच दर प्रौढांमध्ये, ७० ते ९० ठोके प्रतिमिनिट असतो. बाळाची सक्रियता ,त्याची श्वसनक्रिया प्रौढांपेक्षा खूप जास्त असल्यामुळे घाम येण्याचे प्रमाण जास्त असते. यावरच साधा उपाय म्हणजे,आठवडयातून २-३ वेळेस बाळाचे डोके गरम पाणी आणि स्पाँज च्या साहाय्याने स्वच्छ करा. यानंतर लगेचच बाळाचे डोके पुसून कोरडे करा . कोणतेही आजार आणि ऐलर्जी पासून बाळाचा बचाव व्हावा यासाठी घरातील धूळ साफ करत राहा,याने बाळाला बऱ्याचं त्रासापासून मुक्तता मिळेल.
कारण ३
सर्वच आई-वडिलांना आपले बाळ गाढ झोपावे असे वाटते यासाठी बाळाला पोटाशी घेऊन झोपणे आणि ऊबदार अंथरून घेणे असे उपाय केले जातात. अनेक जण बाळाचे डोके कापडाने गुंडाळतात ,पण यामुळे बाळाला अस्वस्थ वाटते. याऐवजी बाळाला फक्त पातळ रजई द्या आणि डोके उघडे ठेवा. बाळाची खोली हवेशीर असावी. शांत आणि गाढ झोप येण्यासाठी तुमच्या बाळाला भरपूर खेळती हवा गरजेची असते.
कारण ४
अगदी नवजात शिशूंच्या ही डोक्यावरील घाम ग्रंथी सक्रिय असतात.तुमच्या बाळाच्या डोक्याला घाम येत असेल तर त्या/ती ला गरम होत आहे असे समजा.बाळाचे केस दार महिन्याला किंवा उन्ह्याळ्यात बारीक ठेवावेत.याने बाळाला किती घाम येतो आहे हे हि तुम्हाला समजू शकेल. तुमच्या बाळाचे डोके खूप गरम वाटत असेल तर त्याला तापच आलेला आहे असे नाही.
टीप: वातावरण गरम नसतांनाही तुमच्या बाळाला खूप घाम येत असेल आणि त्याचे वजन खूप जास्त किंवा खूप कमी असेल तर त्याला हृदयाशी संबंधित त्रास असू शकतो. दुसरे लक्षण म्हणजे पिवळसर आणि निस्तेज त्वचा . बाळात अशी लक्षणे दिसून आल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.