मासिकपाळी आल्यावर महिलांना ओलसरपणा आणि विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. वारंवार पॅड बदलण्याची कटकट सुरू होते. आपलं सगळं लक्ष पॅड वर असतं त्यामुळे या दिवसात आपण अस्वस्थ असतो.आज आपण पॅड ला पर्याय असणाऱ्या टेम्पोन विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
टेम्पोन कसं काम करते?

पॅड सारखच टेम्पोन मासिकपाळीच्यावेळी वापरण्यात येते. ते खूप मऊसर कापसाचे बनलेलं असते त्याचा आकार लांबट असतो. त्यामुळे ते आरामात योनी मध्ये घालता येईल. टेम्पोन, रक्त योनीतुन बाहेर येण्या आधीच शोषून घेते. हे टेम्पोन कोणत्याही औषधांच्या दुकानात मिळू शकते.
तुम्ही कोणत्या आकाराचं टेम्पोन वापरू शकता
जर तुम्ही पहिल्यांदा टेम्पोन वापरणार असाल तर पातळसर वापरा जे योनी मध्ये घालायला व नंतर काढायला सोप्पे असं जाते
टेम्पोन योनी मध्ये कशाप्रकारे घालाल?
१. हात स्वच्छ निर्जंतुक करून घ्या आणि कोरडे करा. टेम्पोन पाकीटातून काढा आणि व्यवस्थित पॅक टेम्पोनच घ्या अन्यथा इन्फेक्शन ची भीती असते.
2. टेम्पोनच्या एक बाजूला एक धागा (स्टिंग)असेल ती हलक्या हाताने खेचून बघा ती कुठून तुटली तर नाही
3. बस किंवा उभे राहून तुम्ही टेम्पोन घालू शकता. तुम्ही तुमचा एक पाय टॉयलेट सीट वर ठेवा किंवा तुम्हांला सोयीस्कर असेल तसे बसा. टेम्पोनचा खालचा भाग पकडा. यावेळी लक्षात ठेवा की टेम्पोन ची नाडी दिसली पाहिजे.

४. दुसऱ्या हाताने टेम्पोन योनी मध्ये हळू हळू सरकवा.
५. जोपर्यंत टेम्पोन सरकवतना त्रास होत नाही तो पर्यंत टेम्पोन सरकवत जा.
६. जसं टेम्पोन योनी मध्ये घालाल तसं तस बोटाने ते हळूहळू आत सरकवा.
७. लक्षात ठेवा टेम्पोन ची स्ट्रिंग नाडी योनीचा बाहेर असू दया. कारणं ज्यावेळी तुम्हाला टेम्पोन बाहेर काढायचा असेल त्यावेळी त्या धाग्याने ती खेचून टेम्पोन बाहेर काढायचा असतो. ज्यावेळी टेम्पोन काढायचे त्यावेळी हळुवारपणे काढा.

८. टेम्पोन घालायचा आधी आणि नंतर हात स्वच्छपणे धुवा
जर टेम्पोन व्यवस्थीत योनीमध्ये मध्ये योग्यरीत्या गेले असेल तर तुम्हांला काही त्रास जाणवणार नाही. जर तुम्हांला काही त्रास जाणवला तर घातलेले टेम्पोन काढा आणि पुन्हा दुसरे टेम्पोन वापरा लक्षात ठेवा या गोष्टी खूप हळुवारपणे कराव्यात तसेच या करताना स्वच्छता राखावी अन्यथा इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. तसेच प्रसूतीनंतर टेम्पोन चा वापर टाळावा.