गरोदरपणातील विचित्र पण खऱ्या गोष्टी

गरोदर असणे हा आयुष्यातला अतिशय सुंदर आणि एक अविस्मरणीय अनुभव असतो. विचार करा एक नवा जीव तुमच्याच शरीरापासून निर्माण होणार आहे आणि तुम्ही त्या बाळाची आई होणार आहात !यापेक्षा सुंदर काय असू शकते? अशाच काही सुंदर गोष्टी तुम्ही गरोदर असतांना तुमच्यासोबत घडतात. आपल्या सगळ्यांना त्यातली एक गोष्ट माहित आहे ती म्हणजे आईचे पोट वाढते. जशी जशी बाळाची वाढ होते तसा तसा आईच्या पोटाचा आकार देखील वाढत जातो. मातेच्या शरीरात असणार्या जास्तीच्या द्रव्याच्या ओझ्यामुळे तिचे पाय सुजतात पण कधीही न भेटलेल्या या छोट्याश्या जीवाला ती स्वतःहून जास्त जपते आणि तिची माया त्याला तिच्या उदरात वाढवत असते. ही एक अदभूत गोष्ट तर असतेच पण सोबत काही गमतीशीर आणि विलक्षण गोष्टी देखील या गरोदरपणाच्या काळात घडतात. याविषयी जाणून घेऊया.

१. पोटातले बाळ गर्भाशयात असताना जी लघवी करते ती स्वतःचीच लघवी पिते आणि परत त्याचीच लघवी करते आणि परत ती पिते. हे चक्र चालू राहते. कधी कधी बाळ १ लिटर एवढी लघवी करते आणि तीसुद्धा स्वतःच पिते.

२. बाळ गर्भाशयात अनेक अनपेक्षित गोष्टी करते. तुम्हाला अल्ट्रासाऊंडच्या वेळी ही गोष्ट पाहता देखील येते. बाळ तुम्हाला हातवारे करताना दिसेल किंवा कधी ते हात हलवून ‘Hi!’ सुद्धा करते. बाळ आपलेच हात पकडते आणि अंगठा देखील चोखते. या गोष्टी अनपेक्षित असतात पण बाळ गर्भाशयात अशा हालचाली करत राहते.

३. गरोदर असतांना त्या स्त्रीचे नाक खूप तीक्ष्ण होते, म्हणजे तुम्हाला पदार्थांचे वास चटकन येतात. तुमची वास ओळखण्याची क्षमता आपोआप कितीतरी पटीने वाढते. हे सर्व बाळाला आणि आई ला चुकीचे पदार्थ खाण्यापासून रोखण्यासाठी घडते.

४. आपण सर्वांनी ऐकलय कि गरोदर स्त्रियांच्या चेहेऱ्यावर तेज येते. हे एक सिद्ध झालेले सत्य आहे. गरोदर स्त्रीच्या शरीरातील रक्तप्रवाह हा सामान्य व्यक्तीच्या रक्तप्रवाहापेक्षा ५०% जास्त असतो. तसेच यावेळी शरीरातील तेल ग्रंथी सजग झालेल्या असल्यामुळे चेहेऱ्यावर तेज येते व त्वचा उजळू लागते.

५. प्रसूती होतांना माता कधी कधी मलविसर्जन देखील करू शकते. याचे कारण असे की, बाळाचा जन्म होतांना ज्या अवयवांवर दाब पडतो ते अवयव तुमच्या पार्श्वभागाजवळच असतात तेंव्हा आपसूकच तुमच्या गुद्दद्वारावर देखील दाब पडणार आणि त्यामुळे तुमची विष्ठा बाहेर येण्याची शक्यता असते. आता तुमच्या प्रसूतीची जर तुम्हाला व्हिडीओ क्लीप बनवण्याचा विचार असल्यास तुम्ही पुन्हा विचार करा.

 ६. गरोदर झाल्यावर आईचे जे पोट वाढते ते जवळपास मूळ गर्भाशयाच्या ५०० पट वाढीमुळे घडते. म्हणजे एका छोट्या पेरूच्या आकाराएवढा गर्भाशय एका कलिंगडाच्या आकाराचा होतो. हा बदल मोठा असला तरी हे ताणलेले पोट घेऊन तुम्ही सहज फिरत असता.

७. आईला पोटातल्या बाळाच्या उचक्या आणि लाथा जाणवतात. बाळाने उचकी दिली की आईला कळते. आणि कधी कधी बाळ आतून आईला बुक्की सुद्धा मारते. या लाथा- बुक्क्या आईला बसत असतात आणि आई त्या तालावर झुलत असते.

 ८. तुमच्या नभीचे टोक म्हणजेच तुमची बेंबी तुमच्या गर्भाशायाद्वारे बाहेरच्या बाजूने उलटली जाते. म्हणजे ती आतमध्ये न राहता आता बाहेरून वर येते. तुम्हाला याविषयी काय वाटते ? चांगलंय की नाही?

 

Leave a Reply

%d bloggers like this: