आईच्या मुलांबाबत असणाऱ्या इच्छा


आपल्या देशात वेगवेगळ्या विचारांच्या वेगवेगळ्या जीवन पद्धतीचा अवलंब करणाऱ्या स्त्रिया आहेत. परंतु सगळ्या स्त्रियांचे एका गोष्टीवर एकमत होते ते म्हणजे प्रत्येक स्त्रीचे आई म्हणून त्यांचा मुलांवर असणारे प्रेम.आईच्या प्रेमाची व्याख्या करणे अशक्य आहे. आईच्या आपल्या मुलाच्याबाबतीत काही इच्छा असतात त्या कोणत्या ते आपण पाहणार आहोत.

१. आरोग्य

     आपल्या मुलाची शारीरिक आणि मानसिक आरोग्य आईसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. आपले बाळ सुदृढ आणि निरोगी असावं अशी तिची इच्छा असते बाळाच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी करत असते.बाळाच्या पहिल्या रडू पासून ते बाळाच्या लसीकरणाच्या इंजेक्शन पर्यंत आणि बाळाच्या प्रत्येक छोट्या मोठ्या आरोग्यविषयक  काळजी करत असते.

२.योग्य संगत

सामाजिक आरोग्य हे देखील शाररिक आणि मानसिक आरोग्य इतकेच महत्वाचे असते. आपल्या मुलाला  योग्य संगत मिळाव . अशी इच्छा प्रत्येक आईची असते. त्याकरता आपले मुल जसे मोठे होईल तसे आपले मुल चांगल्या संगतीत वाढावे असे वाटत असते.आणि त्याला असे मित्र मिळावे जे त्याला/तीला नेहमी प्रोत्साहन देतीलआणि जर काही संकट आलं तर आपल्या मुलाला साथ देतील असे एक आईला नेहमीच वाटत असते.

३. उज्वल भविष्य

लहान असताना मुलांची खूप स्वप्न असतात. आणि काळानुसार ती बदलतात देखील,पण आईचं मात्र एकच इच्छा आणि स्वप्न असतं ते म्हणजे आपलं मुलाला त्याचा आवडत्या क्षेत्रात यश मिळावं त्याचं भविष्य उज्वल होण्यासाठी आई- वडील दोघे धडपडत असतात

4. सुखी संसार

आपलं मुल ज्यावेळी स्थिरस्थावर होतं मोठं होतं. लग्नाच्या  वयाचं होतं त्यावेळी आपल्या मुलाला/मुलीला योग्य जोडीदार मिळावा अशी आईची आणि वडलांची देखील इच्छा असते.त्यासाठी ते आपल्या मुलांच्या जोडीदाराची कसून चौकशी करतात .त्यावेळी ते थोडं त्रासिक असतं पण त्यामागे त्यांचं प्रेमच असतं.

5.प्रेमळ कुटूंब
 

ज्यावेळी आई पालक असते त्यावेळी ती आपल्या बाळाला एक प्रेमळ कुटूंब मिळावा म्हणून झटत असते तसेच.ज्यावेळी मुलाला/मुलीला मुल होतं त्यावेळी त्या मुलांना देखील प्रेमळ कुटूंब मिळावं.तसेच नातवंडे देखील आपल्या मुलांचा बाबतीत भावनिक असावी त्यांनी देखील आपल्या आई वडलांना प्रेम द्यावं अशी इच्छा आईची असते

६.शिकण्याची आवड

आपल्या मुलाने कायम काहीतरी नवनवीन गोष्टी शिकाव्या आणि आपल्या क्षेत्रात यशस्वी व्हावे. आपल्या आवडत्या छंदविषयी कायम नवीन गोष्टी शिकाव्या आणि त्या पासून आनंद मिळवत राहावा असे आईला वाटत अस

Leave a Reply

%d bloggers like this: