गर्भाशयाबाबतच्या समस्या ज्यामुळे गर्भ तयार होत नाही

 गर्भाशय स्त्रीच्या शरीराचे महत्वाचे अंग असते. जे एक जीव तयार करून पृथ्वीवर आणत असते. गर्भाशयाचे महत्व आईलाच माहिती असेल. आईच त्या भावना समजू शकते. पण काही वेळा ह्या गर्भात गर्भच तयार होत नाही. नवऱ्या- बायकोच्या मध्ये समागम होऊनही स्त्री आई होत नाही मध्येच गर्भ पडून जातो. काहीवेळा ह्याचे कारण असते गर्भाशयाची समस्या (Uterus problem) आणि हे समजण्यासाठी तुम्हाला अंतर्गत भागात तपासणी करावी लागते. ह्या लेखातून तुम्हाला खूप सोप्या शब्दात ही समस्या सांगणार आहोत.

१) स्त्रीला मासिक पाळीच्या वेळी खूप त्रास होणे (dysmenorrhea)

काही स्त्रिया मासिक पाळीच्या वेदनेला सामान्य दुखणे समजून त्याला दुर्लक्षित करून टाकते. आणि ज्यावेळी त्या स्त्रियांना बाळ व्हायला पाहिजे असे वाटते तेव्हा गर्भ धारण होत नाही. मासिक पाळीच्या वेदना ह्या योनी खूप तंग (टाईट) होण्याने होतात आणि त्याचे कारण हे गर्भाशयाचे मुख्य दार लहान असल्याने होत असते. त्यामुळे तुम्ही ह्याची तपासणी करून घ्या.

२) गर्भाशय मुख चा कॅन्सर (cervical cancer)

ह्या स्थितीत स्त्रीच्या कर्विक्समध्ये असंख्य सेल्स तयार व्हायला लागतात. ज्यामुळे स्त्रीला गर्भ धारण करण्यात अडचण येते आणि त्यासोबत खूप त्रास होत असतो.

३) Endometriosis (एन्डोमेट्रिओसिस)

ह्या स्थितीत स्त्रीचे गर्भाशयात असलेली रक्तची वाहिनी असते ती गर्भाशयाच्या बाहेर विकसित व्हायला लागते.

४) Uterine Fibroids

हे कॅन्सर सारखे दिसते पण तसे नसते. ह्यामध्ये स्त्रीच्या गर्भाशयात गाठ सारखे तयार होऊन जाते. त्यामुळे स्त्रीला गर्भ धारण करण्यात अडचण तयार होते.

५) गर्भाशयाचे नसणे (hysterectomy)

काही वेळा स्त्रीला जन्मापासूनच गर्भाशय नसते. किंवा काही कारणास्तव त्याला काढावे लागते. त्यामुळे गर्भ धारण करणे कठीण होऊन जाते.

६) Retroverted uterus
 

ह्या स्थितीला स्त्रीचे गर्भाशय जसे स्थित व्हायला पाहिजे तसे नसते त्यामुळे त्याची अवस्था बिघडून जाते. अशा मध्ये गर्भाशय सामान्य नसते तर शरीरात उलटे असते. आणि ह्यामुळे स्त्रीला समागमामध्ये त्रास व वेदना होत असते. आणि गर्भ धारण करणे कठीण होते.

ह्या वरती दिलेल्या गोष्टीमुळे जर त्रास होत असेल तर डॉक्टरांची लगेच भेट घ्या. ह्याबाबत खूप घाबरूही नका.

तुम्हाला ह्याविषयी माहिती असायला हवी. त्यासाठी हा लेख लिहला,  म्हणून ह्याबाबत खूप घाबरून जाऊ नका. इतर मातांनाही ह्या लेखाविषयी जरूर सांगा. आणि याविषयी चर्चा करा. 

Leave a Reply

%d bloggers like this: