गर्भात

काही गोष्टीचे अनुभव स्वतःच घ्यावे लागतात. आणि तेव्हाच ती गोष्टसुद्धा तुम्हाला चांगली समजून येत असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही बाप होतात तेव्हाच स्त्रीचे इमोशन्स तुम्हाला समजून घ्यायला मदत होते. आणि त्या बापाला जितका बाप होण्याचा आनंद असतो तितकाच त्याला बाळाच्या भविष्याची, त्याला सांभाळण्याची चिंता वाटते. कारण ती एक जबाबदारी असते. तेव्हा ह्या लेखात /ब्लॉगमध्ये तुम्हाला काही अशा मजेदार गोष्टी सांगणार आहोत. ह्या गोष्टी वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 

१) आईचे जेवण बाळ ओळखू शकतो

जर आई खूप मसालेदार आणि तिखट खात असेल तर बाळाचे तोंड थोडे पोळते. गोड खाण्यामुळे बाळाला आनंद वाटतो. हळूहळू त्यालाही चवीचा थोडातरी सेन्स यायला लागतो.

२) एकाच स्पर्मने

खरं म्हणजे फलन ( नर स्पर्म आणि मादीचे अंडे ह्यांचे मिलन) आणि ही एक अद्भुत प्रक्रिया आहे ज्यामध्ये एक अंडे (मादी एग) शी जुडण्याकरिता शेकडो नर स्पर्म आपसात स्पर्धा करत असतात. आणि याच्यातून एकच स्पर्म स्त्रीच्या अंड्याशी जुळून बाळ जन्माला येत असते. किती आश्चर्य आहे ना !

३) १८३६ मध्ये संशोधकांनी ह्या गोष्टीचा शोध घेतला की, बाळ जन्माच्या वेळेपासून १५ दिवसांनी छोटा असतो. म्हणजे जर बाळ ३९ आठवड्यानंतर झालेला असेल तर तो १५ दिवसांनी छोटाच असेल.

४) ही गोष्टही अजूनही अचूक रित्या निष्पन्न झाली मनही की, प्रत्येक स्त्रीने बाळाचा जन्म ९ महिन्यांनीच द्यायला पाहिजे असे नाहीच. ४ टक्के स्त्रिया ह्या ४० आठवडयांनी जन्म देत असतात. काही स्त्रिया बाळाला अगोदर जन्म देत असतात.

५) बाळ आईच्या गर्भात swimming करते

बाळ जन्म घेण्याअगोदर आईच्या गर्भात ऍम्नीऑटिक फ्लुइड असते त्यात ती पोहत असतात. त्यानंतर ती पाठीवर वजन ठेवून झोपतात.

६) गर्भात आवाज

आठव्या आठवड्यात गर्भाचे हृदय १६० प्रति मिनिट्स च्या वेगाने काम करत असते. आणि हा आवाज स्टेथोस्कोप ने तुम्ही ऐकू शकता. किंवा अल्ट्रासाउंड साधनांनी सुद्धा ऐकू शकता. आणि हा आवाज ऐकायला खूप छान वाटते.

७) गर्भात बाळाला खूप गोंगाट ऐकू येतो

१६ आठवड्यांनंतर बाळाचे कान विकसित व्हायला लागतात आणि बाळ गर्भाच्या बाहेरचे आवाज ऐकू शकतो. बाळ आईच्या हृदयाचे ठोके ऐकून अगोदर घाबरतो. आणि आईच्या सर्व क्रिया बाळाला जाणवत असतात. 

Leave a Reply

%d bloggers like this: