तुमच्या बाळाला गॅस झाल्याची ६ लक्षणे

अपचन झाल्यानंतर मोठ्यांना पोटात गॅस जाणवतात तसाच त्रास लहान मुलांना सुद्धा होतो. बाळाला खाऊ घालण्याची पद्धत आणि पदार्थ यावर बाळाच्या पोटाचे आरोग्य आणि गॅस चा त्रास अवलंबून असतो. यात खूप काळजी करण्यासारखे काहीही नाही कारण शरीरातील इतर सामान्य क्रियांसारखीच हि एक साधी गोष्ट आहे. दिवसभरात जितक्या जास्त वेळेला तुम्ही खाल, तितके जास्त गॅसचे प्रमाण असेल,जे साहजिक आहे. मग बाळांना गॅस होणे हा पालकांमध्ये काळजी आणि चर्चेचा विषय का असतो? जर गॅस होणे हि सामान्य समस्या आहे तर मग बाळाला गॅस झाल्यानंतर पालक काळजीत का पडतात? मुलांमध्ये होणारे त्रासदायक गॅस हे नेहमीच्या गॅस पेक्षा वेगळे असतात आणि यामुळे पालकांसाठी हा काळजीचा विषय असतो.

लहान मुलांचे छोटेसे शरीर पोटात झालेल्या अति गॅसला बाहेर टाकू शकत नाही आणि या मुळे मुले अस्वस्थ होतात.  त्यांना वेदना ही होतात. हा त्रास होण्याची अनेक करणे आहेत जसे की,

१] खूप हळू किंवा घाईने पिणे

२] खूप रडणे [ज्यामुळे हवा गिळली जाते]

३] फॉर्म्युला मिल्क मध्ये हवेचे बुडबुडे असणे

४] स्तनपान करवताना अयोग्य स्थिती

५] गॅस निर्माण करणारे पदार्थ खाणे

६] पचायला जड असणारी पेये किंवा आहार घेणे

        सामान्य गॅस आणि अतिरिक्त गॅस यांतील  ओळखाल?

१] रडणे

जेव्हा बाळाच्या पोटात अति प्रमाणात गॅस साचून राहतो तेव्हा ते वेदनादायक असते .प्रचंड वेदनामुले बाळ अस्वथ होऊन सतत रडायला लागते. बाळाचे सारखे आणि नेहमी पेक्षा जास्त जोरात रडणे हे गॅस झाल्याचे मुख्य  असते. बरेचदा,बाळाच्या रडणे  बराच वेळ,अगदी काही तासापर्यंत चालू राहते आणि बाळाला शांत करणे अवघड होऊन बसते.  

२] पाय पोटात घेणे

मोठ्यांप्रमाणेच छोटीशी बाळे त्रास कमी करण्याचे मार्ग शोधून काढतात. जेव्हा खूपच अस्वस्थ वाटते तेव्हा त्यातुन बाहेर पडण्याचे उपाय हि मुलांना लक्षात येतात. जेव्हा पोटात खूप गॅस झालेले असतात तेव्हा मुलांनी स्वतःचे दोन्ही पाय पोटात आवळून घेतल्याचे अनेक पालकांच्या लक्षात आलेच असेल.

३] चेहरा लाल होणे आणि चिडचिड

गॅस झाल्यानंतर अनेक मुलांचा चेहरा लाल होतो. मुले नेहमी पेक्षा जास्त चिडचिड आणि वैतागेला लागतात. अगदी लहानश्या कारणावरून हि मुले चिडून रडायला लागतात.

४] अस्वस्थता

गॅस मुळे होणारी बेचैनी कमी करण्यासाठी नक्की काय करावे हे माहित नसल्यामुळे मुले खूपच चुळबुळ करायला लागतात.आपल्याला काय त्रास होतोय हे मुलांना बोलून सांगता नसल्यामुळे अशा अस्वस्थ हालचालीतून आई-बाबांना एक प्रकारे इशारा देण्याचा हा प्रयत्न असतो.

५] फुगलेले /कडक पोट

जेव्हा गॅस बाहेर पडत नाही तेव्हा तो पोटात साचून राहतो. यामुळे बाळाचे पोट कडक,फुगलेले आणि गच्च होते. सामान्यपणे,बाळाचे पोट दाबून पाहिल्यास ते हलके आणि मऊ लागते पण जेव्हा पोटात गॅस अडकलेला असतो तेव्हा गच्च आणि फुगलेले असते.  

६] बाहेर टाकणे

गॅस झालेले बाळ सर्व काही बाहेर टाकते आणि थुंकते. तुम्ही विचाराल काय,तर सर्वच म्हणजे पोटातील गॅस सतत बाहेर सोडणे आणि खाणे थुंकणे. लक्षात घेण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे,तुमचे छोटेसे बाळ त्याला काय आणि किती त्रास होतोय हे बोलून सांगू शकत नाही.स्वतःचा त्रास कसा कमी करावा हे माहित नसल्यामुळे त्यांची चिडचिड अजूनच वाढते. यामुळेच,स्तनपानानंतर बाळाचा ढेकर काढणे आणि योग्य स्थितीत बाळाला कुशीत घेऊन स्तनपान करवणे गरजेचे असते.

गॅस होण्याचा हा त्रास बाळासोबतच तुमच्यासाठीही कठीण असतो तर आम्ही सांगितलेली काळजी घ्या आणि निवांत राहा!  

Leave a Reply

%d bloggers like this: