या प्रकारे पहिल्या दिवसापासून ते सहा महिन्यांपर्यंत बाळाचा विकास होतो.

बाळाच्या जन्मापासून  ती हुशार असतात त्याच्या मेंदूची वाढ सतत होत असते आणि जवळपास  जन्मापासून महिन्याचे होईपर्यंत त्याच्या जाणीवा अधिक जागृत होतात तसेच आसपासच्या वातावरणात ते जास्त रमायला लागते. या वयात कुटुंबातील लोक आणि सांभाळणारे लोक याना बाळ चांगलेच ओळखायला लागते. त्याच्यात आत्मविश्वास आलेला असतो पण आई किंवा सांभाळणारी व्यक्ति आसपास नसेल तर बाळ अस्वस्थ,दुःखी होते इतकेच नव्हे तर बाळाला असुरक्षित वाटते आणि ते घाबरते.

बाळ काही आवाज आणि विशिष्ट गोष्टींबद्दल संवेदनशील असू  शकते.त्याच्यासोबत संवाद वाढवा जेणेकरून तुम्हाला समजून घेणे त्याला सोपे जाईल आणि हे वय यासाठी अगदी योग्य आहे. तुमची ओळख त्याच्या मनात पक्की रुजवण्यासाठी काही हातवारे  आणि आवाज पुन्हा पुन्हा बाळासमोर काढा. या वयात बाळ तुमची हुबेहूब नक्कल करायला लागते. बाळाचे हे गंमतीदार खेळ बघून तुम्हाला खूपच मौज वाटेल.

तुमच्या बाळाचे स्नायू विकसित होत असतात आणि वयाच्या या टप्प्यावर त्याला बसणे,रांगणे अशा गोष्टी जमायला लागतात. याच दरम्यान बाळ त्याचे पहिले पाऊल टाकायला लागते.

या लेखातून आपण  बाळाच्या ते महिन्याच्या वयातील विकासाचे वेगवेगळे टप्पे जाणून घेउया

१]आकलन क्षमता

वाढते वय आणि छोटे छोटे अनुभव यांनी तुमच्या बाळात बरीच समज आलेली असते. आसपासच्या लोंकांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी बाळ वेगवेगळे आवाज काढते. नवनवीन गोष्टी करण्यात तुमच्या बाळाला खुपच आनंद वाटत असतो आणि सर्वांचे हसू बघून त्याला आणखीनच गंमत वाटते. सर्व काही चुकत चुकत शिकण्याचे  बाळाचे प्रयत्न अखंड चालू असतात. या छोट्याश्या बाळांना कोणतीही नवीन गोष्ट  अगदी आश्चर्यचकित करून सोडते. कारण त्यांची स्मरणशक्ती अल्प असते आणि हळुहळू  विकसित होत असते. याचमुळे, जेव्हा तुम्ही त्यांना लाल रंगाचा एखादा चेंडू दाखवाल तेव्हा सुरुवातीला बाळाला खूपच आश्चर्य वाटेल परत काही तासांनी तोच लाल चेंडू बघून तुमच्या बाळाला खूप नवल वाटेल जसे काही तो चेंडू त्याने पहिल्यांदाच बघितला आहे.

२]सामाजिक,भावनिक आणि स्वतः बद्दलची जाणिव

या वयात बाळाची दृष्टी पूर्णपणे विकसित झालेली असते आणि भोवतालच्या वातावरणाबद्दलची जाणीवही अधिक जागृत झालेली असते. कुटुंबातील व्यक्तींशी घट्ट परिचय होऊन त्यांचा सहवास बाळाला आवडायला लागतो. हसून प्रतिसाद देणे आणि संवाद साधणे बाळ शिकत असते. आरश्यासमोर उभे राहून स्वतःला न्याहाळणे आणि वेगवेगळे हावभाव करणे म्हणजे बाळाचा आवडता उद्योग असतो. आता बाळ अश्या खेळात स्वतःला रमवून घेते. फक्त जेव्हा त्याला भूक लागलेली असते, झोप आलेली असते किंवा अंथरून ओले होते तेव्हाचं ते रडते. तुमच्या  बाळाला  कुठली तरी गोष्ट त्रासदायक वाटते तेव्हाच ते अस्वस्थ होते. अशा वेळी त्याला मऊ खेळणी,सवयीचे आरामदायक कपडे किंवा त्याचे आवडते दुपटे गुंडाळा. याने त्याला  शांत वाटेल.

३]कृतिकौशल्ये [मोटार स्किल्स ] आणि शरीराच्या बांध्याचा विकास

शारीरिक क्षमतेच्या विकासाच्या दृष्टीने हा टप्पा महत्वाचा समाजला जातो. तुमच्या बाळाचे स्नायु  विकसित होत असतात आणि बसने,उठणे तसेच चालण्याचा प्रयत्न करायला बाळ हळूहळू शिकत असते. हाताची पकड या काळात विकसित होते. याला पिन्सर मुव्हमेंट असे म्हणतात . हाताची सर्व बोटे एकमेकांत गुंफण्याच्या या क्षमतेमुळे  वस्तू पकडणे आणि घट्ट आवळून ठेवणे बाळाला जमायला लागते.

तुमच्या छोटयाशा बाळाच्या नाजूक स्नायुंच्या विकासाची प्रक्रिया सतत सुरु असते, या क्षमतेमुळे बाळ बसते आणि बसलेले असताना  तोल सांभाळू शकते. या मुळे बाळाला हात आणि डोळ्यांचा समन्वय साधून कृती करणे शक्य असते.या वयात बाळ  रांगायला लागते,त्याच्या  कृतिकौशल्यां  [मोटार स्किल्स ] मध्ये वाढ होते आणि कोणतीही हालचाल करतांना स्वतःचा तोल सांभाळणे तेशिकते. आता तुमचे बाळ शारीरिक दृष्ट्या बळकट झालेले आणि त्याचे  शारीरिक हालचालींवर आलेले  नियंत्रण  तुमच्या लक्षात येईल.

४]भाषा आणि संवाद

या वयात बाळ त्याच्या आसपासच्या लोकांशी बोलायला उत्सुक असते आणि यामुळे बाळाच्या सामाजिकरणाला खूप मोठा वाव मिळतो.अनेक शब्दांचा उच्चार तुमच्या बाळाला जमत नसला तरीही बाळ संवाद साधू शकते. तुमचे बाळ बोबडे बोलत असेल तर याला त्याच्या बोलण्याची सुरुवात समजा आणि त्याच्या सोबत जास्तीतजास्त बोलून ते काय बोलण्याचा प्रयत्न करते आहे हे समजून घ्या.

५] बाळाच्या भोवतीचे जग 

तुमचे बाळ या टप्प्यावर त्याच्या आसपासचे जग समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. समजा,त्याच्या सर्व  खेळण्यांमधून एखादी खेळणी दिसेनाशी झाली तर बाळ वैतागते आणि चिडायला लागते. बाळ स्वतः कोणत्याही आधाराशिवाय बसू शकते आणि स्वतः साऱ्या गोष्टींचा धांडोळा घेण्याची त्याची धडपड असते कारण स्वतःचा तोल सावरणे बाळाला आता बऱ्यापैकी जमते.आपल्या बोबड्या बोलांनी गप्पा मारून आजी आजोबा आणि इतर छोट्या दोस्तांसोबत गट्टी जमवायला त्यांना खूप आवडते. तुमच्या छोटुल्याकडून तुम्हाला खूप प्रेम आणि लाड मिळेल . या लेखातून मिळालेल्या माहितीची  तुम्हाला नक्कीच मदत होईल. इतरांनाही हा लेख शेयर करा.  

 

Leave a Reply

%d bloggers like this: